शहरं
Join us  
Trending Stories
1
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
2
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
3
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
4
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
5
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
6
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
7
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
8
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
9
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
10
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
11
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
12
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
13
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
14
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
15
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
16
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
17
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
18
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
19
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
Daily Top 2Weekly Top 5

अनियंत्रित कार उलटून युवक ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 14, 2019 22:38 IST

भरधाव चारचाकी वाहन रस्त्याच्या बाजुला जाऊन उलटल्याने एका युवकाचा मृत्यू झाल्याची घटना सोमवारी रात्री १ वाजताच्या सुमारास गोठणगाव-चांदागड रस्त्यावर घडली. चालक घटनास्थळावरून फरार झाला. अपघातात प्रल्हाद भास्कर उसेंडी रा. देवखडकी ता. आरमोरी असे मृतकाच नाव आहे. भास्कर हा कुरखेडा येथील व्यावसायिक बालकिसन भट्टड यांच्याकडे कामाला होता. शेतकऱ्यांना लघुपट दाखविण्याचे कंत्राट भट्टड यांच्याकडे आहे.

ठळक मुद्देगोठणगावजवळ अपघात : मध्यरात्रीच्या सुमारास घडला थरार

लोकमत न्यूज नेटवर्ककुरखेडा : भरधाव चारचाकी वाहन रस्त्याच्या बाजुला जाऊन उलटल्याने एका युवकाचा मृत्यू झाल्याची घटना सोमवारी रात्री १ वाजताच्या सुमारास गोठणगाव-चांदागड रस्त्यावर घडली. चालक घटनास्थळावरून फरार झाला.अपघातात प्रल्हाद भास्कर उसेंडी रा. देवखडकी ता. आरमोरी असे मृतकाच नाव आहे. भास्कर हा कुरखेडा येथील व्यावसायिक बालकिसन भट्टड यांच्याकडे कामाला होता. शेतकऱ्यांना लघुपट दाखविण्याचे कंत्राट भट्टड यांच्याकडे आहे.याच कामाकरिता त्याच्या वाहनावरील चालक संजय केवळराम दर्रो व मृतक प्रल्हाद उसेंडी हे दोघे पेंढरी हद्दीतील दुर्गापूर येथे गेले होते. तिथून रात्री परत येत असताना कुरखेडापासून सहा किमी अंतरावरच्या गोठणगाव ते चांदागड दरम्यान चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले. त्यामुळे वाहन रस्त्याच्या कडेला उलटले. या अपघातात वाहनाचे चांगलेच नुकसान झाले.या अपघातात प्रल्हाद हा गंभीर जखमी झाला. त्याला कुरखेडा उपजिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून तो फरार झाला आहे. तपास अधिकारी पोलीस उपनिरिक्षक प्रशांत रेळेकर चालकाचा शोध घेत आहेत.कारला अपघातकार चालकाचे नियंत्रण सुटल्याने कार रस्त्याच्या बाजुला जाऊन धडकली. सदर घटना आलापल्ली-एटापल्ली मार्गावर आलापल्लीपासून पाच किमी अंतरावर घडली. यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र कारचे मोठे नुकसान झाले आहे. कारचा अपघात झाल्याचे लक्षात आल्यानंतर नागरिकांनी कार चालक व इतरांना बाहेर काढले.