शहरं
Join us  
Trending Stories
1
Asha Bhosale: सूरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन, दिग्गज गायकांनी गाणं गाऊन दिली अखेरची स्वरांजली
2
होर्मुझ सामुद्रधुनीवर ब्रिटन-फ्रान्सचा 'बिग प्लॅन'; ४० देशांना एकत्र आणणार, ट्रम्प यांना डच्चू
3
दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
4
सिंगल चार्जवर ३२० KM रेंज...किंमत फक्त ₹१.२९ लाख! Ola ची नवीन EV स्कूटर लॉन्च
5
Latest Marathi News LIVE: सूरसम्राज्ञी आशा भोसले पंचत्वात विलीन, चाहत्यांनी साश्रू नयनांनी दिला अखेरचा निरोप
6
बालेन शाह यांनी PM मोदींना भेटण्यासाठी ठेवली अट; नेपाळ-भारत संबंध पुन्हा सुधारणार
7
"काही लोकांना ४ लग्नांची सूट, भाजप सत्तेत आल्यास...";  अमित शाह यांनी बंगालमध्ये सभा गाजवली, स्पष्टच बोलले
8
इराणी नेत्यांच्या सुरक्षेसाठी पाकिस्ताननं अख्खी ताकद पणाला लावली; कसं केले होते नियोजन?
9
सीलिंग फॅन की टेबल फॅन? वीज बिल वाचवण्यासाठी कोणता पर्याय सर्वोत्तम? खरेदीपूर्वी नक्की वाचा
10
"US-इराणमध्ये तयार होता अंतिम करार; शेवटच्या क्षणी आला एक कॉल अन् २१ तासांची चर्चा फिस्कटली"
11
श्रीलंकेत भारताची मोठी खेळी; खरेदी केली मोठी शिपबिल्डिंग कंपनी, चीन पाहतच राहिला
12
आशा भोसलेंची नात जनाईला धीर द्यायला पोहोचला 'मानलेला भाऊ' मोहम्मद सिराज, पाहा VIDEO
13
Garud Puran: गरुड पुराणानुसार मृत्यूपूर्वी मिळतात 'हे' रहस्यमयी संकेत; अखेरच्या काळात नेमकं काय घडतं?
14
MPSC भरती प्रक्रियेत मोठा बदल; राज्य मंत्रिमंडळाने घेतले ७ महत्त्वाचे निर्णय, जाणून घ्या
15
आले कधी अन् गेले कधी, समजलंच नाही! आयपीएलमध्ये सर्वात कमी धावसंख्येवर ऑलआउट झालेले संघ
16
८ व्या वेतन आयोगाची बंपर भरती; १.८० लाख रुपये महिना पगार, जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
17
पत्नीला काम सांगायचे म्हणून मुलाने केला पित्याचा खून; गडचिरोलीतील धक्कादायक घटना
18
Kalyan Accident: कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ११ जणांचा मृत्यू, दोन गंभीर
19
IPL 2026: "सरळ मैदानाबाहेर जा...!" लाईव्ह सामन्यात सुनील गावस्कर आरसीबीच्या खेळाडूवर भडकले
20
इस्रायलचा महात्मा गांधी हॉस्पिटलवर हल्ला; सगळीकडे विध्वंस, इराणनं शेअर केला Video
Daily Top 2Weekly Top 5

१० सार्वजनिक शौचालये होणार

By admin | Updated: May 3, 2017 01:25 IST

स्वच्छ महाराष्ट्र अभियान (नागरी) अंतर्गत गडचिरोली पालिकेच्या वतीने गेल्या दोन वर्षांपासून वैयक्तिक शौचालय बांधण्याचा जंबो कार्यक्रम हाती घेण्यात आला होता.

शहर गोदरीमुक्तीसाठी गडचिरोली पालिकेचा पुढाकार दिलीप दहेलकर  गडचिरोली स्वच्छ महाराष्ट्र अभियान (नागरी) अंतर्गत गडचिरोली पालिकेच्या वतीने गेल्या दोन वर्षांपासून वैयक्तिक शौचालय बांधण्याचा जंबो कार्यक्रम हाती घेण्यात आला होता. मात्र विहित कालावधीत पालिका प्रशासनाने वैयक्तिक शौचालय बांधकामाचे १०० टक्के उद्दिष्ट गाठले नाही. त्यामुळे आता गडचिरोली शहर १०० टक्के गोदरीमुक्त करण्यासाठी शौचालयाच्या वापरावर भर देत पालिकेच्या क्षेत्रात १० नवीन सार्वजनिक शौचालय बांधण्याचे नियोजन पालिका प्रशासनाने केले आहे. या शौचालयाचे बांधकाम लवकरच हाती घेण्यात येणार आहे. स्वच्छ महाराष्ट्र अभियान (नागरी) अंतर्गत गडचिरोली नगर पालिका प्रशासनाला शासनाने ३ हजार ५ शौचालय बांधण्याचे उद्दिष्ट दिले होते. यापैकी पालिका प्रशासनाने ३० एप्रिल २०१७ पर्यंत १ हजार ५५० वैयक्तिक शौचालयाचे काम पूर्ण केले आहे. गडचिरोली पालिकेतर्फे नागरीकांकडून प्राप्त अर्जांपैकी शहरात एकूण २ हजार ५०० शौचालय मंजूर करण्यात आले. यापैकी १ हजार ५५० शौचालय पूर्ण केले असून उर्वरित शौचालयाचे काम सुरू आहे. पालिका प्रशासनाला शौचालय बांधकामासाठी तीन कोटीचा निधी शासनाकडून प्राप्त झाला होता. यापैकी पालिकेने २ कोटी ४८ लाख रूपये लाभार्थ्यांच्या अनुदानावर खर्च केले. आता पालिकेकडे ५२ लाख रूपयांचा निधी शिल्लक आहे. सध्या स्थितीत गडचिरोली शहरातील वैयक्तिक शौचालयाचे काम ६५ टक्क्यांवर पोहोचले आहे. वैयक्तिक शौचालय बांधकामासाठी जिल्हा प्रशासनाने गडचिरोली पालिकेला ३१ मार्च २०१७ पर्यंत मुदत दिली होती. मात्र अनेक शौचालय अपूर्ण असल्याने ही मुदत महिनाभराच्या कालावधीने वाढविण्यात आली. ३० एप्रिल २०१७ पर्यंत शौचालय बांधण्याची अखेरची डेडलाईन होती. या तारखेपर्यंत पालिकेने गडचिरोली शहरात १ हजार ५५० शौचालयाचे काम पूर्ण केले. गोदरीमुक्तीसाठी पालिका प्रशासनाने दोन महिन्यापूर्वीही पुढाकार घेतला होता. गुड मॉर्निंग पथक गठीत करून सकाळच्या सुमारास उघड्यावर बसणाऱ्या १०० वर नागरिकांवर आजवर दंडात्मक कारवाई पालिकेने केली आहे. आता शहरातील एकही नागरिक उघड्यावर शौचास जाऊ नये, यासाठी शहरात सार्वजनिक शौचालय बांधण्यात येणार आहे.