शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिकेचे जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
2
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
3
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
4
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
5
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
6
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
7
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
8
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
9
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
10
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
11
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
12
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
13
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
14
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
15
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
16
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
17
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
18
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
19
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
20
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
Daily Top 2Weekly Top 5

लकवा प्रशासनाचा विद्यापीठालाही फटका

By admin | Updated: August 3, 2014 23:22 IST

दोन वर्षांपूर्वी चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्याच्या शैक्षणिक विकासासाठी राज्य सरकारने गोंडवाना विद्यापीठ निर्माण करण्याचा निर्णय घेतला. सद्यस्थितीत गोंडवाना विद्यापीठाच्या विविध

गोंडवाना विद्यापीठ वाऱ्यावर : मुख्यमंत्र्यांचे गडचिरोलीकडे दुर्लक्षगडचिरोली : दोन वर्षांपूर्वी चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्याच्या शैक्षणिक विकासासाठी राज्य सरकारने गोंडवाना विद्यापीठ निर्माण करण्याचा निर्णय घेतला. सद्यस्थितीत गोंडवाना विद्यापीठाच्या विविध प्रस्तावाला उच्च व तंत्रशिक्षण विभागाकडे पाठविण्यात आले आहे. परंतु मागील एक वर्षांपासून उच्च व तंत्रशिक्षण विभागातून मुख्यमंत्र्यांकडे हे प्रस्ताव मान्यतेसाठी पडून असल्याची माहिती पुढे आली आहे. त्यामुळे राज्य सरकारचे मागास भागातील गोंडवाना विद्यापीठाच्या विकासाकडे दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येत आहे. २ आॅक्टोबर २०११ ला गोंडवाना विद्यापीठ स्थापन करण्यात आले. विद्यापीठ स्थापन झाल्यानंतर सहा महिन्यात व्यवस्थापन परिषद, विदवत्त परिषद, विविध विद्या शाखेचे अधिष्ठाता, विविध अभ्यास मंडळाचे अध्यक्ष यांच्या नियुक्त्या व स्थापना होणे आवश्यक होते. या परिषदा व मंडळ यांच्या माध्यमातूनच विद्यापीठाच्या प्रत्येक निर्णयाला विधिवत मान्यता देण्याचे काम केले जाते. व्यवस्थापन परिषदेच्या मान्यतेशिवाय विद्यापीठाचे आर्थिक व प्रशासकीय निर्णय विधिवत होत नाही. तसेच विदवत्त परिषदेच्या मान्यतेशिवाय अभ्यासक्रमही विधीवत होत नाही. नव्याने निर्माण झालेल्या गोंडवाना विद्यापीठात यापैकी कशाचीही स्थापन करण्यात आलेली नाही. विद्यापीठाच्या स्थानिक प्रशासनाने आपल्या मर्जीनुसार काही विद्या शाखांचे अधिष्ठाता निवडलेले आहेत. मात्र त्यांच्या निवडीला शासनाने अजुनही मान्यता दिलेली नाही. त्यामुळे गोंडवाना विद्यापीठाचा कारभार आतापर्यंत कुलगुरू आपल्या मर्जीनुसारच रेटून नेत असल्याचे दिसून आले. मात्र मार्च २०१४ मध्ये गोंडवाना विद्यापीठाचे पहिले कुलगुरू डॉ. विजय आर्इंचवार हे ही सेवानिवृत्त झालेत. त्यांच्या जागी नवा कुलगुरू नियुक्तीची प्रक्रिया होणे अजुन बाकीच आहे. नवा कुलगुरू निवडण्यासाठी व्यवस्थापन व विद्वत्त समित्या गठीत होणे आवश्यक आहे. यासंदर्भातील फाईल उच्च व तंत्र शिक्षण मंत्री राजेश टोपे यांनी मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयाकडे पाठविली, अशी माहिती त्यांनी गडचिरोलीतील शिक्षण क्षेत्रातील विविध मान्यवर व राजकीय नेत्यांना दिली आहे. मात्र मुख्यमंत्री कार्यालयाने अद्यापही या फाईलवरची धूळ झटकलेली नाही. त्यामुळे गोंडवाना विद्यापीठाचा सारा कारभार गोंधळलेला आहे. जिल्हाधिकारीच कुलगुरू असले तरी प्रशासकीय यंत्रणा मात्र सुस्तावलेली आहे. जिल्ह्यातील अनेक महाविद्यालयांवर कारवाई होण्याचेही काम ठप्प झाले आहे. दोनही जिल्ह्यात विद्यापीठाची व्यवस्थापन व विद्वत्त समिती स्थापन व्हावी यासाठी मागणी होत आहे. परंतु राज्य सरकारला व मुख्यमंत्र्यांनाही याबाबत उदासिनता आहे. (जिल्हा प्रतिनिधी)