शहरं
Join us  
Trending Stories
1
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
2
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
3
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
4
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; या खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
5
Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
6
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
7
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
8
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
9
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
10
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
11
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
12
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
13
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
14
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
15
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
16
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
17
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
18
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
19
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
20
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
Daily Top 2Weekly Top 5

अपहृत बस सुटकेचा अनुभवला थरार

By admin | Updated: January 4, 2017 01:23 IST

अपहरण केलेल्या बसमधील प्रवाशांची पोलीस कशा पद्धतीने सुटका करतात, कोणत्या तंत्राचा अवलंब करतात,

‘रेजिंग डे’निमित्त पोलिसांनी सादर केला डेमो : नागरिकांच्या हृदयाचे चुकले ठोके; इंदिरा गांधी चौकात सादरीकरण गडचिरोली : अपहरण केलेल्या बसमधील प्रवाशांची पोलीस कशा पद्धतीने सुटका करतात, कोणत्या तंत्राचा अवलंब करतात, याविषयीचा डेमो गडचिरोली पोलिसांनी सादर केला. अपहरण झालेल्या बस सुटकेचा थरार यानिमित्ताने शहरवासीयांनी अनुभवला. ‘पोलीस रेजिंग डे’ निमित्त पोलिसांच्या वतीने स्थानिक इंदिरा गांधी चौकात डेमोचे आयोजन केले होते. ‘पोलीस रेजिंग डे’ निमित्त गडचिरोली पोलिसांच्या वतीने जिल्हाभरात २ जानेवारीपासून विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. सदर कार्यक्रम ८ जानेवारीपर्यंत चालणार आहेत. आपत्कालीन परिस्थितीत पोलीस यंत्रणा कशा प्रकारे काम करते, हे सर्वसामान्य नागरिकांसाठी एक रहस्य आहे. याबाबींची माहिती सर्वसामान्य नागरिकांना व्हावी, या उद्देशाने गडचिरोली येथील इंदिरा गांधी चौकात मंगळवारी सकाळी ११ वाजता अपहरण केलेल्या बसमधील प्रवाशांची सुटका करण्यासाठी पोलिसांच्या वतीने कोणत्या तंत्राचा वापर केला जातो, बसला कशाप्रकारे थांबविले जाते, याचे प्रात्यक्षिक सादर केले. सदर प्रात्यक्षिक बघून नागरिक आश्चर्यचकित झाले. नक्षल्यांकडून बसचे अपहरण करण्यात आले आहे. सदर बस आरमोरीवरून निघाल्याचे पोलिसांना माहित होते. त्यानुसार पोलीस इंदिरा गांधी चौकात या बसला अडविण्यासाठी सापळा रचतात. अपहरणकर्ता सहजासहजी बस थांबविणार नाही, ही बाब पोलिसांना पक्की माहित असल्याने अपहृत बसच्या अगदी समोर पोलिसांचे वाहन उभे केले जाते. त्यामुळे अपहृत बसचाचालक बस थांबवितो. त्याचवेळी लपून बसलेले सशस्त्र पोलीस जवान तत्काळ बसच्या दिशेने आगेकूच करतात व बसला घेराव घालतात. दोन ते तीन जवान तत्काळ बसमध्ये चढून प्रवाशांची सुटका करतात. तर अपहरणकर्त्यांनाही ताब्यात घेतले जाते. अपहरण केलेल्या बसमधील प्रवाशांची काय स्थिती असते, याचा थरार गडचिरोलीवासीयांनी अनुभवला. हा थरार बघून काहीकाळ नागरिकांच्या हृदयाचे ठोके चुकले. जवळपास १५ ते २० मिनीट चौकातील वाहतूक बंद ठेवण्यात आली होती. त्यामुळे चारही मार्गावर वाहनांच्या मोठमोठ्या रांगा लागल्या होत्या. त्याचबरोबर सदर प्रात्यक्षिक पाहण्यासाठी हजारो नागरिकांनी गर्दी केली होती. यावेळी पोलीस उपअधीक्षक (गृह) गणेश बिरादार, उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. सागर कवडे, ठाणेदार विजय पुराणिक यांच्यासह अनेक पोलीस अधिकारी उपस्थित होते. (नगर प्रतिनिधी)