शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
2
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
3
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
4
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
5
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
6
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
7
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
8
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला मिळाली पदार्पणाची संधी
9
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
10
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
11
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
12
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
13
Video: फक्त २ वर्षातच मुलीने फेडलं ३० लाखांचं शैक्षणिक कर्ज; सांगितल्या ४ सोप्या ट्रीक
14
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
15
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
16
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
17
ना तेल घेतलं, ना गॅस..तरीही भारताने मित्राला बनवलं मालामाल; संरक्षण क्षेत्रात आणखी एक कमाल
18
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
19
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
20
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
Daily Top 2Weekly Top 5

...तर जिल्ह्यात पुन्हा लॉकडाऊन !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2021 05:00 IST

राज्याच्या अनेक शहरांत कोरोना रुग्ण पुन्हा वाढत आहेत. ही बाब विचारात घेता जिल्ह्यातही नागरिकांनी आवश्यक ती खबरदारी घेणे गरजेचे आहे अन्यथा कोरोना रुग्ण वाढू नये म्हणून जिल्ह्यात काही प्रमाणात पुन्हा लॉकडाऊन करावे लागेल, असे जिल्हाधिकारी म्हणाले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतलेल्या ऑनलाइन बैठकीनंतर जिल्हाधिकाऱ्यांनी संबंधित विभागांची बैठक घेतली.

ठळक मुद्देजिल्हाधिकाऱ्यांचे संकेत, कोरोनाला रोखण्यासाठी खबरदारी घ्या

लाेकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : गेल्या दोन महिन्यांपासून सतत कमी होत असलेल्या कोरोना रुग्णांची संख्या आता नागरिकांच्या बिनधास्तपणामुळे पुन्हा वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. परिणामी जिल्ह्यात पुन्हा लॉकडाऊन करण्याची वेळ येईल, असा सूचक इशारा जिल्हाधिकारी दीपक सिंगला यांनी मंगळवारी घेतलेल्या विभागप्रमुखांच्या बैठकीत दिला. राज्याच्या अनेक शहरांत कोरोना रुग्ण पुन्हा वाढत आहेत. ही बाब विचारात घेता जिल्ह्यातही नागरिकांनी आवश्यक ती खबरदारी घेणे गरजेचे आहे अन्यथा कोरोना रुग्ण वाढू नये म्हणून जिल्ह्यात काही प्रमाणात पुन्हा लॉकडाऊन करावे लागेल, असे जिल्हाधिकारी म्हणाले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतलेल्या ऑनलाइन बैठकीनंतर जिल्हाधिकाऱ्यांनी संबंधित विभागांची बैठक घेतली. नागरिकांनी तोंडाला मास्क लावणे, शारीरिक अंतर पाळणे तसेच गर्दी न करणे याबाबत मार्गदर्शक सूचनांचे पालन करणे आवश्यक आहे. या सूचनांची काटेकोर अंमलबजावणी करण्याचे निर्देश त्यांनी विभागप्रमुखांना दिले.जिल्ह्यात कोरोनाच्या रुग्णसंख्येत घट झाली असली तरी काही प्रमाणात पुन्हा रुग्ण वाढताना दिसत आहेत. ही संख्या नियंत्रित ठेवण्यासाठी आरोग्य विभागासह पोलीस विभागाने दक्षता बाळगावी, असे जिल्हाधिकारी यांनी सांगितले. नागरिकांनी कोरोनाबाबत शिस्त पाळली नाही तर पुन्हा काही प्रमाणात कठोर निर्णय घ्यावे लागतील, असे त्यांनी स्पष्ट केले. सार्वजनिक कार्यक्रम यामध्ये यात्रा, जयंती तसेच लग्न समारंभ या ठिकाणी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित राहतात. अशा वेळी मार्गदर्शक सूचनांचे पालन करणे प्रत्येकाला अनिवार्य आहे. त्यामुळे प्रशासनाकडून याबाबत खबरदारी म्हणून पोलीस तसेच आरोग्य विभागाने योग्य ती कारवाई करण्याची सूचना त्यांनी केली. सध्या कोरोना लसीकरण सुरू आहे व रुग्णसंख्याही या महिन्यात कमी झाली. यामुळे नागरिकांनी कोरोनाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदललेला असल्याचे जाणवत आहे; परंतु राज्यात फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्यात रुग्ण पुन्हा वाढत असल्यामुळे गडचिरोलीत यापुढे नागरिकांनी आवश्यक खबरदारी घेऊन कोरोना संसर्ग वाढू न देण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी यावेळी केले. या बैठकीला आरोग्य विभागातील अधिकारी व इतर कर्मचारी उपस्थित होते.

गडचिरोली शहरात वाढताहेत रुग्णगेल्या चार दिवसांत जिल्ह्यात कोरोना रुग्ण वाढले आहेत. रविवारी ७, सोमवारी ९ तर मंगळवारी ४ नवीन रुग्णांची नोंद झाली. या तीन दिवसांतील २० रुग्णांपैकी १६ रुग्ण हे गडचिरोली शहर व लगतच्या परिसरातील आहेत. ४ नवीन बाधितांमध्ये शहराच्या कन्नमवार वॉर्ड, कोटगल आणि गणेशनगरातील प्रत्येकी एकाचा समावेश आहे. याशिवाय एक जण वडसा तालुक्यातील आहे. योग्य खबरदारी न घेतल्यास इतरही तालुक्यांमध्ये कोरोना रुग्णांची संख्या वाढू शकते.

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या