शहरं
Join us  
Trending Stories
1
योग गुरू स्वामी पद्मश्री शिवानंद बाबा यांनी वयाच्या १२८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
2
"पाकिस्तानच्या काही क्षेत्रावर भारत कधीही हल्ला करू शकतो, आमच्याकडे ठोस पुरावे"
3
"भारतात इतर पर्यटन स्थळं नाहीत का?" काश्मिरला जाण्याचं आवाहन करणाऱ्यांवर पल्लवी जोशीचं भाष्य
4
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लॉटरी, यशच यश; प्रगतीची संधी, नोकरीत पदोन्नती, पैसा मिळेल!
5
...तर सीमा हैदरला हा नियम लागू नाही का?; सपा नेते अबु आझमींनी केंद्र सरकारला घेरलं
6
WAVES 2025: नेटफ्लिक्स सह-सीईओंसोबत सैफची चर्चा, म्हणाला, "रामायण, महाभारत..."
7
दादा, तुम्ही नाहीतर कर्ज माफीचे आश्वासन दिले कोणी?
8
भारत-पाक तणावावर मोठी अपडेट; देशभरातील आयुध निर्माणीतील अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द
9
आजचे राशीभविष्य, ४ मे २०२५: धनप्राप्तीसह आर्थिक स्तर मजबूत होईल, मान, प्रतिष्ठा वाढेल
10
पाकिस्तानमधून आयातीवर भारताची संपूर्ण बंदी; टपाल, पार्सल सेवा केल्या स्थगित 
11
समृद्धीच्या अंतिम टप्प्यास मुहूर्त कधी? १ मे रोजीचा मुहूर्त हुकला
12
पर्यटकच टार्गेटवर... गुप्तचरांचा होता इशारा; शोधमोहीम थांबविली त्याच दिवशी झाला हल्ला 
13
आज देशभर ‘नीट-यूजी’ परीक्षा : गैरप्रकार कराल तर कायदेशीर कारवाईसह तीन वर्षे बंदी
14
तीन मुलींची हत्या करून आईने घेतला गळफास ; भिवंडीतील हृदयद्रावक घटना, कारण अस्पष्ट 
15
पुरंदर विमानतळाला विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांवर लाठीमार; अनेक जखमी
16
नव्या डम्पिंगसाठी लागतील दोन वर्षे; सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा किंवा पर्यायी जागेसाठी मुदतवाढ हाच महापालिकेकडे पर्याय 
17
७२ तासांच्या ‘त्या’ शपथेनंतर मजबूत राज्याची मुहूर्तमेढ : देवेंद्र फडणवीस
18
विमानांना पक्षी धडकण्याची शक्यता, उघड्यावरील प्राण्यांची कत्तल थांबवा; नवी मुंबई विमानतळ कंपनीला ‘डीजीसीए’चे आदेश
19
सात वर्षांची असताना आला बहिरेपणा, आता  २८ वर्षांनंतर ती पहिल्यांदाच ऐकणार आवाज
20
गोव्यात लईराईच्या जत्रेत चेंगराचेंगरी, ६ भाविक ठार

काटेरी कुंपण केले : सरपंचासह शेतकऱ्यांची जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार

By admin | Updated: July 28, 2016 02:07 IST

अहेरी तालुक्यातील महागाव येथील शेतकरी लचमा बंडू झाडे यांनी शेताकडे जाणाऱ्या वहिवाटेच्या रस्त्यावर काटेरी कुंपन करून रस्ता बंद केला.

अहेरी : अहेरी तालुक्यातील महागाव येथील शेतकरी लचमा बंडू झाडे यांनी शेताकडे जाणाऱ्या वहिवाटेच्या रस्त्यावर काटेरी कुंपन करून रस्ता बंद केला. यामुळे गेल्या १५ दिवसांपासून सर्वे नं. १२६, १९६, २०१ सह लगतच्या सर्वे नं. मधील शेतकऱ्यांची धानपीक रोवणीची कामे ठप्प झाली आहेत. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी लक्ष घालून शेतीकडे जाणारा सदर वहिवाटेचा रस्ता मोकळा करून द्यावा, अशी मागणी महागाव बुज येथील सरपंचासह ११ शेतकऱ्यांनी निवेदनाद्वारे जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे. जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात शेतकऱ्यांनी म्हटले आहे की, तहसीलदार अहेरी यांच्या आदेशानुसार महागाव बुज येथील सर्वे नं. १९५ मधून जाणारा रस्ता कायम करण्यात आला आहे. मात्र लचमा बंडू झाडे यांनी काटेरी कुंपन करून सदर रस्ता बंद केला. त्यामुळे सर्वे नं. १२६, १९६, २०१, ४७२, ४७५, १९७, ३१५, ४८१, ४६४, ३१६, ३१८, ४९५, ५१८, ३३२, ३१२ व ३३३ मधील शेतकऱ्यांना शेतीची कामे करण्यास अडचण निर्माण झाली आहे. सध्या धान पिकाच्या रोवणीचा हंगाम आहे. मात्र रस्ता बंद करून वाद घालण्यात आल्यामुळे वरील सर्वे क्रमांकमधील शेतकऱ्यांच्या शेतातील रोवणीची कामे थांबली आहेत. परिणामी या शेतकऱ्यांवर उपासमारीची पाळी येण्याची शक्यता आहे. यापूर्वी तहसील कार्यालयामार्फत पोलीस विभागाच्या सहकार्याने सदर रस्ता मोकळा करून देण्यात आला. मात्र लचमा झाडे यांनी पुन्हा अतिक्रमण करून काटेरी कुंपनाद्वारे सदर रस्ता बंद केला. त्यानंतर पुन्हा अन्यायग्रस्त शेतकऱ्यांनी तहसीलदारांकडे तक्रार केली. याप्रकरणाची मंडळ अधिकाऱ्यांकडून चौकशी झाल्यानंतर २० जुलै २०१६ रोजी सदर रस्ता दुसऱ्यांदा मोकळा करून देण्यात आला. त्याच दिवशी लचमा झाडे यांनी आदेशाची अवहेलना करून सदर रस्ता बंद केला. जिल्हाधिकाऱ्यांनी आता पुढाकार घेऊन सदर रस्त्याचा प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लावावा, अन्यथा अहेरी तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्यात येईल, असा इशारा तक्रारकर्ते अन्यायग्रस्त शेतकरी नामदेव अलोणे, विठ्ठल दुर्गे, श्रीनिवास अलोणे, ओकू करमे, किसन गर्गम, श्रीकांत चालुरकर, नारायण पानेम, मदना पानेम, वीणा मट्टीवार, दलपती अलोणे व नारायण नरोटे आदींनी प्रशासनाला दिला आहे. (प्रतिनिधी)