लोकमत न्यूज नेटवर्ककुरखेडा : आयएएस १८ प्रशिक्षणार्थ्यांनी गुरूवारी कुरखेडा येथील अगरबत्ती प्रकल्पाला भेट देऊन येथील माहिती जाणून घेतली. तसेच कढोली येथील ग्रामपंचायतीला भेट देऊन ग्रामपंचायतीचे कामकाज महिला बचत गटाचे काम याबाबत सविस्तर माहिती घेतली.आयएएस १८ प्रशिक्षणार्थ्यांच्या चमूचे कुरखेडा येथे आगमन होताच वन विभागाच्या कार्यालयात उपविभागीय अधिकारी विशाल मेश्राम, तहसीलदार अजय चरडे, ठाणेदार योगेश घारे, वन परिक्षेत्र अधिकारी सचिन डोंगरवार यांनी त्यांचे स्वागत केले. त्यानंतर कुरखेडा येथे अगरबत्ती प्रकल्पात चालणाºया प्रत्यक्ष कामाची माहिती देण्यात आली. क्षेत्र सहायक एस. बी. कायते, वनरक्षक माणिक राऊत, कादर शेख, यांनी प्रकल्पात अगरबत्ती तयार करण्याच्या कामाबाबत माहिती दिली. अगरबत्तीसाठी लागणार कच्चा माल, बांबू तसेच अगरबत्ती निर्मिती, निर्मितीनंतर बाजारपेठेत अगरबत्ती पाठविण्याची व्यवस्था याबाबत माहिती दिली. तसेच वनाधिकाºयांनी प्रशिक्षणार्थ्यांना वन विभागातील विविध विकास कामांची माहिती दिली. वन विभाग कार्यालयामार्फत इतर रोजगारपूरक योजना राबविल्या जात आहेत. त्यामुळे अनेकांना रोजगार मिळाल्याची माहिती प्रशिक्षणार्थ्यांना देण्यात आली. त्यानंतर आयएएस प्रशिक्षणार्थ्यांची चमू कढोलीकडे रवाना झाली. कढोली येथे पोहोचल्यानंतर ग्राम पंचायत कार्यालयाला भेट देण्यात आली. या भेटीदरम्यान प्रशिक्षणार्थ्यांनी बचत गटाच्या कामाचा आढावा घेतला.
अगरबत्ती प्रकल्पाला प्रशिक्षणार्थ्यांची भेट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 25, 2018 23:59 IST
आयएएस १८ प्रशिक्षणार्थ्यांनी गुरूवारी कुरखेडा येथील अगरबत्ती प्रकल्पाला भेट देऊन येथील माहिती जाणून घेतली. तसेच कढोली येथील ग्रामपंचायतीला भेट देऊन ग्रामपंचायतीचे कामकाज महिला बचत गटाचे काम याबाबत सविस्तर माहिती घेतली.
अगरबत्ती प्रकल्पाला प्रशिक्षणार्थ्यांची भेट
ठळक मुद्दे१८ जणांची चमू : कुरखेडा व कढोलीतील जाणली माहिती