शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
3
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
4
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
5
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
6
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
7
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
8
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
9
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
10
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
11
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
12
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
13
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
14
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
15
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
16
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
17
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
18
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
19
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
20
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
Daily Top 2Weekly Top 5

28 हजार नागरिकांना लसीकरणाने बळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2021 05:00 IST

देशभरात १६ जानेवारीपासून लसीकरणाला सुरुवात झाली. शासनाकडून गडचिराेली जिल्ह्याला पुरेसा लसीचा पुरवठा केला जात आहे; मात्र सुरुवातीचे काही दिवस लसीविषयी गैरसमज असल्याने नागरिक तसेच कर्मचारी सुद्धा लस देण्यास कचरत हाेते; मात्र लसीचे काेणतेही दुष्परिणाम नसल्याची खात्री झाल्यानंतर लस घेणाऱ्यांची संख्या वाढण्यास सुरुवात झाली. सुरुवातीला आराेग्य कर्मचारी व फ्रन्ट लाईन वर्कर यांनाच लस  दिली जात हाेती.

ठळक मुद्देप्राथमिक आराेग्य केंद्रावरही सुविधा : ज्येष्ठ नागरिकांचा चांगला प्रतिसाद

लाेकमत न्यूज नेटवर्कगडचिराेली : काेराेनाची लस घेण्यासाठी नागरिक व कर्मचाऱ्यांकडून चांगला प्रतिसाद मिळत असल्याने काेराेना लसीकरणाची गती वाढली आहे. २६ मार्चपर्यंत जिल्हाभरातील २८ हजार ४५ नागरिकांना काेराेनाची लस देण्यात आली आहे. देशभरात १६ जानेवारीपासून लसीकरणाला सुरुवात झाली. शासनाकडून गडचिराेली जिल्ह्याला पुरेसा लसीचा पुरवठा केला जात आहे; मात्र सुरुवातीचे काही दिवस लसीविषयी गैरसमज असल्याने नागरिक तसेच कर्मचारी सुद्धा लस देण्यास कचरत हाेते; मात्र लसीचे काेणतेही दुष्परिणाम नसल्याची खात्री झाल्यानंतर लस घेणाऱ्यांची संख्या वाढण्यास सुरुवात झाली. सुरुवातीला आराेग्य कर्मचारी व फ्रन्ट लाईन वर्कर यांनाच लस  दिली जात हाेती. त्यानंतर १ मार्चपासून ४५ वर्षे व ६० वर्षांवरील सर्वच नागरिकांना लस दिली जात आहे. नागरिक स्वत: रुग्णालयात जाऊन लस  घेत आहेत. त्यामुळे लसीकरणाची गती वाढत आहे.  

६४ केंद्रांवर लसीकरण४५ वर्षे व ६० वर्षांवरील नागरिकांनाही लस देण्याचे निर्देश शासनाने दिल्याने लस घेणाऱ्या लाभार्थ्यांची संख्या वाढली. त्यामुळे आराेग्य विभागामार्फत लसीकरण केंद्रांची संख्या वाढविली आहे. सध्या ६४ केंद्रांवर लस दिली जात आहे. काही केंद्र प्राथमिक आराेग्य केंद्रात आहेत. हे केंद्र साेमवार, बुधवार व गुरुवारी सुरू राहतात. इतर दिवशी मात्र बंद राहतात. ग्रामीण रुग्णालयस्तरावरील  लसीकरण केंद्र साेमवार ते  शनिवारपर्यंत सुरू राहतात. 

२३ हजार लससाठा उपलब्धगडचिराेली जिल्ह्याला सुरुवातीपासूनच पुरेशा प्रमाणात लसीचा पुरवठा केला जात आहे. त्यामुळे लसीकरणाचे काम सातत्याने सुरू आहे. २८ हजार ४५ नागरिकांना पहिला डाेस तर ८ हजार ४६३ नागरिकांना काेराेना लसीचा दुसरा डाेस देण्यात आला आहे. सध्या जिल्ह्यात २३ हजार लस शिल्लक आहेत. किमान १५ ते  २० दिवस लस पुरणार आहेत. ताेपर्यंत पुन्हा शासनाकडून लस  पाठविल्या जातील, अशी माहिती आराेग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे. नियाेजनबद्ध पद्धतीने आराेग्य विभागाार्फत लसीकरणाची माेहीम राबविली जात आहे.

दुर्गम भागातील नागरिकांमध्ये जागृतीची गरजप्रामुख्याने शहरी भागातील नागरिक व शहराच्या जवळपास असलेल्या गावांमधील नागरिक लस घेत आहेत. मात्र दुर्गम भागातील नागरिक लसीकरणापासून वंचित असल्याचे दिसून येत आहे. प्राथमिक आराेग्य केंद्रस्तरावर लसीकरण केंद्र सुरू करण्यात आले असले तरी दुर्गम भागातील नागरिक लसीकरणासाठी येत नसल्याचे दिसून येत आहे. सामूहिक राेगप्रतिकारक शक्ती तयार करण्यासाठी या नागरिकांचे सुद्धा लसीकरण हाेणे आवश्यक आहे. त्याद्ष्टीने नागरिकांमध्ये जागृती करण्याची गरज आहे.

 

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लस