शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Rave Party: पुण्यात मोठी रेव्ह पार्टी...! एकनाथ खडसेंचा जावई ताब्यात, प्रसिद्ध बुकीसोबत दोन तरुणीही...
2
'गिरीश महाजन नावाचा सांड मोकाट सुटलाय; फडणवीसांना...', संजय राऊतांचे टीकास्त्र
3
Pranjal Khewalkar Pune Rave Party: तीन फ्लॅट बुक, तीन महिला गायब...! नुसती रेव्ह पार्टी होती की आणखी काही...; मोठी अपडेट समोर
4
एकनाथ खडसेंचा जावई रेव्ह पार्टीत रंगेहाथ सापडला, तरी सुषमा अंधारे म्हणतात...
5
पुण्यातील रेव्ह पार्टीत सापडलेले खडसेंचे जावई प्रांजल खेवलकर नेमका काय व्यवसाय करतात?
6
Girish Mahajan : रेव्ह पार्टीत रोहिणी खडसेंच्या पतीला अटक; गिरीश महाजन म्हणतात, "नाथाभाऊंनी जावईबापुंना..."
7
एअर इंडिया अपघात एक रहस्यच राहणार? शेवटच्या १० मिनिटांत ब्लॅक बॉक्समध्ये रेकॉर्डिंगच झाले नाही 
8
ट्रम्प यांचा युद्धविरामाचा दावा ठरला फोल; थायलंड आणि कंबोडियामधील तणाव चौथ्या दिवशीही कायम
9
धक्कादायक! हरिद्वारमधील मनसा देवी मंदिरात चेंगराचेंगरी, ६ भाविकांचा मृत्यू, अनेक जण जखमी
10
हे काय चाललेय! एअर इंडियात पदावर एक, निर्णय घेतो भलताच; सरकारने एअर इंडियाला सुनावले...
11
"निलेश साबळे आणि भाऊ कदम हवे होते...", नवीन 'चला हवा येऊ द्या'च्या पहिल्या एपिसोडनंतर प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया
12
"भयंकर परिणाम होतील...", ऊर्जामंत्री एके शर्मा संतापले; वीज अधिकाऱ्याचा ऑडिओ केला शेअर
13
माणिकराव कोकाटेंना साडेसातीची झळ, शनिदेव तारणार की राजकरणातून ‘मुक्ती’ देणार? लवकरच कळेल!
14
सोने ₹३२,००० वरून थेट १ लाखांवर! गेल्या ६ वर्षात २००% वाढ, पुढील ५ वर्षात 'इतकं' महाग होणार!
15
रात्री १२ वाजता सलमान खानची पोस्ट, म्हणाला, "बाबांचं आधीच ऐकलं असतं तर..."
16
Video - अमेरिकेत मोठी दुर्घटना टळली! टेकऑफ दरम्यान लँडिंग गियरला आग, विमानात होते १७९ जण
17
‘धनुष्यबाण-घड्याळ’ वाटपात कौशल्य; महायुतीच्या कामी आल्याचे राहुल नार्वेकरांना बक्षीस मिळणार!
18
७ तासांपेक्षा कमी किंवा ९ तासांपेक्षा जास्त झोपता? लवकर मृत्यूचा धोका, रिसर्चमध्ये मोठा खुलासा
19
ती तरुणी ओळखीच्या दुकानदारासोबत एक रात्र होती; लोणावळ्यात तिघांनी अत्याचार करून कारमधून फेकल्याच्या घटनेवर मोठा खुलासा
20
हायव्होल्टेज ड्रामा! पोराला घेऊन बॉयफ्रेंडच्या घरी गर्लफ्रेंड; बायको म्हणते "माझा नवरा असा नाही, हीच..."

पीक कर्ज भरण्याची लगबग वाढली; बँकांमध्ये शेतकऱ्यांची गर्दी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 19, 2025 16:24 IST

Gadchiroli : व्याजमाफीसाठी धडपड सुरू; एप्रिल महिन्यापासून मिळते नवीन कर्ज

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : मार्च महिना संपण्यास केवळ १३ दिवसांचा कालावधी शिल्लक आहे. त्यामुळे पीक कर्ज भरण्यासाठी शेतकऱ्यांची लगबग वाढली असल्याचे दिसून येत आहे. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांच्या शाखांमध्ये कर्ज भरण्यासाठी शेतकऱ्यांची गर्दी उसळत आहे.

शेतीच्या खर्चासाठी शेतकऱ्याला सरकार मार्फत अगदी शून्य टक्के व्याजदराने कर्जाचा पुरवठा केला जातो. मात्र त्यासाठी शेतकऱ्याने पीक कर्ज ३१ मार्चपूर्वी भरणे आवश्यक आहे. पीक कर्जाचा पैसा जवळपास नऊ महिने वापरता येत असल्याने पीक कर्ज घेण्याचे प्रमाण वाढत चालले आहे.

राष्ट्रीयीकृत बँका, खासगी बँका, ग्रामीण बँका व जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या शाखांमार्फत कर्ज वितरण केले जाते. यात सर्वाधिक कर्ज वितरण जिल्हा सहकारी बँकेमार्फत होते. खरिपातील धान नोव्हेंबर महिन्यात निघते. डिसेंबर महिन्यापासून शेतकरी भावाचा अंदाज बघून धानाची विक्री करतात. फेब्रुवारी महिन्यापासून शेतकरी कर्ज भरत असतात. १७ मार्चपर्यंत जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत ६१.६४ टक्के कर्ज परतफेड करण्यात आली आहे.

३१ मार्चपर्यंत भरले तरच होणार व्याज माफ

  • शासनाकडून टक्के व्याजदराने शेतकऱ्यांना दिले पीक शून्य कर्ज जाते. मात्र त्यासाठी अट म्हणजे संबधित शेतकऱ्याने कर्जाची परतफेड ३१ मार्चपूर्वी करणे आवश्यक आहे.
  • जवळपास नऊ महिने कर्ज वापरता येत असल्याने बहुतांश शेतकरी ३१ मार्चपूर्वी कर्जाची परतफेड करतात. शेवटच्या आठ दिवसांमध्ये सर्वाधिक कर्जाची परतफेड होते.

बचत गटाच्या तुलनेत फायदेशीरएप्रिलमध्ये उचलले कर्ज थेट मार्च महिन्यात भरले जाते. जवळपास १० ते ११ महिने शेतकरी बिनव्याजी पैसे वापरू शकते. त्यामुळे अनेक शेतकरी पीककर्जाची उचल करून नियमितपणे भरणा करतात. बचत गटाच्या तुलनेत पीककर्ज शेतकऱ्यांसाठी अतिशय फायदेशीर आहे. शेतकऱ्यांनी पीककर्ज उचलावे.

सर्वाधिक कर्ज वितरण सहकारी बँकेमार्फतसेवा सहकारी संस्था व आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्थांमार्फत जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक शेतकऱ्यांशी जोडली आहे. तसेच ग्रामीण भागातील बहुतांश नागरिकांचे बँक खाते सहकारी बँकांच्या शाखेत आहेत. त्यामुळे नागरिकांना या बँकेबाबत आपुलकी वाटत असल्याने सर्वाधिक शेतकरी सहकारी बँकेतूनच कर्जाची उचल करतात.

तालुकानिहाय कर्ज वितरण व वसुली (आकडे कोटीत)तालुका          वाटप          वसुली           टक्केकोरची            ५.९५           ३.७०             ६२.२७कुरखेडा         १५.४२           ८.९०            ५७.७४देसाईगंज         ४.३६           २.९१             ६६.६९आरमोरी         १२.९२          ८.२०             ६३.४८गडचिरोली      १०.४६           ७.२०            ६८.८४धानोरा            ९.६६            ६.२०            ६४.१९चामोर्शी          ३३.४९          २१.०२            ६२.७६अहेरी             ८.३३             ४.४०            ५२.८२मुलचेरा           ४.१४            २.१२             ५१.२०भामरागड        २.१८            १.४१             ६४.४८एटापल्ली        ४.६९           २.८१             ५९.७३सिरोंचा            ५.३२            ३.२०             ६०.११एकूण            ११६.९३         ७२.०७           ६१.६४

२३ हजार ३ लाख रुपयांपर्यंतचे कर्ज व्याजमुक्तशेतकऱ्यांना खरीप हंगामात सुमारे ११६ कोटी २२ लाख रुपयांच्या कर्जाचे वितरण करण्यात आले आहे. त्यापैकी १४ हजार ४६ सदस्यांनी कर्ज भरले आहे.

"शून्य टक्के व्याज दराचा लाभघेण्यासाठी शेतकऱ्यांनी ३१ मार्चपूर्वी पीक कर्जाचा भरणा करावा. एप्रिल महिन्यात पुन्हा नवीन खरीप हंगामाचे कर्ज वितरण केले जाते. १७ मार्चपर्यंत ६१.६४ टक्के कर्जवसुली झाली आहे. ३१ मार्चपूर्वीपर्यंत २५ टक्क्यांच्यावर कर्जवसुली होईल, असा अंदाज आहे."- सतीश आयलवार, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बैंक, गडचिरोली

टॅग्स :farmingशेतीbankबँकGadchiroliगडचिरोली