शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
2
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
3
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
4
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
5
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
6
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
7
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
8
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
9
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
10
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
11
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
12
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
13
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
14
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
15
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
16
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
17
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
18
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
19
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
20
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
Daily Top 2Weekly Top 5

एक हजारवर शिक्षक अतिरिक्त ठरणार?

By admin | Updated: March 26, 2016 01:17 IST

शिक्षकांच्या वेतनावर होणारा कोट्यवधी रूपयाचा खर्च कमी करण्यासोबतच दर्जेदार शिक्षण देण्याच्या उद्देशाने २० पेक्षा कमी पटसंख्या ...

शासनस्तरावर हालचाली सुरू : जि.प.च्या ५०९ शाळांमध्ये २० पेक्षा कमी विद्यार्थी संख्या दिलीप दहेलकर गडचिरोलीशिक्षकांच्या वेतनावर होणारा कोट्यवधी रूपयाचा खर्च कमी करण्यासोबतच दर्जेदार शिक्षण देण्याच्या उद्देशाने २० पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळा बंद करून मोठ्या गावांमध्ये समूह शाळा स्थापन करण्याचा विचार शासन करीत असून त्यादृष्टीने राज्य शासनाच्या हालचाली वाढल्या आहेत. २० पेक्षा कमी विद्यार्थी पटसंख्या असलेल्या शाळांची माहिती जि.प. च्या प्राथमिक शिक्षण विभागाने शासनाकडे सादर केली आहे. गडचिरोली जिल्ह्यात २० पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या प्राथमिक शाळांची संख्या ५०९ आहे. एका शाळेवर दोन याप्रमाणे या शाळांमध्ये एकूण १ हजार १८ शिक्षक कार्यरत आहेत. सदर शाळा बंद केल्यास तब्बल १ हजार १८ शिक्षक अतिरिक्त ठरणार आहेत.जिल्ह्यात १० पेक्षा कमी विद्यार्थी पटसंख्या असलेल्या शाळांची संख्या ६५ आहे. यामध्ये जिल्हा परिषदेच्या ६२ व इतर व्यवस्थापनाच्या तीन शाळांचा समावेश आहे. या शाळांमध्ये एकच शिक्षक कार्यरत आहे. राज्य शासनाने राज्यातील काही अपवादात्मक गावे वगळता बहुतांश गावात इयत्ता पहिली ते चवथ्या वर्गापर्यंत शिक्षणाची सुविधा असलेली शाळा जिल्हा परिषदेमार्फत सुरू केली. मागील दहा वर्षात इंग्रजी माध्यमांच्या शाळा, आश्रमशाळा व खासगी व्यवस्थापनांच्या शाळांच्या संख्येत भरमसाठ वाढ झाली. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांना विद्यार्थी मिळणे कठीण झाले. परिणामी गडचिरोली जिल्ह्याच्या बाराही तालुक्यातील जि.प. प्राथमिक शाळांची पटसंख्या प्रचंड रोडावली. मात्र या शाळांवरील शिक्षक कायम राहिले. शिक्षकांच्या वेतनावर वर्षाकाठी होणारा कोट्यवधी रूपयांचा खर्च वाचविण्यासाठी राज्य शासनाने २० पेक्षा कमी विद्यार्थी पटसंख्या असलेल्या शाळा बंद करून मोठ्या गावांमध्ये केंद्रस्थानी या शाळांना समाविष्ट करण्याचा विचार शासन करीत आहे. त्यासाठीच राज्य शासनाने महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाला विद्यार्थी पटसंख्येची माहिती मागितली होती. शाळा बंद करण्याचा निर्णय राज्य शासनाकडून अद्यापही झाला नसला तरी पुढील वर्षाच्या सत्रात हा निर्णय घेण्याची शक्यता वर्तविली जात आहे. यावर उपाय योजना म्हणून सरकार या शाळांमधील विद्यार्थ्यांना बसद्वारे वाहतूक सुविधा पुरविण्याचा विचार करीत आहे.राज्य शासनाने २० पेक्षा कमी विद्यार्थी पटसंख्या असलेल्या शाळांची माहिती मागितली व ती जि.प. शिक्षण विभागाच्या वतीने सादर करण्यात आली आहे. या शाळांबाबत शासन कोणता निर्णय घेणार आहे, हे अद्यापही स्पष्ट झाले नाही.मात्र शासनाच्या मार्गदर्शनानुसार जि.प. शिक्षण विभागाच्या वतीने कार्यवाही करण्यात येईल.जिल्ह्याचा बहुतांश भाग जंगली असून रस्त्याच्या दुरवस्थेमुळे अनेक ठिकाणी पायवाटेचा प्रवास आहे. त्यामुळे शाळा सुरू ठेवणे गरजेचे आहे.- माणिक साखरे, शिक्षणाधिकारी (प्राथमिक) जि.प. गडचिरोली