शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
2
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
3
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
4
शॉम्पूच्या बॉटलमध्ये ४.२६ कोटींचे कोकेन, नागपुरात राजधानी एक्सप्रेसमध्ये सिनेस्टाईल कारवाई
5
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
6
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
7
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
8
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
9
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
10
होर्मुझमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल घेतला नाही; इराणची स्पष्टोक्ती...
11
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
12
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
13
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
14
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
15
बहिणीला शिवीगाळ, बोअरवेल कामगार विजय पानसेची धारदार शस्त्राने वार करत हत्या, सांगली जिल्ह्यातील घटना 
16
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
17
आशा भोसलेंचे कधीच न पाहिलेले दुर्मिळ फोटो; आर.डी. बर्मन ते लता दीदींसोबतचे खास क्षण, प्रत्येक फोटोमागे भन्नाट किस्सा
18
मुंबई इंडियन्सनं 'टाईमपास' केला; Hardik Pandya ला १२ लाखांचा फटका; Tim David लाही शिक्षा
19
Asha Bhosale: सूरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन, दिग्गज गायकांनी गाणं गाऊन दिली अखेरची स्वरांजली
20
होर्मुझ सामुद्रधुनीवर ब्रिटन-फ्रान्सचा 'बिग प्लॅन'; ४० देशांना एकत्र आणणार, ट्रम्प यांना डच्चू
Daily Top 2Weekly Top 5

जि.प.मध्ये मोठी उलथापालथ होणार

By admin | Updated: September 9, 2014 00:21 IST

२१ सप्टेंबर रोजी गडचिरोली जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष, उपाध्यक्ष पदाची निवडणूक होऊ घातली आहे. या निवडणुकीत सत्ता प्राप्त करण्यासाठी भारतीय जनता पार्टीने पुन्हा कंबर कसली असून पक्षाचे

गडचिरोली : २१ सप्टेंबर रोजी गडचिरोली जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष, उपाध्यक्ष पदाची निवडणूक होऊ घातली आहे. या निवडणुकीत सत्ता प्राप्त करण्यासाठी भारतीय जनता पार्टीने पुन्हा कंबर कसली असून पक्षाचे प्रदेश संघटक डॉ. उपेंद्र कोठेकर यांच्या आदेशानंतर भारतीय जनता पक्षाचे नेते कामाला लागले आहेत. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस सोबत असलेला सत्तेचा मधुचंद्र संपुष्टात येण्याची दाट शक्यता राजकीय वर्तुळात व्यक्त केली जात आहे. गडचिरोली जिल्हा परिषदेचे अध्यक्ष पद सर्वसाधारण प्रवर्ग (ओबीसी)साठी राखीव आहे. ५१ सदस्यीय गडचिरोली जिल्हा परिषदेत काँग्रेसचे १३ सदस्य आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे १०, भाजपचे ८, युवाशक्ती आघाडीचे ७, शिवसेनेचे २, नाग विदर्भ आंदोलन समितीचे ४, अपक्ष आमदार दीपक आत्राम यांच्या गटाचे ३ सदस्य आहेत. ३ अपक्ष सदस्य आहेत. १ भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा सदस्य आहे. यावेळी जिल्हा परिषदेत ओबीसी प्रवर्गाचे ७ सदस्य अध्यक्ष पदासाठी दावेदार आहेत. मात्र भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष पदासाठीचे संख्याबळ जुळत आल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे. भाजप, शिवसेना व नाग विदर्भ आंदोलन समितीसह युवाशक्ती आघाडीतून फुटलेले दोन व एक अपक्ष सदस्य अशी १७ सदस्यांची संख्या भाजपने आपल्या गोट्यात आणली, असे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचा एक फुटीर गट व आविसंचे सदस्यही या गटाला समर्थन देण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे काँग्रेस व राष्ट्रवादीला पुन्हा सत्तेबाहेर जाण्याची वेळ येईल, असे राजकीय जाणकार मानतात. (जिल्हा प्रतिनिधी)