शहरं
Join us  
Trending Stories
1
गिल है की मानता नहीं...; 'द्विशतकी' खेळीनंतर 'शतकी' डाव, इंग्लंडवर आणखी एक 'घाव'
2
12 देशांवर पडणार डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफचा हातोडा, स्वाक्षरीही झाली! म्हणाले...
3
"भाजपची दुसऱ्यांदा माघार, केंद्राकडे राज यांच्या प्रश्नांची उत्तरे नाहीत"; स्टॅलिन यांचा ठाकरेंना पाठिंबा
4
VIDEO: प्रचंड गर्दी तरीही वारकऱ्यांनी दाखवली शिस्त! रुग्णवाहिकेसाठी क्षणात मोकळी करून दिली वाट
5
Neeraj Chopra Wins Gold NC Classic 2025: घरच्या मैदानातील पहिली स्पर्धा! 'गोल्ड'सह इथंही नीरज चोप्राची हवा
6
"त्यासाठी मनगटात जोर लागतो, नुसत्या तोंडाच्या वाफा..."; एकनाथ शिंदे यांचा राज-उद्धव मेळाव्याला टोला
7
Video: "डाव घोषित करतोस का? उद्या पाऊस पडणार आहे"; हॅरी ब्रुकच्या प्रश्नाला गिलचे मजेशीर उत्तर
8
"मुंबईला नवा चेहरा दिल्याने उद्धव ठाकरेंचा जळफळाट"; CM फडणवीस म्हणाले, "एकमेकांशी भांडूनच ते…"
9
"ठाकरे ब्रँड असता, तर बाळासाहेब असतानाच २८८ आमदार असते"; शिंदेंच्या आमदाराचे धक्कादायक विधान
10
सर्वात जलद सेंच्युरी! १४ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास; मोडला पाक फलंदाजाचा रेकॉर्ड
11
Photo: आजच दुकान गाठलं पाहिजे, बजाजची नवीन स्पोर्ट्स बाईक पाहून तुम्हीही हेच म्हणाल!
12
Viral Video: रेल्वे स्टेशन आहे की हायवे? प्लॅटफॉर्मवरून गाड्यांना धावताना पाहून प्रवाशी शॉक!
13
PHOTOS: जसप्रीत बुमराहच्या बाजूला बसून हळूच हसणारी 'ती' तरूणी कोण? जाणून घ्या तिच्याबद्दल...
14
COVID19: महाराष्ट्रावरचं कोरोना संकट आणखी गडद, आज १२ नव्या रुणांची नोंद, २४ तासात एकाचा मृत्यू
15
उद्धव-राज ठाकरेंसंदर्भात रामदास आठवले यांची मोठी भाविष्यवाणी, म्हणाले, 'आमच्या महायुतीला...!'
16
जयजयकार...मराठी शक्तीचा, 'ठाकरे ब्रँड'वरील भक्तीचा! उद्धव-राज एकत्र येतात तेव्हा...
17
आशा आहे, मी आणखी 30-40 वर्षे जगेन आणि...; दलाई लामांकडून उत्तराधिकारी वादाला पूर्णविराम
18
"डोळे आणि मन आज तृप्त झालं...", ठाकरे बंधू एकत्र, मराठी अभिनेत्याचा आनंद गगनात मावेना
19
"हिंदी सक्ती मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्याआधीची चाचपणी होती"; राज ठाकरे यांचा गंभीर आरोप
20
Navi Mumbai: पत्नीसह सासूलाही कपडे काढायला लावले अन्...; काळ्या जादूच्या नावाखाली जावयाने सर्व मर्यादा ओलांडल्या!

अरविंद चव्हाणच्या मागावर एसीबीचे तीन पथक

By admin | Updated: December 23, 2014 23:03 IST

गडचिरोली जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाचा कोरची पं.स.तील शाखा अभियंता अरविंद बहाद्दूरसिंग चव्हाण लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गडचिरोली येथे गुन्हा दाखल करताच

गडचिरोली : गडचिरोली जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाचा कोरची पं.स.तील शाखा अभियंता अरविंद बहाद्दूरसिंग चव्हाण लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गडचिरोली येथे गुन्हा दाखल करताच सोमवारपासून फरार झाला आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या गडचिरोली येथील कार्यालयाने चव्हाणच्या शोधार्थ तीन पथक सोमवारीच तैनात केले असून सोमवारी धानोरा, कोरची व गोंदिया येथे पथक रवाना करण्यात आले. मात्र कोरची येथून अभियंता चव्हाण गुन्हा दाखल होताच कार्यालयीन दैनंदिनीत दौरा दाखवून पसार झाला असावा, अशी शक्यता लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस निरिक्षक दामदेव मंडलवार यांनी लोकमतशी बोलताना व्यक्त केली.एसीबीचे पथक गोंदिया येथे चव्हाणच्या घरी गेले होते. मात्र चव्हाण घरी सापडला नाही. कोरची येथे चव्हाणला शोधण्यासाठी पं.स. कार्यालयात पथक पाठविण्यात आले होते. मात्र चव्हाण मसेली, वट्रा भागात गावांमध्ये दौऱ्यावर गेला आहे, असे हलचल रजिस्टरच्या नोंदीवरून दिसून आले. हा भाग नक्षलीदृष्ट्या संवेदनशिल असल्याने या भागात पोलीस पथक जाऊ शकले नाही. त्यामुळे चव्हाणला अटक करण्यास सोमवारी अडचण आली, असेही एसीबीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. मात्र चव्हाणला अटक करण्यात एसीबीला लवकरच यश येईल, असा विश्वास मंडलवार यांनी व्यक्त केला आहे. चव्हाण याच्याकडे ९ लाख ४९ हजार ७९ रूपयाची उत्पन्न स्त्रोतांपेक्षा अधिक मालमत्ता आढळून आल्याने त्यांच्याविरोधात गडचिरोली पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चव्हाणवर यापूर्वीही निलंबनाची कारवाई करण्यात आली होती. तत्कालीन काँग्रेस आमदाराने चव्हाणसाठी आपले वजन वापरून चव्हाणचा बचाव करण्याचा जोरदार प्रयत्न केला होता. त्यानंतर चव्हाणला सिरोंचा येथे नियुक्ती देण्यात आली होती. धानोरा पंचायत समितीत असताना चव्हाणच्या भ्रष्टाचाराविरोधात पिपल्स रिपब्लीकन पार्टीचे जिल्हाध्यक्ष मुन्नीश्वर बोरकर यांनी अनेक तक्रारी केल्या होत्या. त्याची चौकशीही करण्यात आली. चव्हाण याला तत्काळ अटक करून शासकीय सेवेतून बडतर्फ करावे, अशी मागणी पिरिपाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मंगळवारी पाठविलेल्या निवेदनातून केली आहे. (जिल्हा प्रतिनिधी)