शहरं
Join us  
Trending Stories
1
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
2
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
3
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
4
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
5
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
6
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
7
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
8
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
9
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
10
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
11
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
12
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
13
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
14
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
15
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
16
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
17
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
18
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
19
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
20
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
Daily Top 2Weekly Top 5

साडेचार हजार सावित्रींच्या लेकींचा बसमधून प्रवास

By admin | Updated: August 21, 2016 03:38 IST

मानव विकास कार्यक्रमांतर्गत इयत्ता आठवी ते बारावीच्या विद्यार्थिनींना राज्य परिवहन महामंडळाच्या बसमधून

मानव विकासची योजना : शाळा नसलेल्या गावातील विद्यार्थिनींना सुविधागडचिरोली : मानव विकास कार्यक्रमांतर्गत इयत्ता आठवी ते बारावीच्या विद्यार्थिनींना राज्य परिवहन महामंडळाच्या बसमधून स्वगावापासून शाळेपर्यंत मोफत प्रवास देण्याची योजना कार्यान्वित करण्यात आली आहे. या योजनेंतर्गत सन २०१६-१७ या चालू शैक्षणिक सत्रात जिल्ह्याच्या ११ तालुक्यातील तब्बल ४ हजार ५७२ विद्यार्थिनींचा मोफत प्रवास सुरू असून त्यांना शिक्षणाचे धडे गिरविणे सुलभ झाले आहे. मानव विकास निर्देशांक कमी असलेल्या जिल्ह्यातील गडचिरोली, आरमोरी, कुरखेडा, कोरची, धानोरा, चामोर्शी, मुलचेरा, अहेरी, एटापल्ली, भामरागड व सिरोंचा या ११ तालुक्यांचा समावेश मानव विकास कार्यक्रमांच्या योजनांमध्ये करण्यात आला आहे. मानव विकास मिशनच्या योजनेतून देसाईगंज तालुक्याला वगळण्यात आले आहे. मानव विकास मिशन अंतर्गत शाळकरी विद्यार्थिनींना मोफत बस प्रवास व मोफत सायकल वाटप करण्याची योजना आहे. मानव विकास कार्यक्रमांतर्गत ज्या गावांमध्ये इयत्ता आठवी ते बारावीपर्यंतच्या शिक्षणाची सुविधा नाही. अशा माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा नसलेल्या गावांमधील विद्यार्थिनींना बाहेरगावी शिक्षण घेणे सुलभ व्हावे, या उद्देशाने मोफत बस वाहतुकीची सुविधा या योजनेतून देण्यात येत आहे. मानव विकास मिशनच्या ७७ बसफेऱ्या ५०७ गावांच्या परिसरातील मार्गावर सुरू असून २४९ शाळांमधील ४ हजार ५७२ विद्यार्थिनींना गावापासून शाळेपर्यंत ने-आण करीत आहेत. या सुविधेमुळे सर्वसामान्य विद्यार्थिनींना शिक्षण घेणे सुलभ झाले आहे. या योजनेची अंमलबजावणी जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शिक्षण विभागामार्फत सुरू आहे. (स्थानिक प्रतिनिधी)