शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
2
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
3
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
4
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
5
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
6
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
7
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
8
होर्मुझमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल घेतला नाही; इराणची स्पष्टोक्ती...
9
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
10
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
11
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
12
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
13
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
14
आशा भोसलेंचे कधीच न पाहिलेले दुर्मिळ फोटो; आर.डी. बर्मन ते लता दीदींसोबतचे खास क्षण, प्रत्येक फोटोमागे भन्नाट किस्सा
15
मुंबई इंडियन्सनं 'टाईमपास' केला; Hardik Pandya ला १२ लाखांचा फटका; Tim David लाही शिक्षा
16
Asha Bhosale: सूरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन, दिग्गज गायकांनी गाणं गाऊन दिली अखेरची स्वरांजली
17
होर्मुझ सामुद्रधुनीवर ब्रिटन-फ्रान्सचा 'बिग प्लॅन'; ४० देशांना एकत्र आणणार, ट्रम्प यांना डच्चू
18
दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
19
Rohit Sharma Injury : मुंबई इंडियन्ससाठी वाजली धोक्याची घंटा; रोहित शर्मा पुढच्या सामन्याला मुकणार?
20
सिंगल चार्जवर ३२० KM रेंज...किंमत फक्त ₹१.२९ लाख! Ola ची नवीन EV स्कूटर लॉन्च
Daily Top 2Weekly Top 5

सुधारित पुस्तके नाहीत

By admin | Updated: January 14, 2015 23:07 IST

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील जवळपास ६६ व्यावसायिक कोर्सचा अभ्यासक्रम बदलला. तृतीय सेमिस्टर परीक्षा ९ फेब्रुवारीपासून होणार आहे. अभ्यासक्रम बदलून ६ महिन्याचा कालावधी

आयटीआयचा अभ्यासक्रम बदलला : निगेटिव्ह मार्र्किं गमुळे निकाल घसरणारगडचिरोली : औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील जवळपास ६६ व्यावसायिक कोर्सचा अभ्यासक्रम बदलला. तृतीय सेमिस्टर परीक्षा ९ फेब्रुवारीपासून होणार आहे. अभ्यासक्रम बदलून ६ महिन्याचा कालावधी उलटूनही सुधारित पुस्तके प्रकाशीत करण्यात आली नाही. त्यामुळे तोंडावर आलेल्या परीक्षेची तयारी कशी करावी, या विवंचनेत आयटीआय अभ्यासक्रमाचे विद्यार्थी सापडले आहेत. याशिवाय तृतीय सेमिस्टर परीक्षेला नकारात्मक गुणदान पद्धती असल्यामुळे या परीक्षेचा निकाल घसरण्याची दाट शक्यता व्यक्त होत आहे. जिल्ह्यात गडचिरोली जिल्हा मुख्यालयी व बाराही तालुकास्तरावर औद्योगिक प्रशिक्षण संस्था आहेत. या औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये विविध प्रकारचे अभ्यासक्रम आहेत. याशिवाय रामगड, कोरची, खमनचेरू व जांभिया या शासकीय आश्रमशाळांमध्ये आयटीआय अभ्यासक्रमाची सुविधा आहे. यापूर्वी आयटीआयच्या सर्व अभ्यासक्रमाची वर्षातून एकदा परीक्षा व्हायची. यामध्ये प्रात्यक्षिक परीक्षेचा समावेश होता. मात्र आयटीआयच्या मंडळाने सर्व अभ्यासक्रमासाठी जुलै २०१३ पासून सेमिस्टर परीक्षा पद्धती लागू केली. आतापर्यंत दोन सेमिस्टर परीक्षा आटोपल्या आहेत. फेब्रुवारी २०१४ मध्ये झालेल्या प्रथम सेमिस्टरचा गडचिरोली आयटीआयचा निकाल ९८ टक्के आहे. तर आॅगस्ट महिन्यात झालेल्या द्वितीय सेमिस्टर परीक्षेचा निकाल ५७ टक्के आहे. नकारात्मक गुणदान पद्धतीमुळे यापूर्वी द्वितीय सेमिस्टर परीक्षेचा गडचिरोली आयटीआयचा निकाल ३३ टक्के लागला होता. त्यानंतर नकारात्मक गुणदान पद्धतीत सूट देण्याची मागणी विद्यार्थ्यांकडून झाल्यानंतर शासनाने या पद्धतीस सवलत दिली. त्यामुळे गडचिरोली आयटीआयचा निकाल ५७ टक्के झाला. तृतीय सेमिस्टर परीक्षेसाठी ग्रेस देण्यात येणार नसून नकारात्मक गुणदान पद्धती राहणार आहे. तीन उत्तरे चुकीचे सोडविल्यास योग्य उत्तरासाठी मिळालेल्या गुणातून एक गुण वजा होईल, असे आयटीआयच्या मंडळाने निश्चित केले आहे. आयटीआयचा अभ्यासक्रम बदलून सहा महिन्यांचा कालावधी उलटूनही विद्यार्थ्यांच्या हाती सुधारीत पुस्तके पडली नाही. जुन्या पुस्तकातील संदर्भाचा आधार घेऊन विद्यार्थ्यांना तयारी करावी लागत आहे. परीक्षेसाठी अनेक पुस्तके वाचावी लागत असल्याने विद्यार्थ्यांचा त्रास वाढला आहे. मंडळस्तरावर सुधारित पुस्तके तयार करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती सुत्रांकडून मिळाली आहे.आयटीआयच्या अभ्यासक्रमाला सेमिस्टर परीक्षा पद्धती लागू केल्यामुळे राज्यातील अनेक जिल्ह्याच्या आयटीआयचा निकाल घसरला. मात्र त्या मानाने गडचिरोली आयटीआयचा प्रथम व द्वितीय सेमिस्टर परीक्षेचा निकाल समाधानकारक लागला आहे. (स्थानिक प्रतिनिधी)