शहरं
Join us  
Trending Stories
1
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
2
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
3
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
4
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
5
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
6
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
7
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
8
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
9
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
10
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
11
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
12
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
13
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
14
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
15
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
16
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
17
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
18
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
19
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
20
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
Daily Top 2Weekly Top 5

चारचाकी वाहनाच्या धडकेत दोघे ठार; एक जण गंभीर

By admin | Updated: August 20, 2014 23:31 IST

एका दुचाकीवर बसून पोर्लाकडे जाणाऱ्या मित्रांच्या दुचाकीला आरमोरीकडून येणाऱ्या चारचाकी वाहनाने धडक दिल्याने दोघे जण ठार झाल्याची घटना मंगळवारी रात्री ८.१५ वाजताच्या सुमारास

गडचिरोली : एका दुचाकीवर बसून पोर्लाकडे जाणाऱ्या मित्रांच्या दुचाकीला आरमोरीकडून येणाऱ्या चारचाकी वाहनाने धडक दिल्याने दोघे जण ठार झाल्याची घटना मंगळवारी रात्री ८.१५ वाजताच्या सुमारास गडचिरोली तालुक्यातील मोहझरी गावाजवळ घडली. एमएच ३३-७८६६ या टाटा सफारी वाहनाचे चालक प्रवीण चंदू जाकेवार आरमोरीवरून गडचिरोलीकडे घेऊन येत होते. दरम्यान गणेश विजय मस्कावार (१९) अंबूज संजय भंडारे (२१), दिनेश दिलीप चिताडे (२७) सर्वजण रा. मूल हे दुचाकीने पोर्लाकडे जात असताना मोहझरीजवळ विरूध्द दिशेने येणाऱ्या टाटा सफारीला धडक दिली. या धडकेत गणेश विजय मस्कावार, अंबू संजय भंडारे हे दोघेजण जागीच ठार झाले. तर दिनेश दिलीप चिताडे हा गंभीर जखमी झाला. दिनेश चिताडे याला उपचारार्थ नागपूर येथे भरती करण्यात आले आहे. मात्र त्याची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.गणेश मस्कावार, भंडारे व चिताडे हे पोर्ला येथे जात असताना त्यांच्या दुचाकीला हेडलाईट नसल्यामुळे मोहझरीपासून अर्धा किमी अंतरावर अंधारात दुचाकी विरूध्द दिशेला गेली. दरम्यान आरमोरीकडून येणाऱ्या चारचाकी वाहनाने दुचाकीला जबर धडक दिली. या धडकेत दोघे ठार झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. सफारी टाटा वाहन चालक प्रवीण चंदू जाकेवार रा. येल्ला ता. सिरोंचा हल्ली मु. रामनगर याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. सदर वाहन हे गडचिरोली येथील लिना हकीम यांच्या मालकीचे असल्याची माहिती मिळाली आहे. घटनेचा तपास ठाणेदार उमेश बेसरकर यांच्या मार्गदर्शनात पोलीस हवालदार निलकंठ पेंदाम करीत आहेत. (शहर प्रतिनिधी)