शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी शेवटी 'जय गुजरात' म्हणालो कारण..."; एकनाथ शिंदे यांनी दिलं स्पष्टीकरण; ठाकरेंनाही डिवचलं...
2
"कोण दुटप्पी? हे मराठी माणसाला लक्षात येतं...!"; ठाकरेंच्या विजयी मेळाव्यावर फडणवीसांची खरमरीत टीका, स्पष्टच बोलले
3
‘जय गुजरात’ म्हटलं म्हणजे शिंदेंचे महाराष्ट्रावरील प्रेम कमी झालं का? मुख्यमंत्र्यांचा विरोधकांना सवाल
4
"देशाला दिशा देणाऱ्या महाराष्ट्रात वाढत्या शेतकरी आत्महत्या भूषणावह नाहीत"; काँग्रेसचे टीकास्त्र
5
देशाच्या आरोग्याचे बजेट ३७ हजार कोटींवरून १ लाख कोटींवर नेण्याचे काम पंतप्रधान मोदींनी केले - अमित शाह
6
“नोंदणीचा ‘एक टक्का’ निधी थेट स्थानिक स्वराज्य संस्थांना देण्याचा विचार”: चंद्रशेखर बावनकुळे
7
'पंत तूने क्या किया!' कॅच नव्हे त्यानं टीम इंडियाला टेन्शन फ्री करण्याची संधी सोडली
8
"ते नेमकं काय म्हणाले माहित नाही, मी..."; एकनाथ शिंदेंच्या 'जय गुजरात'वर अजित दादांची पहिली प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?
9
नीचभंग दशांक योग: ८ राशींना पद-पैसा-लाभ, ४ ग्रहांची साथ; विठ्ठलाचे वरदान, शुभ-कल्याणच होईल!
10
‘जय गुजरात’वरून टीका; शिंदे गटाच्या नेत्यांनी उद्धव ठाकरेंचा ‘तो’ व्हिडिओच दाखवला, दिले उत्तर
11
महाराष्ट्रात मराठी शिकण्याचा आग्रह करू शकतो, पण दुराग्रह करू शकत नाही- CM देवेंद्र फडणवीस
12
स्लिपमध्ये कॅच घेताना अंदाज चुकला! ब्रूकनं मारलेला चेंडू थेट शुबमन गिलच्या डोक्याला लागला (VIDEO)
13
सोमनाथ सूर्यवंशी कोठडीतील मृत्यू प्रकरण; पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे न्यायालयाचे आदेश
14
'देशांतर्गत बाबींमध्ये हस्तक्षेप करू नका', भारताने दलाई लामांना पाठिंबा दिल्याने चीन संतापला
15
भारताचा बुद्धीबळपटू डी. गुकेशचा मोठा पराक्रम; वर्ल्ड नंबर वन कार्लसनची जिरवली!
16
मथुरा श्रीकृष्ण जन्मभूमी प्रकरण: हिंदू पक्षाला झटका, शाही ईदगाहला वादग्रस्त ढाचा घोषित करण्याची मागणी HC नं फेटाळली
17
ENG vs IND : जलद शतकी खेळीसह Jamie Smith चा पराक्रम! १४८ वर्षांत असं पहिल्यांदा घडलं
18
'रामायण'मध्ये दिग्गज कलाकारांची फौज रावणावर तुटून पडणार, अमिताभसह कोण साकारणार कोणती भूमिका?
19
'बिहार की बेटी', PM मोदींनी उल्लेख केलेल्या त्रिनिदादच्या पंतप्रधान कोण? बिहारशी काय संबंध?
20
एकनाथ शिंदेंच्या 'जय गुजरात'वर प्रतिक्रिया देताना देवेंद्र फडणवीसांनी घेतले शरद पवारांचे नाव

दोन शिक्षकांचे वेतन काढले

By admin | Updated: May 30, 2014 23:42 IST

अहेरी पंचायत समिती अंतर्गत एक अविवाहीत महिला शिक्षिका मुळ पदस्थापनेवर कार्यरत आहे. मात्र या महिला शिक्षिकेचे वेतन वेलगुरच्या जिल्हा परिषद शाळेतून काढून पंचायत समितीच्या

एकाच आस्थापनेवर : अहेरी पं. स. शिक्षण विभागातील प्रकारआलापल्ली : अहेरी पंचायत समिती अंतर्गत एक अविवाहीत महिला शिक्षिका मुळ पदस्थापनेवर कार्यरत आहे. मात्र या महिला शिक्षिकेचे वेतन   वेलगुरच्या जिल्हा परिषद शाळेतून काढून पंचायत समितीच्या शिक्षण विभागाने आपल्या अकलेचे वाभाडे काढले आहे. विशेष म्हणजे एकाच आस्थापनेवर दोन पदवीधर शिक्षकांचे वेतन काढल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. प्राप्त माहितीनुसार अहेरी पंचायत समिती अंतर्गत एका अविवाहित महिला शिक्षिकेची मुळ पदस्थापना दुसरीकडे आहे. मात्र या शिक्षिकेचे वेतन वेलगुरच्या शाळेतून काढण्यात येते. महिन्याकाठी ४0 हजार रूपये वेतन उचलणारी ही पदवीधर शिक्षिका असून सध्या ती तिसर्‍याच ठिकाणी म्हणजे कस्तुरबा गांधी बालिका विद्यालयात अध्यापनाचे कार्य करीत आहे. मागील सहा महिन्यापासून या शिक्षिकेला वेतन दिले जात असून मात्र मुळ पदस्थापनेच्या ठिकाणी वर्ग रिकामाच आहे. यामुळे विद्यार्थी वार्‍यावर असतांनासुद्धा अहेरी पंचायत समितीला गुणवत्तेशी काहीही देणे-घेणे नसल्याचे दिसून येते. या प्रकाराकडे केंद्रप्रमुख, शिक्षण विस्तार अधिकारी व गटशिक्षणाधिकारी यांचे दुर्लक्ष होत आहे. प्रशासनाच्या सुस्त कारभारामुळे सदर शिक्षिकेचे वर्तन खूप उद्धटपणाचे असल्याचे समजते. देचलीपेठा, दामरंचासारख्या दुर्गम भागात पदवीधर शिक्षकांची पदे रिक्त असतांना अहेरी पंचायत समितीच्या अधिकार्‍यांचे या अविवाहित पदवीधर शिक्षिकेवर भलतीच मेहर नजर असल्याचे दिसून येते. ६ महिन्यापूर्वी सदर शिक्षिकेच्या गैरवर्तनाबाबत शाळा व्यवस्थापन समितीच्या पदाधिकार्‍यांनी पंचायत समितीकडे तक्रार केली. अधिकार्‍यांनी थातूरमातूर चौकशी करून सदर प्रकरण दाबले. या शिक्षिकेच्या गैरवर्तनामुळे विद्यार्थ्यांना शाळेत न पाठविण्याची नामुष्की ओढवली होती. मात्र उलट सदर शिक्षिकेला शैक्षणिक कार्य करण्यासाठी इतरत्र पदस्थापना देण्यात आली, अशी माहिती एका ग्रामपंचायतीच्या माजी सदस्यांनी दिली आहे. याबाबत अहेरी पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी यांच्याशी भ्रमणध्वनीवर संपर्क साधून विचारणा केली. यावर तीन महिन्याचे वेतन चुकीमुळे काढण्यात आले, मात्र आता त्यामध्ये दुरूस्ती करू, एवढेच बोलून त्यांनी भ्रमणध्वनी बंद केला. यावरून याप्रकरणात अहेरी पंचायत समितीच्या अधिकार्‍यांकडून कमालीची गुप्तता बाळगल्या जात असल्याचे दिसून येते. (वार्ताहर)