शहरं
Join us  
Trending Stories
1
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
2
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
3
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
4
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
5
Asha Bhosale: सूरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन, दिग्गज गायकांनी गाणं गाऊन दिली अखेरची स्वरांजली
6
होर्मुझ सामुद्रधुनीवर ब्रिटन-फ्रान्सचा 'बिग प्लॅन'; ४० देशांना एकत्र आणणार, ट्रम्प यांना डच्चू
7
दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
8
Rohit Sharma Injury : मुंबई इंडियन्ससाठी वाजली धोक्याची घंटा; रोहित शर्मा पुढच्या सामन्याला मुकणार?
9
सिंगल चार्जवर ३२० KM रेंज...किंमत फक्त ₹१.२९ लाख! Ola ची नवीन EV स्कूटर लॉन्च
10
बालेन शाह यांनी PM मोदींना भेटण्यासाठी ठेवली अट; नेपाळ-भारत संबंध पुन्हा सुधारणार
11
"काही लोकांना ४ लग्नांची सूट, भाजप सत्तेत आल्यास...";  अमित शाह यांनी बंगालमध्ये सभा गाजवली, स्पष्टच बोलले
12
इराणी नेत्यांच्या सुरक्षेसाठी पाकिस्ताननं अख्खी ताकद पणाला लावली; कसं केले होते नियोजन?
13
सीलिंग फॅन की टेबल फॅन? वीज बिल वाचवण्यासाठी कोणता पर्याय सर्वोत्तम? खरेदीपूर्वी नक्की वाचा
14
"US-इराणमध्ये तयार होता अंतिम करार; शेवटच्या क्षणी आला एक कॉल अन् २१ तासांची चर्चा फिस्कटली"
15
श्रीलंकेत भारताची मोठी खेळी; खरेदी केली मोठी शिपबिल्डिंग कंपनी, चीन पाहतच राहिला
16
आशा भोसलेंची नात जनाईला धीर द्यायला पोहोचला 'मानलेला भाऊ' मोहम्मद सिराज, पाहा VIDEO
17
Garud Puran: गरुड पुराणानुसार मृत्यूपूर्वी मिळतात 'हे' रहस्यमयी संकेत; अखेरच्या काळात नेमकं काय घडतं?
18
MPSC भरती प्रक्रियेत मोठा बदल; राज्य मंत्रिमंडळाने घेतले ७ महत्त्वाचे निर्णय, जाणून घ्या
19
आले कधी अन् गेले कधी, समजलंच नाही! आयपीएलमध्ये सर्वात कमी धावसंख्येवर ऑलआउट झालेले संघ
20
पत्नीला काम सांगायचे म्हणून मुलाने केला पित्याचा खून; गडचिरोलीतील धक्कादायक घटना
Daily Top 2Weekly Top 5

रमेशगुडमला जाण्यासाठी पक्का रस्ताच नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2021 04:34 IST

झिंगानूर परिसरातील रमेशगुडम, कर्जेली, बोडुकस्सा, किष्टय्यापल्ली, कोर्लामाल, कोर्लाचेक आदी गावांमध्ये जाण्यासाठी पक्का रस्ता नाही. पावसाळ्यात या भागातील नागरिकांना रस्त्याने ...

झिंगानूर परिसरातील रमेशगुडम, कर्जेली, बोडुकस्सा, किष्टय्यापल्ली, कोर्लामाल, कोर्लाचेक आदी गावांमध्ये जाण्यासाठी पक्का रस्ता नाही. पावसाळ्यात या भागातील नागरिकांना रस्त्याने ये-जा करताना अनेक अडचणी येतात. त्यामुळे या भागातील नागरिकांनी अनेकदा पक्के रस्ते निर्माण करण्याची मागणी केली, परंतु या मागणीकडे दुर्लक्ष हाेत असल्याचे दिसून येते. झिंगानूर ते रमेशगुडम मार्गाने ब्रिटिशांच्या काळात रस्ते होते, परंतु स्वातंत्र्याेत्तर काळानंतर या भागात रस्ते बांधकामाकडे दुर्लक्ष करण्यात आले. अनेक वर्षांपासून या भागातील नागरिक पक्के रस्ते बांधकामाची मागणी करीत आहेत, परंतु या मागणीकडे दुर्लक्ष हाेत आहे. मातीमय रस्त्यानेच नागरिक प्रवास करीत असल्याने, त्यांना माेठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागताे.

बाॅक्स .....

टाॅवर असूनही कव्हरेजची समस्या

झिंगानूर येथे २०१५-१६ मध्ये बीएसएनएल टाॅवर उभारण्यात आले. टाॅवर असूनही विविध समस्या निर्माण हाेत आहेत. इतरांशी संपर्क केल्यानंतर आवाज न येणे, मध्येच संभाषण खंडित हाेणे यासारख्या समस्या उद्भवत आहेत. या टाॅवरच्या भरवशावरच झिंगानूर परिसरातील नागरिकांनी हजारो मोबाइल विकत घेतले, परंतु आता मोबाइल शोभेच्या वस्तू बनल्या आहेत. झिंगानूर परिसरात उमानूर, रोमपल्ली, देचलीपेठा, पेंटिपाका, अंकिसा, गोल्लाकर्जी, वडदम आदी गावांमध्ये बीएसएनएल टाॅवर आहेत, परंतु केवळ झिंगानूर येथील टॉवरचीच समस्या आहे. येथील कव्हरेची समस्या लवकर निकाली काढावी, अशी मागणी नागरिकांनी मागणी केली आहे.