शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
2
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
3
चंद्राला गवसणी घालून अंतराळवीर सुरक्षित परतले
4
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
5
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
6
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
7
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
8
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
9
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
10
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
11
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
12
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
13
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
14
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
15
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
16
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
17
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
18
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
19
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
20
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
Daily Top 2Weekly Top 5

एक एकरात तीन लाखांची मिरची

By admin | Updated: January 18, 2017 01:41 IST

येथील प्रगतशील शेतकरी मारोती कवडू बारसागडे यांनी एक एकर शेतात मिरची पिकाची लागवड केली असून यातून तीन लाख रूपयांपेक्षा

तळोधी मो. येथील शेतकरी : आधुनिक पद्धतीने लागवड मिलिंद मेडपिलवार   तळोधी मो. येथील प्रगतशील शेतकरी मारोती कवडू बारसागडे यांनी एक एकर शेतात मिरची पिकाची लागवड केली असून यातून तीन लाख रूपयांपेक्षा अधिकचे उत्पन्न होणार असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. सव्वा लाख रूपयांची हिरवी मिरची त्यांनी आजपर्यंत विकली आहे. मारोती बारसागडे यांची पौर नदी व वैनगंगा नदीच्या तिरावर साडेचार एकर शेती आहे. त्यापैकी एक एकर शेतीवर त्यांनी मिरची पिकाची लागवड केली. सदर मिरचीेचे उत्पादन आधुनिक पद्धतीने त्यांनी घेण्यास सुरुवात केली. संकरित पद्धतीच्या मिरचीची त्यांनी लागवड केली. मिरचीचे झाड जवळपास ४ फूट उंच वाढली आहेत. अगदी झाडाच्या देठापासून तर शेंड्यापर्यंत मिरच्या लागल्या आहेत. प्रत्येक झाडाला जवळपास एक किलो मिरची लागली आहे. आजपर्यंत त्यांनी एक लाख २५ हजार रूपयांची मिरची बाजारात विकली आहे. मिरचीबरोबरच बारसागडे यांनी टमाटर, कोबी आदी भाजीपाला पिकांची लागवड केली आहे. शेतामध्ये चिकू, आंबा, चिंच पिकाचेही ते उत्पादन घेतात. पावसाळ्यामध्ये धानपिकाचीही लागवड केली जाते. विशेष म्हणजे १५ वर्षाअगोदर मारोती बारसागडे यांचे वडील कवडू बारसागडे यांनी बागायतीच्या उत्पन्नास सुरुवात केली. त्यावेळी या परिसरात धाना व्यतीरिक्त इतर पीक घेतले जात नव्हते. कवडू बारसागडे हे शेतीमध्ये नवनवीन प्रयोग करीत होते. त्यांचे प्रयोग इतर शेतकऱ्यांसाठी मार्गदर्शक आहेत.