शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदीचे दोन्ही जीआर रद्द, त्रिभाषा सूत्राचा निर्णय घेण्यासाठी नवी समिती स्थापन
2
राज्य सरकारला घेरण्याची विरोधी पक्षांची रणनीती; मविआचा सरकारच्या चहा पानावर बहिष्कार, जनतेला वाऱ्यावर सोडले
3
प्रशासकीय सीमा ३१ डिसेंबरला होणार ‘फ्रीझ’, जनगणना : नंतर होणार नाही नवे गाव, जिल्हा, महापालिका
4
विकले जात राहणे हेच पाकिस्तानचे नशीब
5
अधिवेशनाकडून अपेक्षा; विरोधक हिंदीच्या मुद्द्यावरून अधिवेशनापूर्वीच एकवटले
6
कार्ला येथील एकवीरा मंदिरात ड्रेसकोड; ७ जुलैपासून नव्या नियमांची अंमलबजावणी
7
लुटालुटीला आरटीओची मूक संमती? अधिकृत रिक्षा स्टॅंडवर दरपत्रकच नाही; कल्याण आरटीओ क्षेत्रातील वास्तव
8
मुंबई काँग्रेसबद्दल दिल्लीत आज काही निर्णय होईल का?
9
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
10
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
11
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
12
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
13
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
14
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
15
...म्हणून मराठी माणूस मुंबईत राहू शकत नाही !
16
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
17
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
18
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
19
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
20
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...

वाहनासह साडेदहा लाखांचा दारूसाठा जप्त

By admin | Updated: April 23, 2017 01:28 IST

उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय गडचिरोली व कसनसूर पोलिसांनी धाड टाकून चारचाकी वाहनासह

एसडीपीओंचे पथक : रेगडीगट्टा व पारडी फाट्यावर कारवाई गडचिरोली : उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय गडचिरोली व कसनसूर पोलिसांनी धाड टाकून चारचाकी वाहनासह एकूण १० लाख ८२ हजार रूपयांचा दारूसाठा जप्त केल्याची कारवाई दोन दिवसात केली. गडचिरोलीच्या एसडीपीओ पथकाने शनिवारी तर कसनसूर पोलिसांनी रेगडीगट्टा येथे शुक्रवारी सायंकाळच्या सुमारास ही कारवाई केली. गडचिरोली एसडीपीओ कार्यालयाच्या पोलीस कर्मचाऱ्यांना व्याहाड येथील दोन इसम चारचाकी वाहनाने गडचिरोली शहरात देशी दारूची आयात करून त्याचा पुरवठा चिल्लर दारूविक्रेत्यांना करणार आहेत, अशी गोपनीय माहिती मिळाली. या माहितीच्या आधारे एसडीपीओ पथकाच्या कर्मचाऱ्यांनी चंद्रपूर मार्गावरील पारडी फाट्यावर सापळा रचला. दरम्यान एमएच-३४-के-५५५५ क्रमांकाची मारोती सुझुकी चारचाकी वाहन येताना दिसले. या वाहनाला अडवून तपासणी केली असता वाहनामध्ये १ लाख ८ हजार रूपये किंमतीचा दारूसाठा आढळून आला. पोलिसांनी या वाहनातून देशी दारूचे १६ खोके जप्त केले. यामध्ये १ हजार ६०० निपा होत्या. याप्रकरणी महेश रवींद्र गड्डमवार (२२), विशाल कवडू कवाडकर (२१) दोघेही रा. व्याहाड ता. सावली जि. चंद्रपूर यांचेवर मुंबई दारूबंदी कायद्याच्या कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास एसडीपीओ कार्यालयाचे पोलीस हवालदार गणेश पवार करीत आहेत. एटापल्लीचे उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली कसनसूर पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी विष्णू वाडकर यांनी आपल्या कर्मचाऱ्यांसह रेगडीगट्टा येथे धाड टाकून ८ लाख १६ हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त केला. या दारूविक्रेत्यांच्या घरून गोल्डन गोवा विस्कीच्या एकूण १७० पेट्या दारू जप्त करण्यात आली. सदर दारू तस्करी प्रकरणातील मुख्य आरोपी मनोज मुजूमदार व कृष्णा मुजूमदार हे दोघेजण फरार आहेत. त्यांच्यावर कसनसूर उपपोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.