शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
2
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
3
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
4
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
5
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
6
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
7
होर्मुझमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल घेतला नाही; इराणची स्पष्टोक्ती...
8
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
9
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
10
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
11
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
12
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
13
आशा भोसलेंचे कधीच न पाहिलेले दुर्मिळ फोटो; आर.डी. बर्मन ते लता दीदींसोबतचे खास क्षण, प्रत्येक फोटोमागे भन्नाट किस्सा
14
मुंबई इंडियन्सनं 'टाईमपास' केला; Hardik Pandya ला १२ लाखांचा फटका; Tim David लाही शिक्षा
15
Asha Bhosale: सूरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन, दिग्गज गायकांनी गाणं गाऊन दिली अखेरची स्वरांजली
16
होर्मुझ सामुद्रधुनीवर ब्रिटन-फ्रान्सचा 'बिग प्लॅन'; ४० देशांना एकत्र आणणार, ट्रम्प यांना डच्चू
17
दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
18
Rohit Sharma Injury : मुंबई इंडियन्ससाठी वाजली धोक्याची घंटा; रोहित शर्मा पुढच्या सामन्याला मुकणार?
19
सिंगल चार्जवर ३२० KM रेंज...किंमत फक्त ₹१.२९ लाख! Ola ची नवीन EV स्कूटर लॉन्च
20
बालेन शाह यांनी PM मोदींना भेटण्यासाठी ठेवली अट; नेपाळ-भारत संबंध पुन्हा सुधारणार
Daily Top 2Weekly Top 5

पोलिसांना ठार करण्याचा प्रयत्न करणाऱ्या दारूविक्रेत्यांना तीन वर्षांचा कारावास

By admin | Updated: August 19, 2016 00:51 IST

दारुची अवैध वाहतूक करताना अटकाव करणाऱ्या पोलिसांच्या अंगावर वाहन चालवून त्यांना ठार करण्याचा प्रयत्न

जिल्हा सत्र न्यायालयाचा निर्णय : पोलीस वाहनाला दिली होती धडक गडचिरोली : दारुची अवैध वाहतूक करताना अटकाव करणाऱ्या पोलिसांच्या अंगावर वाहन चालवून त्यांना ठार करण्याचा प्रयत्न करणाऱ्या गडचिरोली येथील दोन दारुविक्रेत्यांना येथील जिल्हा व सत्र न्यायालयाने प्रत्येकी ३ वर्षांचा सश्रम कारावास व १ हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली आहे. अर्जुन अरुण शिल व राजू विठ्ठल कंटकवार अशी दोषी इसमांची नावे आहेत. २३ सप्टेंबर २०१० रोजी आरमोरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक टी.बी.माने हे आपल्या सहकाऱ्यांसह आरमोरी-ब्रह्मपुरी मार्गावरील वैनगंगा नदीजवळ गस्त घालत होते. यावेळी त्यांना ब्रह्मपुरीकडून मारुती ८०० हे वाहन भरधाव वेगाने येताना दिसले. संशय आल्याने पोलिसांनी पाठलाग करुन मारुती कार थांबविण्याचा प्रयत्न केला. परंतु चालक कार पुढे घेऊन गेला. त्यानंतर पोलिसांनी आपले वाहन मारुती कारसमोर नेऊन कार पुन्हा थांबविण्याचा प्रयत्न केला. मात्र आरोपींनी पोलिसांच्या वाहनाला धडक दिली. यामुळे दोन्ही वाहने उलटली. काही वेळानंतर पोलीस उपनिरीक्षक विजय देशमुख यांनी घटनास्थळी येऊन नागरिकांच्या सहकार्याने दोन्ही वाहने सरळ केली. यावेळी मारुती कारमध्ये २० पेट्या देशी दारु आढळून आली. शिवाय कारमधील अर्जुन शिल व राजू कंटकवार हे जखमी झालेले दिसले. पोलिसांनी दारु ताब्यात घेऊन दोन्ही जखमींना रुग्णालयात भरती केले. त्यानंतर शिपाई नरेंद्र बांबोळे यांच्या फियार्दीवरुन पोलीस उपनिरीक्षक विजय देशमुख यांनी दोन्ही आरोपींवर भादंवि कलम ३०७, ३५३, ३३२, ४२७, ३४ व मुंबई दारुबंदी कायद्याच्या कलम ६५ (ड), ८३ अन्वये गुन्हे दाखल केले. पुढे हे प्रकरण न्यायालयात वर्ग करण्यात आले. बुधवारी १७ आॅगस्ट रोजी या प्रकरणाचा निकाल लागला. प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश सूर्यकांत शिंदे यांनी सर्व साक्ष व पुरावे तपासून आरोपी अर्जुन शिल व राजू कंटकवार यांना भादंवि कलम ३५३ अन्वये ३ वर्षे सश्रम कारावास व १ हजार रुपये दंड, तसेच दंड न भरल्यास दोन महिन्यांची अतिरिक्त शिक्षा आणि मुंदाका कलम ६५ (१) (ड) अन्वये २ वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा व पाचशे रुपये दंड आणि दंड न भरल्यास १५ दिवसांची अतिरिक्त शिक्षा, मुंदाका कलम ८३ अन्वये २ वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा व पाचशे रुपये दंड ठोठावला.या प्रकरणात सरकारी पक्षातर्फे अतिरिक्त सरकारी वकील सचिन कुंभारे यांनी काम पाहिले. कोर्ट पैरवी अधिकारी म्हणून पीएसआय नितीन शिंदे व पोलीस नाईक अरविंद पेंदाम यांनी जबाबदारी सांभाळली. (नगर प्रतिनिधी)