शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
3
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
4
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
5
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
6
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
7
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
8
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
9
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
10
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
11
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
12
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
13
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
14
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
15
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
16
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
17
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
18
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
19
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
20
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
Daily Top 2Weekly Top 5

कृषी महाविद्यालय इमारतीचे हस्तांतरण रखडले

By admin | Updated: March 23, 2017 00:57 IST

गडचिरोली जिल्ह्याचे तत्कालीन पालकमंत्री आर. आर. पाटील यांच्या पुढाकारातून गडचिरोली येथे शासकीय कृषी महाविद्यालयाच्या इमारतीचे काम मंजूर करण्यात आले.

दीड वर्षापासून इमारत तयार : देयकाचे चार कोटी ६५ लाख शासनाकडे प्रलंबितगडचिरोली : गडचिरोली जिल्ह्याचे तत्कालीन पालकमंत्री आर. आर. पाटील यांच्या पुढाकारातून गडचिरोली येथे शासकीय कृषी महाविद्यालयाच्या इमारतीचे काम मंजूर करण्यात आले. सदर काम दीड वर्षापूर्वीच पूर्णत्वास आले. मात्र संबंधित कंत्राटदाराचे ४ कोटी ६५ लाख रूपयांचे देयके प्रलंबित असल्याने सदर कृषी महाविद्यालयाची इमारत हस्तांतरित करण्यात आली नाही. गेल्या वर्षभरापासून या प्रश्नाकडे राज्य सरकारचे प्रचंड दुर्लक्ष होत आहे. गडचिरोली येथील शासकीय कृषी महाविद्यालय हे कृषी विज्ञान केंद्राच्या इमारतीत सुरू आहे. या महाविद्यालयात एकूण २७० विद्यार्थी यंदाच्या शैक्षणिक सत्रात शिक्षण घेत आहेत. कृषी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी प्रात्यक्षिक हॉल, ग्रंथालय, प्रयोगशाळा, वाचनालय तसेच इतर सोयीसुविधा या कृषी विज्ञान केंद्राच्या इमारतीत नाहीत. त्यामुळे कृषी महाविद्यालयाची प्रशस्त इमारत होणे गरजेचे आहे, हे लक्षात घेऊन तत्कालीन पालकमंत्री पाटील यांनी गडचिरोली येथे इमारत मंजूर करून घेतली. कोट्यवधी रूपयांच्या निधीतून ही इमारत पूर्णत्वास आली आहे. मात्र संबंधित कंत्राटदाराचे ४ कोटी ६५ लाखांचे देयके अद्यापही प्रलंबित आहे. त्यामुळे विद्युतीकरणासह सर्व कामे पूर्ण होऊनही ही इमारत हस्तांतरीत झाली नाही. त्यामुळे २५० वर विद्यार्थ्यांना अपुऱ्या इमारतीत कृषीचे शिक्षण घ्यावे लागत आहे. तोकड्या इमारतीमुळे येथे प्राध्यापकांनाही अडचण जाणवत आहे.