शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय संगीतविश्वाचा स्वर हरपला! 'महाराष्ट्र भूषण' ज्येष्ठ गायिका आशा भोसले काळाच्या पडद्याआड
2
शांतता चर्चा फिस्कटल्याने डोनाल्ड ट्रम्प चिडले; आता इराणची खैर नाही, घेराव टाकण्याची दिली धमकी
3
NCB ची मोठी कारवाई! गांजा तस्करी रॅकेटचा पर्दाफाश; २१० किलो गांजा जप्त, चौघांना अटक
4
“आशाजी, लवकरात लवकर बऱ्या व्हा”; पंतप्रधान मोदींकडून तब्येतीची विचारपूस अन् केली प्रार्थना
5
अमेरिका-इराण चर्चा फिस्कटली; काय होत्या अमेरिकेच्या प्रमुख मागण्या? आता पाकिस्ताननं दोघांकडे केली नवी मागणी
6
डॉक्टर, मला मृत्यू हवाय..., लिविंग विल हा पर्याय किती उपयुक्त?
7
Lakshya Mishra : Video - हॉस्टेलमध्ये लेकाचा गूढ मृत्यू; खिडकी पाहताच वडील म्हणाले, "माझ्या मुलाची हत्या झालीय"
8
सुविधा देताना रेल्वेचे 'सावत्र' प्रेम!; मध्य-पश्चिम रेल्वेत दुजाभाव होतोय, प्रवाशांची भावना
9
ट्रम्प यांना चैन पडेना, इराण चर्चेची प्रत्येक अपडेट घेतली; व्हान्स यांना हॉटलाइनवर फोनाफोनी!
10
IPL 2026: सुरुवात धमाकेदार, पण 'वैभव'शाली प्रवासाचा दीर्घ पल्ला शिल्लक
11
पाणी हेच पहिले औषध... पण किती आणि केव्हा प्यावे?
12
"अमेरिकेच्या अवास्तव मागण्या...!" इराणने अमेरिकेवर फोडलं शांतता चर्चा फिसकटण्याचं खापर; व्हॉन्स म्हणाले...
13
Ashok Kharat : औषधे आणि केबिनमधील ठसे; भोंदू अशोक खरातच्या कार्यालयाची पथकाकडून पुन्हा झडती
14
Manav Shah : Video-"एकटेपणा, जेलसारखं वाटायचं"; ४० लाखांचं पॅकेज सोडून भारतात परतला तरुण, काय घडलं?
15
खळबळजनक! अंगणवाडीत मुलांनी खाल्लं उंदीर मारण्याचं औषध, ५ जणांची प्रकृती बिघडली
16
पुन्हा युद्ध भडकणार? अमेरिका-इराण यांच्यात तोडगा नाहीच; पुढे काय होणार? जगाचे लक्ष लागले!
17
काळाचा घाला! हायवेवर गाडी पंक्चर, टायर बदलताना ट्रकने चिरडलं; ५ जणांचा मृत्यू
18
परळ- सीएसएमटी रेल्वे मार्गासाठी स्वदेशी मिल भागातील चाळी पडणार, ७१४ बाधित कुटुंबांचे पुनर्वसन पूर्ण
19
महिला मतदारांचा वाढता टक्का; यंदाच्या निकालात ठरणार ‘गेमचेंजर’, आसाम, केरळ आणि पुद्दुचेरीत यंदा 'या' मुद्द्यावर महिलांनी केले मतदान
20
NIRDPR मध्ये जॉब मिळवण्याची संधी; जाणून घ्या पात्रता आणि अर्ज प्रक्रिया!
Daily Top 2Weekly Top 5

वाघाची वन विभागाला हुलकावणी

By admin | Updated: May 26, 2017 02:17 IST

नरभक्षक वाघाला पकडण्यासाठी वन विभागाकडून रवी गावातील जंगल परिसरात आठ दिवसांपासून दोन पिंजरे लावले आहेत.

पिंजरे ठरले कुचकामी : गुंगीच्या इंजेक्शनसाठी परवानगीची प्रतीक्षालोकमत न्यूज नेटवर्कआरमोरी : नरभक्षक वाघाला पकडण्यासाठी वन विभागाकडून रवी गावातील जंगल परिसरात आठ दिवसांपासून दोन पिंजरे लावले आहेत. मात्र वाघ पिंजऱ्यात न अडकता हुलकावणी देत आहे. वाघाला पकडण्यासाठी त्याला गुंगीचे इंजेक्शन देणे हा दुसरा पर्याय आहे. मात्र नागपूरस्थित प्रधान मुख्य वनसंरक्षक कार्यालयाने (वन्यजीव) अजूनपर्यंत परवानगी दिली नाही. त्यामुळे वाघ मोकाटच फिरत आहे.मागील १५ दिवसांपासून आरमोरी तालुक्यातील रवी, अरसोडा, कासवी, कोंढाळा या भागात वाघाने धुमाकूळ घातला आहे. अगदी रस्त्याच्या कडेला वाघ बसून राहत असल्याने देसाईगंज-आरमोरी मार्गाने ये-जा करणाऱ्या प्रवाशांना तसेच सामान्य नागरिकांनाही वाघाचे दर्शन होत आहे. मात्र रवी, अरसोडा, कासवी गावातील नागरिक जीव मुठीत धरून जीवन जगत आहेत. वाघाच्या दहशतीमुळे घराच्या बाहेर पडणे बंद झाले आहे. खरीप पूर्व हंगामाची कामे ठप्प पडली आहेत. रात्रीच्या सुमारास घराबाहेर पडणे कठीण झाले आहे. वाघ पिंजऱ्यात अडकत नसल्याने सदर वाघाला शॉर्पशुटरच्या मदतीने इंजेक्शन देऊन बेशुध्द करण्याची परवानगी नागपूर प्रधान मुख्य वनसंरक्षक कार्यालयाकडे मागितली आहे. मात्र अजूनपर्यंत याला परवानगी मिळाली नाही. वनमंत्र्यांनी या गंभीर बाबीकडे लक्ष घालावे, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.