शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
2
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
3
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
4
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
5
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
6
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
7
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
8
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
9
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
10
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
11
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
12
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
13
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
14
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
15
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
16
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
17
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
18
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
19
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
20
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

असंघटित कामगारांचा मोर्चा जिल्हा कचेरीवर धडकला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 10, 2019 01:39 IST

विविध मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधून घेण्यासाठी बुधवारी आयटकच्या नेतृत्वात एकूण सहा संघटनांच्या पाठींब्याने दोन हजारावर अंगणवाडी कर्मचारी, आशा व गटप्रवर्तक आणि शालेय आहार पोषण आहार व हातपंप देखभाल दुरूस्ती कामगारांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा धडक मोर्चा काढला.

ठळक मुद्देनारेबाजीने परिसर दणाणला : जिल्हाधिकारी कार्यालयाला छावणीचे स्वरूप

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : विविध मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधून घेण्यासाठी बुधवारी आयटकच्या नेतृत्वात एकूण सहा संघटनांच्या पाठींब्याने दोन हजारावर अंगणवाडी कर्मचारी, आशा व गटप्रवर्तक आणि शालेय आहार पोषण आहार व हातपंप देखभाल दुरूस्ती कामगारांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा धडक मोर्चा काढला. वाढती महागाई व बेरोजगारीला आळा घालावा, नियमित कामावर कंत्राटी कर्मचाऱ्यांची नेमणूक बंद करावी, श्रम कायद्यात मजूरविरोधी परिवर्तन करणे बंद करावे आदीसह अनेक मागण्यांकडे मोर्चेकºयांनी लक्ष वेधले.या आंदोलनाचे नेतृत्व आयटकचे जिल्हाध्यक्ष देवराव चवळे, जिल्हा सचिव अ‍ॅड.जगदीश मेश्राम, राज्य सचिव विनोद झोडगे, भाकपचे जिल्हा सचिव डॉ.महेश कोपुलवार, शेतमजदूर युनियनचे जिल्हाध्यक्ष अमोल मारकवार, आशा व गटप्रवर्तक कर्मचारी युनियनच्या जिल्हा सचिव रजनी गेडाम, शालेय पोषण आहार कर्मचारी संघटनेच्या जिल्हा सचिव कुंदा चललीलवार, अंगणवाडी बालवाडी कर्मचारी युनियनच्या जिल्हा सचिव राधा ठाकरे, हातपंप देखभाल व दुरुस्ती कामगार संघटनेचे जिल्हा सचिव जलील खाँ पठाण आदींनी केले.जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा पोहचल्यानंतर तेथे नेत्यांनी संबोधित केले. त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांमार्फत पंतप्रधान व राज्याच्या मुख्यमंत्र्यांना निवेदन पाठविण्यात आले. स्थानिक इंदिरा गांधी चौकातून चंद्रपूर मार्गे जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात दोन हजारवर महिला कर्मचाऱ्यांचा मोर्चा पोहोचला. दरम्यान महिलांनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या दोन्ही प्रवेशद्वारासमोर ठिय्या आंदोलन केल्याने जिल्हाधिकाऱ्यांनाही कार्यालयाबाहेर काही वेळ जाता आले नाही. दरम्यान पोलीस बंदोबस्त वाढवून परिस्थिती हाताळण्यात आली. या मोर्चादरम्यान महिलांनी शासनाच्या धोरणाविरोधात जोरदार नारेबाजी केली.या आहेत मागण्यानियिमत कामावर कंत्राटी पध्दत बंद करण्यात यावी, कर्मचाºयांना कमीत कमी १८ हजार रूपये मासिक मानधन देण्यात यावे, ४५ दिवसांच्या सुट्या लागू कराव्या, बोनस व तथा ईपीएफवरील सिलिंग बंद करण्यात यावी, हातपंप दुरूस्ती कामगारांना शासकीय सेवेत सामावून घेण्यात यावे, हातपंप कर्मचाऱ्यांना १८ हजार मासिक वेतन देण्यात यावे, करारनामा रद्द करण्यात यावा, मासिक सहा हजार रूपये पेन्शनचा कायदा करण्यात यावा, आदी मागण्यांचा समावेश आहे.

टॅग्स :Morchaमोर्चा