मालेरमाल येथील आनंदाबाई वाटगुरे यांच्या घरासमोर खुशाल कावळे यांनी मुरमुरीकडे जणाऱ्या गावातील रस्त्यावर ट्रॅक्टर ठेवल्याने, शेतावर जाणाऱ्या अनेक शेतकऱ्यांना अडचणी येत आहेत. याच मार्गाने शेतकरी बैलबंडी, नांगर व अन्य साहित्य नेत असतात, याशिवाय दुचाकी, चारचाकी याच मार्गाने जात असतात, परंतु सदर मार्गावर कावळे यांनी ट्रॅक्टर ठेवल्याने रहदारी बाधित हाेत आहे. गावातील नागरिकांनी कावळे यांना याबाबत सांगितले. तीन नाेटीस दिले, परंतु त्यांनी ट्रॅक्टर हटविले नाही. कावळे यांनी माझी तक्रार करा, जे करायचे ते करा, मुजोरीने सांगितले. गावात वाद नकाे, म्हणून नागरिकांनी तहसीलदार, तसेच संवर्ग विकास अधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल केली आहे. ट्रॅक्टर लवकर न हटविल्यास पाेलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात येईल, असे सरपंच नरेंद्र मोहुर्ले, उपसरपंच नेताजी रायसिडाम यांनी सांगितले.
ट्रॅक्टरने अडविला गाववासीयांचा रस्ता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2021 04:23 IST