शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
3
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
4
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
5
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
6
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
7
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
8
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
9
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
10
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
11
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
12
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
13
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
14
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
15
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
16
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
17
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
18
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
19
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
20
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
Daily Top 2Weekly Top 5

पारंपरिक वाद्यांचा वापर करा

By admin | Updated: October 10, 2015 01:29 IST

शारदा, दुर्गा उत्सवाला १३ आॅक्टोबरपासून सुरुवात होत आहे. उत्सवात मनोरंजन कार्यक्रम तसेच मूर्ती विसर्जनकाळात मोठ्या प्रमाणावर कर्कश डीजेंचा वापर केला जातो.

गडचिरोलीत शांतता समितीची सभा : दुर्गा उत्सव मंडळांना पोलिसांचे आवाहनगडचिरोली : शारदा, दुर्गा उत्सवाला १३ आॅक्टोबरपासून सुरुवात होत आहे. उत्सवात मनोरंजन कार्यक्रम तसेच मूर्ती विसर्जनकाळात मोठ्या प्रमाणावर कर्कश डीजेंचा वापर केला जातो. त्यामुळे शांतता भंग होत असते. यासाठी खबरदारी म्हणून शारदा, दुर्गा उत्सव मंडळांनी डीजेंऐवजी पारंपरिक वाद्यांचा वापर करावा, असे आवाहन पोलीस अधिकाऱ्यांनी गडचिरोली पोलीस ठाण्यातील शांतता सभेत शुक्रवारी केले. शांतता सभेला उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. सागर कवडे, पोलीस निरीक्षक विजय पुराणिक, उपप्रादेशिक परिवहन विभागाचे एपीआय प्र. प्र. इंगवले, सहाय्यक पोलीस निरीक्षक बी. आय. नाईकवाडे, पोलीस उपनिरीक्षक अनंत कांबळे, धर्मादाय कार्यालयाचे अनिल भांडेकर उपस्थित होते. मूर्ती विसर्जन मंडळांना योग्य प्रकारे करता यावे, याकरिता तलावाच्या स्वच्छतेबाबत तसेच रस्त्याच्या दुरूस्तीबाबत नगर परिषद प्रशासनाला सांगितले जाईल. मंडळांनी शांतता व सुव्यवस्थेत शारदा व दुर्गा उत्सव पार पाडून पोलीस प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. सागर कवडे यांनी केले. शारदा व दुर्गा उत्सव मंडळांनी उत्सवकाळात शांततेसाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन पोलीस निरीक्षक विजय पुराणिक यांनी केले. दरम्यान विविध मंडळांच्या पदाधिकाऱ्यांनी उपस्थित केलेल्या अनेक प्रश्नांचे पोलीस अधिकाऱ्यांमार्फत समाधान करण्यात आले. यावेळी पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या ७० मंडळांचे पदाधिकारी व पोलीस पाटील उपस्थित होते. (शहर प्रतिनिधी)संदेशात्मक देखावे व प्रतिकृतींना देणार बक्षीसशारदा व दुर्गा उत्सव काळात मंडळांमार्फत विविध देखावे मंडपस्थळी साकारले जातात. मंडपस्थळी सार्वजनिक समस्यांविरोधात संदेश देणारे तसेच अंधश्रद्धा निर्मूलनावर देखावे निर्माण करणाऱ्या मंडळांना पोलीस ठाण्यातर्फे बक्षीस दिले जाईल, असे शांतता सभेत पोलीस अधिकाऱ्यांनी मंडळाच्या पदाधिकाऱ्यांना सांगितले.