शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
2
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
3
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
4
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
5
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
6
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
7
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
8
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
9
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
10
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
11
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
12
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
13
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
14
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
15
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
16
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
17
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
18
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
19
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
20
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
Daily Top 2Weekly Top 5

ओबीसींचे आरक्षण पूर्ववत करा

By admin | Updated: July 6, 2017 01:46 IST

गेल्या अनेक वर्षांपासून गडचिरोली जिल्ह्यातील ओबीसींचे आरक्षण कमी करून ते आता सहा टक्क्यावर

मुख्यमंत्र्यांकडे मागणी : उपविभागीय अधिकाऱ्यांना शिवसेनेचे निवेदन लोकमत न्यूज नेटवर्क देसाईगंज : गेल्या अनेक वर्षांपासून गडचिरोली जिल्ह्यातील ओबीसींचे आरक्षण कमी करून ते आता सहा टक्क्यावर आणण्यात आले आहे. ओबीसींचे आरक्षण प्रचंड कमी केल्याने ओबीसी समाजावर अन्याय झाला आहे. या अन्यायाविरोधात जिल्हाभरातील शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिक आक्रमक झाले असून शिवसेनेच्या वतीने देसाईगंज येथे उपविभागीय अधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन सादर करण्यात आले. या निवेदनातून ओबीसींना पूर्ववत १९ टक्के आरक्षण द्यावे, अशी मागणी करण्यात आली. ओबीसींचे आरक्षण पूर्ववत १९ टक्के करून जिल्ह्यातील बेरोजगार युवकांना संधी देऊन बाहेर जिल्ह्यातील भरती १५ वर्षासाठी बंद करावी, या मागणीचे निवेदन शिवसेनेच्या वतीने उपविभागीय अधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देण्यात आले. दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, जिल्ह्यात ओबीसींना सहा टक्के आरक्षण आहे. जिल्ह्यात नोकरभरती होताना येथील ओबीसींना संधी मिळत नाही. त्यामुळे ओबीसींचे आरक्षण पूर्ववत १९ टक्के करावे, बाहेर जिल्ह्यातील उमेदवारांना नोकरभरतीत बंदी घालावी, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली. निवेदन देताना उपजिल्हा प्रमुख अविनाश गेडाम, तालुका प्रमुख नंदू चावला, माजी तालुका प्रमुख विठ्ठल ढोरे, ज्ञानेश्वर कवासे, माजी जि. प. सदस्य दिगांबर मेश्राम, रामचंद्र मोहुर्ले, विकास प्रधान, डॉ. श्रीकांत बन्सोड, विलास ठाकरे, विजय सहारे, मंगेश चौधरी, जसपाल चावला, महिला आघाडी तालुका प्रमुख सरिता शिवरकर, माया मोहुर्ले, मुन्ना नागलवाडे, तानाजी कुथे, आरमोरीचे तालुका प्रमुख माणिक भोयर, युवा सेना जिल्हा प्रमुख चंदू बेहरे, दादाजी दाणे, शैलेश चिटमलवार, जयंत दहीकर व कार्यकर्ते हजर होते. कोरची येथे तहसीलदारांना निवेदन ओबीसींचे आरक्षण पूर्ववत १९ टक्के करावे, या मागणीसाठी कोरची येथे तहसीलदारांमार्फत मुख्यमंत्र्यांना शिवसेनेच्या वतीने निवेदन सादर करण्यात आले. निवेदन देताना उपजिल्हा प्रमुख अशोक गावतुरे, तालुका प्रमुख चेतानंद किरसान, पद्माकर मानकर, संघटन प्रमुख राकेश पारटवार, महिला प्रमुख कौशल्या काटेंगे, प्रतिभा भजणे, योगेश मेश्राम, दिलीप कुलसंगे, शालिनी आदे, अवधराम बागमूळ, रमेश मानकर, बिजलाल उसेंडी, भारतसाय कुंजाम, उईके, नुरूटी, कावळे, कोराम, मडावी हजर होते.