शहरं
Join us  
Trending Stories
1
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
2
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
3
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी हॉस्पिटल उपचार सुरू
4
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
5
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
6
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
7
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
8
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
9
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
10
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
11
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
12
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
13
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
14
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
15
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
16
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
17
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
18
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
19
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
20
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
Daily Top 2Weekly Top 5

दोन लाख कुटुंब शौचालयाविना

By admin | Updated: January 10, 2015 22:55 IST

प्रत्येक कुटुंबाकडे शौचालय असावे, यासाठी शासनाकडून अनेक प्रयत्न करण्यात येत असले तरी जिल्ह्यातील एकूण २ लाख ४५ हजार ७४५ कुटुंबांपैकी १ लाख ७६ हजार ६६२ कुटुंबांकडे शौचालय नाही.

गडचिरोली : प्रत्येक कुटुंबाकडे शौचालय असावे, यासाठी शासनाकडून अनेक प्रयत्न करण्यात येत असले तरी जिल्ह्यातील एकूण २ लाख ४५ हजार ७४५ कुटुंबांपैकी १ लाख ७६ हजार ६६२ कुटुंबांकडे शौचालय नाही. त्यामुळे या कुटुंबांमधील जवळपास आठ लाख नागरिक उघड्यावरच शौचास बसतात. उघड्यावर शौचास बसल्याने ग्रामीण भागांमध्ये पावसाळा व हिवाळ्यामध्ये अनेक रोगांच्या साथी पसरतात. महिलांना पोटाचे विकार होतात. यापासून मुक्ती मिळविण्यासाठी प्रत्येक घरी शौचालय असणे आवश्यक आहे. त्याचबरोबर या शौचालयाचा वापरही होणे गरजेचे आहे. शौचालय बांधकामासाठी जवळपास २० हजार रूपये खर्च येत असल्याने प्रत्येक कुटुंब शौचालय बांधू शकत नाही. अशा कुटुंबांना शौचालय बांधकामासाठी आर्थिक सहकार्य मिळावे, यासाठी शासनाने ‘निर्मल भारत अभियान’ सुरू केले होते. भाजपा सरकारने या अभियानाचे नाव बदलवून ‘स्वच्छ भारत मिशन’ हे ठेवले आहे. या अभियानांतर्गत ज्या कुटुंबाकडे शौचालय नाही, अशा कुटुंबाला शौचालय बांधण्यासाठी शासनाकडून १२ हजार रूपयांचे अनुदान उपलब्ध करून दिले जाते. शौचालय बांधकामासाठी आवश्यक असलेला निधीसुद्धा शासनाकडून तत्काळ उपलब्ध करून दिला जातो. गडचिरोली जिल्ह्यात एकूण २ लाख ४५ हजार ७४५ कुटुंब आहेत. त्यापैकी ६९ हजार ८३ कुटुंबांकडे शौचालय आहे. मात्र १ लाख ७६ हजार ६६२ कुटुंबांकडे अजूनही शौचालय नाही. यातील १ लाख ६७ हजार ८०७ ग्रामीण कुटुंबांकडे तर ८ हजार ८५५ शहरी कुटुंबांकडे शौचालयाची सुविधा उपलब्ध नाही.शौचालयशिवाय ग्रामीण भागातील दुर्गंधी हटविणे अशक्य असल्याने शासनाने शौचालय बांधकामासाठी जेवढा निधी आवश्यक आहे, तेवढा निधी उपलब्ध करून देण्याचे धोरण अवलंबिले आहे. शौचालय बांधून त्याचा वापर करण्याविषयी माध्यमांद्वारे व्यापक प्रमाणात जनजागृती करण्यात येत आहे. मात्र प्रशासकीय यंत्रणा याची अंमलबजावणी अत्यंत धिम्म्यागतीने करीत आहे.शौचालय बांधकामासाठी लाभार्थ्याची निवड झाल्यानंतर कित्येक महिने त्याला निधीच उपलब्ध करून दिला जात नाही. शौचालयाचे महत्व नागरिकांना पटवून दिले जात नाही. त्यामुळे जिल्ह्याच्या दुर्गम व ग्रामीण भागातील बहुतांश नागरिकांना शौचालय बांधकामासाठी अनुदान मिळते, हेसुद्धा माहीत नाही. त्यामुळे इच्छा असूनही शौचालय बांधू शकत नाही. गावातील तलाठी, ग्रामसेवक, शिक्षक व इतर कर्मचाऱ्यांनी नागरिकांमध्ये शौचालय बांधकामाबाबत जनजागृती करण्याची गरज आहे. (नगर प्रतिनिधी)