शहरं
Join us  
Trending Stories
1
विरोधी पक्षांसह सत्ताधारी आमदार, खासदार 'मैदाना'त, उपोषणावर बसलेले मनोज जरांगे पाटील यांची भेट घेत दिला पाठिंबा
2
फडणवीसांचे सरकार पाडण्यासाठी अजित पवारांचे नेते सामील, लक्ष्मण हाके यांचा आरोप
3
आंदोलनादरम्यान, पोलिसांच्या मदतीला पाऊस आला धावून...
4
आजचे राशीभविष्य, ३० ऑगस्ट २०२५: कौटुंबिक वातावरण आनंदी असेल, वाणीवर संयम ठेवावा !
5
...आणि पोलिसांचा थेट जरांगे यांना व्हिडीओ कॉल!
6
मराठा बांधवांनो, फक्त १० रुपयांत मुंबईत राहा, अशी आहे शक्कल
7
उर्जित पटेल आयएमएफच्या कार्यकारी संचालकपदी
8
मुसळधार पावसाचा सामना करत मुंबईमध्ये लोटला 'मराठा'सागर
9
Manoj Jarange Patil Morcha Update Live: मराठ्यांना आरक्षण देऊन टाकावं, मनं जिंकण्याची हीच संधी : मनोज जरांगे-पाटील
10
विजयाशिवाय मागे हटणार नाही, सरकारने सहकार्य केले, आपणही सहकार्य करू : जरांगे पाटील
11
भारतावरील 'टॅरिफ' रशियन तेलामुळे नाही, तर ट्रम्प यांच्या नाराजीमुळे; अमेरिकन कंपनीचा दावा
12
आरक्षण द्यायचं, आंदोलन मोडायचं, की मला गोळ्या घालायच्या...; मनोज जरांगे-पाटील यांचा थेट इशारा
13
जेवणात भाजी का बनवली नाही? पतीने पत्नीला रागात विचारलं; चिडलेल्या पत्नीने टोकाचं पाऊल उचललं!
14
ऐन गणेशोत्सवात लालबागला जाणाऱ्या प्रवाशांचा होणार खोळंबा : ब्लॉकमुळे चिंचपोकळी, करीरोड स्टेशनवर लोकल नसणार!
15
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची इच्छा पूर्ण होणार, प्रत्येक कोपऱ्यात मराठे दिसणार! मनोज जरांगे-पाटील काय म्हणाले?
16
५० कोटींची अत्याधुनिक इमारत; CM योगी आदित्यनाथ यांच्या हस्ते उत्तर प्रदेश निवडणूक आयोगाच्या नवीन कार्यालयाचे भूमीपूजन!
17
उधारीच्या वादातून वाहन विक्रेत्याचे अपहरण, मारहाणीचा व्हिडीओ स्नॅपचॅटवर अपलोड!
18
नागपूर हादरले! चाकू काढला आणि छातीवर सपासप वार; दहावीतील विद्यार्थिनीची शाळेसमोरच हत्या
19
Maratha Morcha Mumbai: मनोज जरांगेंना दिलासा, पण एका दिवसाचाच! पोलिसांचा निर्णय काय?
20
'तुमचं तोंड भाजेल'; CM फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर पलटवार, आरक्षणाच्या मुद्द्यावरून सुनावलं

ढाल पूजनाची परंपरा कायमच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 18, 2017 23:54 IST

समाजात असंख्य जाती-जमाती, त्यांच्या उपजाती आजही आपला पारंपरिक व्यवसाय आणि प्रथा, परंपरा जोपासत सुखनैव जीवन जगत आहेत. त्यातलीच एक जमात आहे गोवारी.

ठळक मुद्देविसोरा परिसरात केले जाते पूजन : स्वातंत्र्यपूर्व काळापासून नागरिकांनी जोपासला विधी

विष्णू दुनेदार/ अतुल बुराडे।लोकमत न्यूज नेटवर्कतुळशी/ विसोरा : समाजात असंख्य जाती-जमाती, त्यांच्या उपजाती आजही आपला पारंपरिक व्यवसाय आणि प्रथा, परंपरा जोपासत सुखनैव जीवन जगत आहेत. त्यातलीच एक जमात आहे गोवारी. शेकडो वर्षांपासून वंशपरंपरागत गुरेढोरे राखणारी जमात म्हणजे गोवारी. मात्र आज या जमातीतील तरुणतरूणी काही प्रमाणात सुशिक्षित झाले असले तरी जमात बांधवांनी शेकडो सालांपासून चालत आलेली ढालपूजन ही वैशिष्ट्यपूर्ण परंपरा वर्तमानात सुरू ठेवली आहे, हे विशेष!महाराष्ट्र राज्याच्या पूर्व सीमेवर असलेल्या विदर्भ प्रदेशातील गडचिरोली, चंद्रपूर, गोंदिया, भंडारा या चार जिल्ह्यांमध्ये गोवारी, गोंडगोवारी हा समाज वसलेला आहे. पूर्वी गावखेड्यातील लोकांची जनावरे चारण्यासाठी नेणारे गुराखी बांधव म्हणजे गोवारी जमात. आजघडीला यात बदल झाला असला तरीसुद्धा बहुतांश गावात गोवारी बांधवच गुरे राखण्याची कामे करतोय. परंतु ग्रामीण भागातील गोवारी जमात ओळखली जाते दिवाळी सणाच्या पर्वावर केल्या जाणाºया ढालपूजन या आगळ्यावेगळ्या प्रथेसाठी. झाडीपट्टीत शेकडो वर्षांचा इतिहास लाभलेले अनेक उत्सव साजरे केले जातात. पूर्व विदर्भात गोवारींची संख्या मोठ्या प्रमाणात आहे.गोवारी लोकांचा मुख्य व्यवसाय गाई राखण्याबरोबरच शेती करणे हा आहे. ही जमात आजही पारंपरिक पध्दतीने आपले सण-उत्सव साजरे करतोे. स्वातंत्र्यपूर्व कालखंडापासून सुरु असलेली गोवारी जमातीची ढालपूजनाची परंपरा आजही ते जोपासत आहेत.ढालीची सजावट आकर्षक असते. मोरपिसे, शेल्ली, फुल्ली, दुप्पटा व खण अशी साधने वापरुन सजवलेली ढाल वाजतगाजत गाय गोदनापर्यंत आणली जाते. गोवारी बांधव ढाल धरणाºया समोर जोशात नाचतात. नंतर गोदनाजवळ पारंपरिक लाठी फेरण्याचा कार्यक्रम होतो. यामध्ये कुडा या वनस्पतीच्या लाठीला गेरु लावून वापर करतात. हा कार्यक्रम उपस्थित लोकांचे लक्ष वेधून घेतो. अशाप्रकाच्या ढाल पूजनाचा कार्यक्रम देसाईगंज तालूक्यातील तुळशी, कोकडी, विसोरा, शंकरपूर, चोप, कोरेगाव, बोळधा या ठिकाणचे गोवारी बांधव आजही मोठ्या उत्साहाने साजरा करतात. या उत्सवात नागरिकही सहभागी होतात.पूजा करण्याचा विधी व मिरवणूकगोवारी जमातीतील बांधव आपल्या पूर्वजांची स्मृती जपून त्यांचे पूजन करण्यासाठी आजही ढाल तयार करुन दिवाळीच्या दिवशी पूजन करतात. एका उंच बासावर लाकडी चौकट बसवून सजवतात तिला गोवारी ढाल म्हणतात. दिवाळीच्या दिवशी ती ढाल घरी उभी करतात व गायी गोदनाच्या वेळी वाजत- गाजत आखरावर आणली जाते. या निमित्याने गोवारी बांधव एकत्र येतात. गायी गोदनला गोवारी बांधव खूप महत्त्व देतात. दिवाळीच्या दिवशी गोदन तयार करण्यासाठी घोणस गवत व गाईचा शेण याचा वापर करतात. गोदन तयार झाल्यानंतर गावातील बांधव आपापल्या गाईंना गोदनावरुन नेतात. त्या नंतर ढालींची मिरवणूक काढतात. ढालीचे दोन प्रकार असतात. एक नर ढाल म्हणजे पुरुषाच्या स्मृती जोपासणारी तिला गोहळा म्हणतात तर दूसरी मादी ढाल म्हणजे स्त्रीच्या स्मृती जोपासणारी तीला गोहळी म्हणतात. गोवारी बांधव गोहळा-गोहळी ढालीला पुरुष व स्त्रीवाचक नाव सुध्दा देतात. गोवारी बांधव ढालीचे पूजन वर्षातून तीनदा आकाडी, मातापूजन व दिवाळीला करीत असले तरी दिवाळीच्या ढाल पूजनाला विशेष महत्त्व देतात व मिरवणूक काढतात.