शहरं
Join us  
Trending Stories
1
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
2
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
3
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
4
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
5
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
6
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
7
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
8
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
9
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
10
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
11
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
12
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
13
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
14
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
15
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
16
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
17
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
18
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
19
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
20
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

लाकूड बिट वाहून नेणारे दोन ट्रॅक्टर ग्रामस्थांनी अडविले

By admin | Updated: March 26, 2017 00:42 IST

निमनवाडा येथील वन समितीने कापलेले जळाऊ लाकूड बिट वाहून नेणारे दोन ट्रॅक्टर ग्रामस्थांनी २३ मार्च रोजी अडविले.

निमनवाडातील प्रकार : वन विभागाकडे प्रलंबित मजुरीचा मुद्दा ऐरणीवररांगी : निमनवाडा येथील वन समितीने कापलेले जळाऊ लाकूड बिट वाहून नेणारे दोन ट्रॅक्टर ग्रामस्थांनी २३ मार्च रोजी अडविले. त्यानंतर २४ मार्च रोजी शुक्रवारी गावाच्या चौकात उभे असलेले सदर दोन ट्रॅक्टर पोलिसांची मदत घेऊन वन विभागाने रांगी येथील वन कार्यालयात आणले. त्यामुळे ग्रामस्थांमध्ये रोष व्यक्त केला जात आहे. रांगी येथे वन विभागाचे उत्तर व दक्षिण असे दोन बिट असून दक्षिणेकडील निमनवाडा बिटात शिवटोला व भुसानटोला या गावाचा समावेश होतो. निमनवाडा बिटातील वाघभूमी कुप क्रमांक ५ च्या कक्ष क्रमांक ४४६ मधील जंगल वन समितीच्या नियंत्रणाखाली आहे. वनसंपत्ती अंतर्गत येथील जंगलाची कटाई करण्यात आली. कटाई केलेले जळाऊ लाकूड बिट नेण्यासाठी दोन ट्रॅक्टर भाडेतत्वावर घेण्यात आले. एमएच ३३ एफ ४४१४ व एमएच ३३ एफ २४८५ क्रमांकाचे दोन ट्रॅक्टरच्या ट्रॉलीमध्ये जळाऊ लाकूड बिट भरण्यात आले. लाकूड बिट रांगी येथील वनक्षेत्र सहायक कार्यालयात नेत असताना निमनवाडा गावात लोकांनी हे दोन्ही ट्रॅक्टर अडविले. याबाबत गावातील लोकांना विचारणा केली असता, लोकांची मजुरीची रक्कम प्रलंबित आहे. वन समितीची वर्षभरात सभाच घेण्यात आली नाही. संबंधित बिट वनरक्षक गावात येत नाही. जोपर्यंत मजुरीची रक्कम दिली जात नाही. तोपर्यंत ट्रॅक्टर येथून पुढे नेऊ देणार नाही, अशी भूमिका लोकांनी घेतली. त्यानंतर वन विभागाने धानोरा पोलिसांची मदत घेऊन दोन्ही ट्रॅक्टर रांगीला हलविले. रांगी येथे ट्रॅक्टरच्या ट्रॉलीतून लाकूड बिट खाली करण्यात आले. यावेळी वन विभागाचे अधिकारी व कर्मचारी तसेच पोलीस कर्मचारी उपस्थित होते. (वार्ताहर)काय म्हणतात नागरिक?गावातील लोकांची मजुरीची रक्कम वर्षभरापासून प्रलंबित आहे. चापल कटाई, वनाची राखणी आदीची रक्कम शिल्लक आहे. तसेच गावातील १० लोकांना गॅस कनेक्शन मिळवून देतो, असे सांगून वनरक्षकांनी २ हजार ७०० प्रमाणे लोकांकडून पैसे घेतले. वर्ष उलटूनही गॅस कनेक्शन मिळाले नाही. गॅस कनेक्शनच्या या रक्कमेची पावती वनरक्षकांनी दिली नाही, अशी माहिती निमनवाडा येथे नानाजी कुमरे, कलिराम जांगी, गणेश जांगी सुखदेव कुमरे, रामजी आतला, अनिता कुमरे, सायत्रा नरोटे, अर्चना कुमरे, वसंती जांगी यांनी दिली. सदर प्रकरणाची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी या सर्व नागरिकांनी केली आहे.