शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानचा दुहेरी डाव! US-इराण शांतता चर्चा निष्फळ ठरताच १३००० सैनिक सौदीत पाठवले, कारण काय?
2
"शरद पवारांनी बारामती उभी केली नसती, तर महाराष्ट्रात..."; संजय राऊतांचे रोखठोक विधान
3
फक्त ७ वर्ष...! चीन आणि अमेरिकेलाही मागे टाकणार भारताची ऑटो इंडस्ट्री, नितीन गडकरींनी सांगितला 'मास्टर प्लान'
4
Latest Marathi News LIVE: कल्याण- अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ८ जण ठार झाल्याची माहिती
5
Middle East War: खर्ग बेट, बंदर अब्बासवर अमेरिकेचा डोळा; इराणची कोंडी करण्यासाठी ट्रम्प यांचा मास्टरप्लॅन
6
'होर्मुझ'वरून तणाव वाढला! अमेरिका आजपासून करणार इराणची नाकेबंदी, सेंट्रल कमांडचा इशारा
7
UPI अ‍ॅप्समध्येही असतं का 'Undo' बटण, चुकीच्या UPI ID वर पैसे गेल्यास कसे मिळवाल परत?
8
प्रशासनाचा प्रस्ताव धुडकारला, वाहनांना लावली आग; नोएडात ३ दिवसांपासून रस्त्यावर का उतरले कर्मचारी?
9
पिंपरी: धक्कादायक! प्राध्यापकाच्या छळामुळे विद्यार्थिनीने उचललं टोकाचं पाऊल, एकाला अटक
10
Aditya Dhar Net Worth: ‘धुरंधर’च्या दिग्दर्शकाकडे किती आहे संपत्ती? मुंबई ते हिमाचलपर्यंत आहे प्रॉपर्टी
11
Gold Silver Price Today: आज सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; खरेदी करणार असाल तर पाहा तुमच्या शहरातील २४K, २२K, १८K Gold चे नवे दर
12
IPL 2026 Points Table : गत चॅम्पियन RCB टॉप ३ मध्ये; पाचवेळच्या विजेत्या MI अन् CSK ची अवस्था बिकट
13
CET Exam: 'सीईटी'ची केंद्रे दूर; विद्यार्थ्यांचे प्रचंड हाल, पालकांमध्ये तीव्र नाराजी
14
धर्मांतर प्रयत्नप्रकरणी नाशिकमधील 'त्या' बहुराष्ट्रीय कंपनीतील आरोपी निलंबित
15
गोकूळमध्ये गैरप्रकार? शिवाजीराव पाटलांच्या आरोपांवर हसन मुश्रीफ यांचं स्पष्टीकरण
16
ABMCM: अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या बचावासाठी सरसावले चित्रपट व्यावसायिक
17
Asha Bhosle: सूरसम्राज्ञी आशा भोसलेंचा पहिला नमस्कार अंबाबाईला.. दुसरा सरस्वतीला
18
Kolhapur: 'केडीसीसी'ची खुर्ची एवढी वजनदार, की कर्मचाऱ्यांना दहा वर्षे सोडवेना
19
वेतनवाढीच्या मागणीवरून कामगार आक्रमक; वाहनांची तोडफोड आणि दगडफेक, नोएडातील घटना!
20
सिंधुदुर्ग जिल्ह्यात ग्रामपंचायतीच्या १००हून अधिक रिक्त जागांसाठी पोटनिवडणुकीची नोटीस जारी
Daily Top 2Weekly Top 5

वाघाच्या हल्ल्यात दोन शेळ्या ठार, तिसरीला पळवले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 28, 2021 05:00 IST

वनपरिक्षेत्र कार्यालय कुनघाडा रै.,  उपक्षेत्र जोगना येथे दिलेल्या तक्रारीनुसार, शेळी मालक पोचू येगावार हे दररोजच्याप्रमाणे कक्ष  क्रमांक ४० च्या जंगल परिसरात आपल्या शेळ्या चारण्यासाठी गेले होते. यावेळी दबा धरून बसलेल्या पट्टेदार वाघाने झडप घालून दोन शेळ्यांना जागीच ठार केले. याशिवाय एका जखमी शेळीला जंगलात पळवून नेले. शेळी मालकाने आरडाओरड केली, पण वाघाच्या भीतीपोटी कोणीच मदतीसाठी आले नाही . 

लाेकमत न्यूज नेटवर्कचामोर्शी : वनपरिक्षेत्र कार्यालय कुनघाडा रै. अंतर्गत येणाऱ्या जोगना उपक्षेत्रातील कुथेगाव जंगल परिसरात बुधवारी वाघाने दोन शेळ्यांना जागीच ठार केले. याशिवाय एका शेळीला जबड्यात पकडून जंगलात पळवून नेले. पोचू गंगा येगावार असे शेळी मालकाचे नाव आहे. ही घटना दुपारी एक ते दीड वाजताच्या दरम्यान घडली. वनपरिक्षेत्र कार्यालय कुनघाडा रै.,  उपक्षेत्र जोगना येथे दिलेल्या तक्रारीनुसार, शेळी मालक पोचू येगावार हे दररोजच्याप्रमाणे कक्ष  क्रमांक ४० च्या जंगल परिसरात आपल्या शेळ्या चारण्यासाठी गेले होते. यावेळी दबा धरून बसलेल्या पट्टेदार वाघाने झडप घालून दोन शेळ्यांना जागीच ठार केले. याशिवाय एका जखमी शेळीला जंगलात पळवून नेले. शेळी मालकाने आरडाओरड केली, पण वाघाच्या भीतीपोटी कोणीच मदतीसाठी आले नाही . 

आठवडाभरात दुसरा हल्ला-    घटनेची माहिती मिळताच क्षेत्र सहायक विवेकानंद चांदेकर आणि वनरक्षक बी.एन. गोटा यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. याच  हप्त्यात २३ ऑक्टोबर रोजी बांधोना जंगल परिसरात इरई येथील एका वृद्ध महिलेला वाघाने गंभीर जखमी केले होते. आता शेळ्या मारल्यामुळे परिसरात वाघाची दहशत पसरली  असून नागरिक धास्तावले आहेत. -   सध्या खरीप हंगाम कापणी व बांधणीच्या कामाला सुरुवात झाल्यामुळे परिसरातील नागरिक शिंद कापण्यासाठी जंगलात जात असतात. नागरिकांनी स्वतःची काळजी घ्यावी, एकटेदुकटे जंगलात फिरू नये, रात्रीच्या वेळी जंगलात जाणे टाळावे, असे आवाहन क्षेत्रसहायक चांदेकर यांनी केले आहे.

 

टॅग्स :Tigerवाघ