शहरं
Join us  
Trending Stories
1
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
2
Latest Marathi News LIVE Updates: पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकातामध्ये ED ची मोठी कारवाई
3
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
4
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, जाणून घ्या एका रात्रीचं भाडं
5
Video - हृदयस्पर्शी! दोन्ही पाय गमावले पण जिद्द कायम; डान्सरने जिंकली कोट्यवधी लोकांची मनं
6
Travel : सारखा गोवाच कशाला हवा? भारतातील 'या' ५ बीच डेस्टिनेशन्सचा थाटच न्यारा; एकदा जाल तर प्रेमातच पडाल!
7
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
8
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
9
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
10
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
11
३० वर्षांनी त्रिएकादश राजयोग: ८ राशींना भरपूर लाभ, प्रमोशन-पगारवाढ संधी; लक्षणीय नफा-फायदा!
12
गोमांस, नमाजची सक्ती अन् मुलांचेही धर्मांतरण; आयटी कंपन्यांनमध्ये रॅकेट सक्रिय असल्याचा महाजनांचा दावा
13
Andhra Pradesh: धबधब्यावर मौजमजा करताना दुर्दैवी घटना, एकीला वाचवायला गेल्या आणि तिघीही बुडाल्या!
14
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
15
Abhinav Arora: कंटेंट क्रिएटर अभिनव अरोरावर जीवघेणा हल्ला; कारच्या काचा फोडल्या, वडील जखमी - Video
16
Food : आशियातील टॉप-५० रेस्टॉरंट्समध्ये भारताची दोन 'रत्न'; एक तर आपल्या मुंबईतच! बहुतेक मुंबईकरांनाही माहीत नसेल...
17
मीटिंगला बोलवायचे अन्...,आयटी कंपनीतील काळ्या कारनाम्याचा भांडाभोड, ४० सीसीटीव्ही तपासले!
18
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
19
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
20
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
Daily Top 2Weekly Top 5

नजरअंदाज पीक आणेवारी ७२ पैसे

By admin | Updated: October 7, 2016 01:28 IST

कृषी व महसूल विभागाने सप्टेंबर महिन्यात केलेल्या पाहणीनुसार जिल्ह्यातील पीक परिस्थिती चांगली असून

खरीप हंगाम : १ हजार ५३९ गावांमध्ये पेरणीगडचिरोली : कृषी व महसूल विभागाने सप्टेंबर महिन्यात केलेल्या पाहणीनुसार जिल्ह्यातील पीक परिस्थिती चांगली असून जिल्हाभराची सरासरी आणेवारी ७२ पैसे आढळून आली आहे. बहुतांश तालुक्याची आणेवारी ६० पैशांच्या वरच आहे. गडचिरोली जिल्ह्यात खरीप हंगामात प्रामुख्याने धान, तूर, कापूस, सोयाबिन या पिकांची लागवड करण्यात येते. यावर्षीच्या पावसाळ्यात अगदी सुरूवातीपासून चांगला पाऊस झाला. त्यामुळे पेरणी, धानाच्या रोवणीची कामे अत्यंत वेळेवर झाली. त्यानंतरही अगदी वेळेवर पाऊस झाल्याने शेतीची कामे वेळेवर झाली. मागील आठवड्यात जिल्हाभरात दमदार पावसाने हजेरी लावली. त्यामुळे धानपिकाला मोठा दिलासा मिळाला आहे. बहुतांश तलाव व बोड्या तुडूंब भरून आहेत. त्यामुळे उत्पादन चांगले होईल, असा अंदाज नजर अंदाज पाहणीत व्यक्त करण्यात आला आहे. गडचिरोली जिल्ह्यात एकूण १६८८ महसुली गावे आहेत. यापैकी १ हजार ५३९ गावांमध्ये खरीप पिकांची लागवड केली जाते. ५० पैसे पेक्षा कमी आणेवारी आल्यास संबंधित गावाला शासनाकडून दुष्काळग्रस्त म्हणून घोषीत केले जाते. यावर्षीच्या हंगामात १४८० गावांची आणेवारी ५० पैशांच्या वर आहे. अंतिम आणेवारी जानेवारी महिन्यात घोषीत करण्यात येते. यासाठी दोन महिन्यांचा कालावधी असला तरी पिकांची स्थिती लक्षात घेतली तर पैशाची आणेवारी ५० पैशांपेक्षा कमी होणार नाही, अशी शक्यता महसूल विभागातील अधिकारी वर्गाकडून व्यक्त केली जात आहे. (नगर प्रतिनिधी)५९ गावांमध्ये खरिपाचे उत्पादन नाहीगडचिरोली जिल्ह्यात एकूण १६८८ गावे आहेत. त्यापैकी १ हजार ५३९ गावांमध्ये खरीपाचे उत्पादन घेतले जाते. मात्र ५९ गावांमध्ये यावर्षी खरीप पिकांची लागवडच करण्यात आली नाही. यामध्ये धानोरा तालुक्यातील सहा, चामोर्शी तालुक्यात सहा, आरमोरी तालुक्यात एक, कुरखेडा पाच, कोरची सहा, अहेरी सहा, एटापल्ली दोन, भामरागड २२ व सिरोंचा तालुक्यातील पाच गावांचा समावेश आहे. अंतिम आणेवारीवरून ठरणार मदतसध्या काढण्यात आलेली आणेवारी ही नजरअंदाज आणेवारी आहे. राज्यभरातील पिकांची स्थिती कळावी, यासाठी महसूल व कृषी विभागाची कर्मचारी प्रत्येक गावातील पिकांची पाहणी करून त्यानुसार आणेवारी काढतात. मात्र अजूनपर्यंत पूर्णपणे पीक निघाले नाही. पीक काढतेवेळी पाऊस सुरू राहिल्यास ओला दुष्काळजन्य परिस्थिती निर्माण होऊ शकते. त्यामुळे आता काढलेली आणेवारी ही अंतिम नाही. अंतिम आणेवारी जवळपास डिसेंबर, जानेवारी महिन्यात जाहीर केली जाते. तेव्हा बहुतांश खरीप पिके निघालेली असतात. त्यामुळे सदर आणेवारी अंतिम समजली जाते व त्यावरूनच सदर गावाला दुष्काळग्रस्त घोषीत करणे किंवा न करणे याबाबतचा निर्णय घेतला जातो. मागील वर्षी बहुतांश गावांची पैसेवारी कोरड्या दुष्काळामुळे ५० पैशांपेक्षा कमी होती. यावर्षी मात्र बहुतांश गावांची आकडेवारी ५० पैशांपेक्षावर आहे.