शहरं
Join us  
Trending Stories
1
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
2
पाकिस्तानात इराण-अमेरिका चर्चा अयशस्वी ठरली तर काय असेल डोनाल्ड ट्रम्प यांना पुढचा प्लॅन?
3
"उस्मान तारिकच्या बॉलिंगवर खेळणार नाही" लाईव्ह सामन्यात डॅरिल मिशेलचा आक्षेप, असं का म्हणाला?
4
संतापजनक! मराठा साम्राज्याचा विस्तार दर्शविणारा नकाशा आठवीच्या पुस्तकातून NCERT ने वगळला
5
१२० किंवा १५० रुपयांऐवजी ₹१२३ किंवा ₹१४८ चं पट्रोल का भरताहेत लोक? राऊंड फिगरमुळे कमी मिळतं का Petrol?
6
Tripti Kalhans : डिप्रेशनवर मात अन् पाचव्या प्रयत्नात बाजी! सलग ४ वेळा नापास झालेली तृप्ती बनली IAS अधिकारी
7
वयाच्या ४२ व्या प्रेग्नंट, तरी जिममध्ये हेवी वर्कआउट करतेय अभिनेत्री; नेटकऱ्यांनी दिला सल्ला
8
गोल्ड ETF मधील गुंतवणूक ५७% नं घसरली, चांदीत सलग दुसऱ्या महिन्यात 'एक्झिट'; आता गुंतवणूकदारांनी काय करावं?
9
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
10
IPL 2026: वैभव सूर्यवंशीच्या बॅटिंगवर किंग कोहली फिदा; सामन्यानंतर दिलं खास गिफ्ट!
11
Tarot Card: तुमचा हा आठवडा भाग्याचा की संघर्षाचा? टॅरो कार्ड्सनुसार वाचा १२ ते १८ एप्रिलचे साप्ताहिक भविष्य!
12
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
13
२००० कोटींचा महाघोटाळा! ६.३ कोटी कॅश, ७.५ कोटींचे दागिने; १९ हजार लोकांना गंडा, ED ची मोठी कारवाई
14
मंत्री झिरवाळ 'व्हिडिओ' प्रकरणाला नवं वळण; FIR रद्द करण्यासाठी आरोपीची कोर्टात धाव; आरोपांनी खळबळ
15
लग्नाची मागणी फेटाळली, रागीट युवकाने युवतीला टोचलं HIV संक्रमित इंजेक्शन, मग १ महिन्यांनी...
16
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
17
IPL 2026: वैभव सूर्यवंशी नावाचं वादळ थांबेना! मुंबई, सीएसकेनंतर विराटच्या आरसीबीलाही दाखवला हिसका
18
अंधश्रद्धेचा बळी! मुलीच्या मृत्यूनंतर ६ महिने अंत्यसंस्कार नाहीत; बापाच्या कृत्याने पोलीस हादरले
19
Video - किती गोड! बीट, ब्रोकली, स्ट्रॉबेरी... पप्पांनी केला लाडक्या लेकीचा 'नॅचरल' मेकअप
20
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
Daily Top 2Weekly Top 5

वारांगणा वस्ती आगीत जळून खाक

By admin | Updated: March 26, 2016 01:19 IST

गडचिरोली शहरापासून तीन किमी अंतरावर असलेल्या कठाणी नदीलगतच्या वारांगणा वस्तीतील झोपड्यांना रंगपंचमीच्या दिवशी ....

झोपड्यांसह संपूर्ण साहित्य जळाले : वारांगणांवर पुन्हा ओढवले संकटगडचिरोली : गडचिरोली शहरापासून तीन किमी अंतरावर असलेल्या कठाणी नदीलगतच्या वारांगणा वस्तीतील झोपड्यांना रंगपंचमीच्या दिवशी गुरूवारला सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास अचानक आग लागल्याची घटना घडली. या आगीत वारांगणा वस्तीतील धान्यासह सर्व साहित्य जळून खाक झाले. परिणामी या वस्तीतील वारांगणांवर पुन्हा संकट ओढवले आहे.कठाणी नदी लगतच्या वारांगणा वस्तीत टीन पत्र्यांच्या एकूण १२ झोपड्या होत्या. या वस्तीत ५० वर महिला राहत होत्या. काही महिन्यांपूर्वी नगर पालिका प्रशासनाने पोलीस प्रशासनाच्या संरक्षणात या वारांगणा वस्तीवर बुलडोजर चालवून येथील अतिक्रमण हटविले होते. मात्र काही दिवसानंतर पुन्हा या ठिकाणी झोपड्या उभारण्यात आल्या. होळी व रंगपंचमीचा सण आल्याने या वारांगणा वस्तीतील अर्ध्या महिला बाहेरगावी तर काही महिला स्वत:च्या खोलीवर राहण्यासाठी गेल्या होत्या. रंगपंचमीच्या दिवशी या वस्तीत कुणीच नव्हते. अशी माहिती तेथील एका महिलेने दिली. दरम्यान येथे कुणी नसताना गुरूवारी सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास अचानक या वस्तीला आग लागली. सदर आग कुणाकडूनही विझविण्याचा प्रयत्न न झाल्याने या आगीत झोपड्यातील जीवनावश्यक वस्तू व इतर साहित्य जळून खाक झाले. सदर वारांगणा वस्तीत विद्युत पुरवठ्याची सोय नाही. तसेच येथील महिला स्टोव्हवर स्वयंपाक करतात. या वस्तीत सिलिंडरचा वापर केला जात नाही. त्यामुळे सदर आग नेमकी कशी लागली. हा प्रश्न अनुत्तरीत आहे. सदर घटना मोठी असूनही या घटनेबाबत गडचिरोली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली नाही. (स्थानिक प्रतिनिधी)