शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
2
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
3
"मी साडी नेसलेली होती, त्यात अश्लीलता कुठे होती?", ती तरुणी ढसाढसा रडली, ट्रोलिंगनंतर 'धक-धक' गर्ल काय म्हणाली?
4
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
5
Praful Hinge नं सांगून पहिल्याच बॉलवर काढली Vaibhav Suryavanshi ची विकेट; मॅचनंतर म्हणाला...
6
बालमैत्रिणीसाठी आशाताई दोनदा आल्या गडहिंग्लजला! महिला बँकेचे उद्घाटन, महाविद्यालयाच्या मदतीसाठी विनामूल्य कार्यक्रम 
7
शॉम्पूच्या बॉटलमध्ये ४.२६ कोटींचे कोकेन, नागपुरात राजधानी एक्सप्रेसमध्ये सिनेस्टाईल कारवाई
8
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
9
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
10
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
11
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
12
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
13
होर्मुझमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल घेतला नाही; इराणची स्पष्टोक्ती...
14
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
15
'अमिरों का नशे'मुळे तपास यंत्रणांमध्ये खळबळ, महागड्या 'कोकेन'ची नागपूर मार्गे नियमित तस्करी 
16
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
17
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
18
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
19
बहिणीला शिवीगाळ, बोअरवेल कामगार विजय पानसेची धारदार शस्त्राने वार करत हत्या, सांगली जिल्ह्यातील घटना 
20
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
Daily Top 2Weekly Top 5

हजाराे नागरिकांची वनसंरक्षक कार्यालयावर धडक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2021 05:00 IST

आंदाेलनात २० गावांमधील जवळपास दाेन हजार नागरिक सहभागी झाले हाेते. गडचिराेली तालुक्यातील बहुतांश गावांपासून जंगल दाेन ते तीन किमी अंतरावर आहे. एवढ्या परिसरात नागरिकांच्या शेती आहेत. त्यामुळे शेतीवरच जावेच लागते. शेतीवर जाणाऱ्या नागरिकांवर वाघ हल्ला करीत आहे. या वाघाचा बंदाेबस्त करावा तसेच इतरही वाघांना येेथून हटविण्यात यावे, या प्रमुख मागणीसाठी आंदाेलन करण्यात आले.

लाेकमत न्यूज नेटवर्कगडचिराेली : नागरिकांच्या जीवाचा घाेट घेणाऱ्या वाघांचा बंदाेबस्त करावा, या प्रमुख मागणीसाठी भ्रष्टाचारविराेधी जनआंदाेलन व भारतीय जनसंसद यांच्या नेतृत्वात गडचिराेली तालुक्यातील वाघ प्रभावित असलेल्या २० गावांमधील हजाराे नागरिकांनी मंगळवारी मुख्य वनसंरक्षक कार्यालयावर धडक दिली. शहरातील इंदिरा गांधी चाैक ते पाेटेगाव मार्गावरील वनसंरक्षक कार्यालयापर्यंत माेर्चा काढण्यात आला. माेर्चाचे नेतृत्व भ्रष्टाचारविराेधी जनआंदाेलनाचे राज्य समिती विश्वस्त डाॅ. शिवनाथ कुंभारे, भ्रष्टाचारविराेधी जनआंदाेलनाचे जिल्हा संघटक तथा जनसंसदेचे जिल्हाध्यक्ष विजय खरवडे, समाजसेवक देवाजी ताेफा, जिल्हा उपाध्यक्ष रमेश बांगरे, जिल्हा सचिव नीलकंठ संदाेकार, आंबेशिवणीचे उपसरपंच याेगाजी कुडवे, विलास निंबाेरकर, रमेश भुरसे आदींनी केले. आंदाेलनात २० गावांमधील जवळपास दाेन हजार नागरिक सहभागी झाले हाेते. गडचिराेली तालुक्यातील बहुतांश गावांपासून जंगल दाेन ते तीन किमी अंतरावर आहे. एवढ्या परिसरात नागरिकांच्या शेती आहेत. त्यामुळे शेतीवरच जावेच लागते. शेतीवर जाणाऱ्या नागरिकांवर वाघ हल्ला करीत आहे. या वाघाचा बंदाेबस्त करावा तसेच इतरही वाघांना येेथून हटविण्यात यावे, या प्रमुख मागणीसाठी आंदाेलन करण्यात आले. माेर्चा वनसंरक्षक कार्यालयात पाेहाेचल्यानंतर त्याठिकाणी सभेचे आयाेजन करण्यात आले. या सभेला विजय खरवडे यांच्यासह इतरांनी मार्गदर्शन केले. वाघाचा बंदाेबस्त करण्यासाठी मंत्रालयात पाठपुरावा करू, असे आश्वासन विजय खरवडे यांनी दिले. तसेच भविष्यात माेठे आंदाेलन उभारले जाईल, असा इशारा वनविभागाला दिला. सभेनंतर मुख्य वनसंरक्षक यांना निवेदन देण्यात आले. 

या आहेत नागरिकांच्या प्रमुख मागण्याअमिर्झा परिसरातील गावांमध्ये वाघांनी दहशत माजविली आहे. वर्षभराच्या कालावधीमध्ये १३ नागरिकांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे वाघांचा बंदाेबस्त करावा, वाघाच्या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तीच्या कुटुंबास २५ लाख रुपयांची मदत द्यावी. कुटुंबातील एका व्यक्तीला शासकीय नाेकरी द्यावी. अकार्यक्षम वनाधिकारी व वनकर्मचारी यांची हकालपट्टी करावी. चुरचुरा बिटातील ४० एकर जागेवर अवैध वृक्षताेड करणाऱ्या व्यक्तीवर कारवाई करावी. तलाठी व वनकर्मचाऱ्याची चाैकशी करून दाेषींवर कारवाई करावी.

 

टॅग्स :Morchaमोर्चाTigerवाघ