शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

शेती मशागतीत यंत्राचा वापर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2016 02:04 IST

भामरागडसारख्या दुर्गम भागातील आदिवासी शेतकरी आता आधुनिक शेती पध्दतीकडे वळला आहे.

बदल : आदिवासी शेतकरी वळला आधुनिक शेतीकडे भामरागड : भामरागडसारख्या दुर्गम भागातील आदिवासी शेतकरी आता आधुनिक शेती पध्दतीकडे वळला आहे. या भागातील अनेक आदिवासी शेतकरी सध्या रोवणीच्या कामात चिखलणीसाठी ट्रॅक्टरचा वापर करीत आहेत. भामरागड तालुक्यात यांत्रिकीकरण वाढले असल्याने बैलांसह त्यांच्या गळ्यातील घुंगराचा नादमधूर आवाज आता दुर्मिळ होत चालला आहे. ७ ते १३ जुलैदरम्यान भामरागड तालुक्यात संततधार पाऊस बरसला. परिणामी पूर परिस्थितीही निर्माण झाली. आठवडाभरानंतर पावसाने उसंत घेतली. त्यामुळे तालुक्यातील शेतकऱ्यांनी नांगरणी व पेरणीच्या कामात वेग घेतला. रोवणीचे काम मागे पडून आहे, या उद्देशाने भामरागड तालुक्यातील अनेक आदिवासी शेतकरी शेती मशागतीच्या कामासाठी ट्रॅक्टरचा वापर करीत आहेत. मागील दोन वर्षापूर्वी ग्रामीण भागात ट्रॅक्टर अत्यल्प प्रमाणात उपलब्ध होते. प्रत्येक शेतकऱ्यांच्या घरी लाकडी नांगर दिसून यायचा. मोजके श्रीमंत शेतकरी नांगरणीच्या कामात ट्रॅक्टरचा वापर करीत होते. मात्र यंदा भामरागड तालुक्यातील मोठ्या गावातील बहुतांश शेतकरी शेतीमशागतीच्या कामात ट्रॅक्टरचा वापर करीत आहेत. त्यामुळे शेतावर बैल व लाकडी नांगर फारसे दिसत नाही. पावसाळ्यापूर्वी अनेक शेतकऱ्यांनी बांबू कुंपणाचे काम केले. तसेच जळाऊ लाकडाची वाहतूकही केली. मात्र सदर जंगलातील कामेही अनेकांनी ट्रॅक्टरद्वारे केले. ट्रॅक्टरसह वाहतुकीचे अनेक साधण वाढल्याने बैलगाडीही आता काळाच्या पडद्याआड झाली आहे. (तालुका प्रतिनिधी) शेती विकासासाठी शासनाने पुढाकार घेण्याची गरज भामरागड तालुक्यातील लाहेरी, मल्लमपोडूर, आरेवाडा, भामनपल्ली, येचली, मन्नेराजाराम, जिंजीगाव या परिसरातील शेतकरी वेळेचे महत्त्व लक्षात घेऊन वैज्ञानिक दृष्टीकोणातून यांत्रिकीकरणाच्या माध्यमातून आधुनिक शेतीकडे वळले आहेत. अनेक शेतकरी ट्रॅक्टरसह इतर यंत्राचा शेती मशागतीच्या कामात वापर करीत आहेत. आदिवासी शेतकरी सुधारित पध्दतीच्या शेतीकडे वळले असल्याने शासनानेही या भागातील शेती विकासासाठी एक पाऊल पुढे टाकण्याची गरज आहे. तेव्हाच भामरागड तालुक्यात कृषी क्रांती होण्यास वेळ लागणार नाही. उन्हाळी पिकांकडेही शेतकऱ्यांची वाटचाल भामरागड तालुक्याच्या शेती पध्दतीत पूर्वीच्या काळाच्या तुलनेत आता बराच बदल झाला आहे. भामरागड तालुक्यात मुबलक पाणी उपलब्ध असल्याने शेतीचा विकास होत असल्याचे दिसून येत आहे. सिंचनाची सोय असलेल्या पल्ली या गावातील आदिवासी शेतकरी खरीप हंगामातील पिकांसोबतच उन्हाळी धान व इतर रबी पिके घेत आहेत. येथील शेतकरी भामरागडच्या बाजारपेठेत शेतातील कृषी उत्पादन आणून विकतात. यातून त्यांची आर्थिक परिस्थिती सुधारत आहे. या भागातील शेतकऱ्यांच्या विकासासाठी कृषी विभागासह जिल्हा प्रशासनानेही प्रयत्न करावेत.