शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
2
भारतीय संगीतातील चिरतरुण स्वर हरपला! 'महाराष्ट्र भूषण' ज्येष्ठ गायिका आशा भोसले काळाच्या पडद्याआड
3
“मंगेशकर कुटुंबातील ईश्वरीय आवाज लाभलेला तारा निखळला”; CM फडणवीसांकडून आशाताईंना श्रद्धांजली
4
US-इराणमधील चर्चा फिस्कटली, पुन्हा युद्धाचे ढग; भारत अलर्ट मोडवर, 'स्पेशल ऑपरेशन' लॉन्च
5
अमेरिका-इराण चर्चा निष्फळ! पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया आली समोर; परराष्ट्र मंत्री इशाक डार म्हणाले...
6
“चंदेरी दुनियेच्या सफरीचा आनंद देणारा दैवी आवाज शांत झाला”; DCM शिंदेंकडून आशाताईंना आदरांजली
7
Asha Bhosale Songs: आशा भोसलेंची 'ही' गाणी प्रचंड गाजली! आजही ऐकली की चेहऱ्यावर हसू अन् डोळ्यांत पाणी येतं
8
आशा ताईंना सर्वात जास्त प्रिय होता 'डाळ-भात', स्वतः बनवायच्या 'हे' खास लोणचं; साध्या राहणीमानानंही जिंकली चाहत्यांची मनं
9
२० भाषा अन् १२ हजारांहून अधिक गाणी! 'असा' होता आशा भोसले यांचा संगीत विश्वातील प्रवास
10
"अशा बॉसना देव सुखी ठेवो!"; तरुणीला झाली आंबे खाण्याची इच्छा, थेट घरी पोहोचल्या पेट्या
11
बाप रे! शाळेत घुसल्या हजारो मधमाश्या, परीक्षेचे पेपर सोडवणाऱ्या मुलांवर केला हल्ला; एका चिमुकल्याचा मृत्यू
12
ज्या आवाजाने कोट्यवधी रसिकांचं मन जिंकलं, त्यांच्याच हातची चवही होती कमाल! आशाताईंनी उभारलं होतं हॉटेल साम्राज्य
13
शांततेचे प्रयत्न अपयशी! इराणसाठी ट्रम्प यांचा खतरनाक 'प्लॅन बी' तयार; भारताच्या तेल पुरवठ्यावरही संकट?
14
Asha Bhosale Death: आशा भोसले यांच्या निधनानंतर मुलाची भावूक प्रतिक्रिया; अंत्यसंस्काराबाबत दिली महत्त्वाची माहिती
15
सावंतवाडीमध्ये मद्यधुंद टेम्पो चालकाची दुचाकीला धडक; चिमुकलीचा जागीच मृत्यू, आई जखमी
16
"इराणने आम्हाला संपवण्याची धमकी दिली, आता स्वतःच...!" शांतता चर्चा फिसकटल्याने नेतन्याहू भडकले
17
शांतता चर्चा फिस्कटल्याने डोनाल्ड ट्रम्प चिडले; आता इराणची खैर नाही, घेराव टाकण्याची दिली धमकी
18
NCB ची मोठी कारवाई! गांजा तस्करी रॅकेटचा पर्दाफाश; २१० किलो गांजा जप्त, चौघांना अटक
19
डॉक्टर, मला मृत्यू हवाय..., लिविंग विल हा पर्याय किती उपयुक्त?
20
Lakshya Mishra : Video - हॉस्टेलमध्ये लेकाचा गूढ मृत्यू; खिडकी पाहताच वडील म्हणाले, "माझ्या मुलाची हत्या झालीय"
Daily Top 2Weekly Top 5

मर्जीतल्या कंत्राटदाराला दिले तेंदू युनिट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2017 01:13 IST

पेसा अधिनियम व शासन निर्णयानुसार जाहीर लिलाव प्रक्रिया राबवून तेंदू युनिट विकणे ग्रामसभांना बंधनकारक आहे.

कोरची तालुका : ग्रा.पं. पदाधिकाऱ्यांनी घेतली पोलिसांकडे धावकोरची : पेसा अधिनियम व शासन निर्णयानुसार जाहीर लिलाव प्रक्रिया राबवून तेंदू युनिट विकणे ग्रामसभांना बंधनकारक आहे. मात्र स्वत:च्या स्वार्थासाठी कोरची क्षेत्रातील काही लोकांनी जाहिरात न देता महाग्रामसभा स्थापन करून व कंत्राटदारांशी संगणमत करून खास कंत्राटदारांना तेंदू युनिट विकले. त्यामुळे ग्रामसभांना अत्यल्प किंमत मिळाली. या प्रकाराची तक्रार काही ग्राम पंचायत पदाधिकाऱ्यांनी १२ मार्च रोजी कोरची पोलीस ठाण्यात दाखल केली आहे. मात्र खास कंत्राटदार व महाग्रामसभांचे वजन अधिक असल्याने पोलिसांनीही या तक्रारीची दखल घेतली नाही.पेसा अधिनियम व शासन निर्णयानुसार तेंदू युनिट विक्रीचा अधिकार ग्राम पंचायतीअंतर्गत ग्रामसभांना देण्यात आला आहे. कोरची तालुक्याची भौगोलिकदृष्ट्या कोरची व कोटगूल अशा दोन भागात विभागणी करण्यात आली आहे. तालुक्यातील एकूण १२५ गावांपैकी ८१ गावे कोरची परिसरात तर ४४ गावे कोटगूल क्षेत्रात समाविष्ट आहेत. कोटगूल क्षेत्रातील कोटगूल, मोठा झेलिया, पिटेसूर, कोसमी क्र. २, नांगपूर व सोनपूर या ग्रा. पं. अंतर्गत ४४ गावांच्या ग्रामसभांनी वृत्तपत्रात रितसर जाहिरात देऊन तेंदू युनिटची लिलाव प्रक्रिया राबविली. यात ग्रामसभांना प्रती गोणी ११ हजार ते १४ हजार ७२५ असा दर तेंदू युनिटवर मिळाला. मात्र कोरची क्षेत्रातील काही लोकांनी महाग्रामसभा स्थापन केली. कंत्राटदारांना बोलावून त्यांच्याशी संगणमत करून वृत्तपत्रात कुठल्याही प्रकारची जाहिरात न देता प्रत्यक्ष कंत्राटदाराला कोरची क्षेत्रातील ८१ गावांमधील तेंदू युनिट देण्याचे ठरविले. त्यानुसार टेंभली, कालापाणी युनिटमध्ये ८०९ रूपये, बेडगाव युनिटमध्ये २ हजार ९१, बेतकाठी युनिटचे ८ हजार १२१, मसेली युनिटचे ७ हजार २०, मर्केकसा -४ हजार ८०० तर नवेझरी युनिटला ७ हजार २० रूपये प्रती गोणी असा दर देण्याचे ठरले. कंत्राटदार व महाग्रामसभेच्या पदाधिकाऱ्यांमध्येच हा सौदा झाला. यावर मसेली, मुरकुटी व बोदालदंड ग्राम पंचायतीच्या पदाधिकाऱ्यांनी हा सौदा आम्हाला मान्य नसल्याचे सांगून त्याविरोधात एकत्र आले. या प्रकाराची तक्रार कोरची पोलीस ठाण्यात ग्रा. पं. पदाधिकाऱ्यांनी दाखल केली. मात्र अद्यापही कुठलीही कारवाई झाली नाही. त्यामुळे जिल्हाधिकारी गडचिरोली यांच्याकडे लेखी निवेदन देऊन कारवाईची मागणी केली आहे. कंत्राटदार व महाग्रामसभेच्या संगणमतामुळे आमच्या ग्रामसभांच्या तेंदू युनिटला अत्यल्प भाव मिळाला, त्यामुळे आर्थिक नुकसान झाले, असे निवेदनात म्हटले आहे. चौकशी करून कारवाई करण्याची मागणी ग्रामपंचायतीच्या पदाधिकाऱ्यांनी केली आहे. (तालुका प्रतिनिधी)मार्च महिन्यातच जंगलाला लागली आगमार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यात खुट कटाईचे काम करण्यात आले. त्यानंतर अगदी काही दिवसातच कोरची तालुक्यातील जंगलाला आगी लागण्यास सुरूवात झाली. तेंदूची लहान रोपटे आगीत जळाल्यानंतर त्याला बुंध्यापासून नवीन पालवी फुटते. यातून मिळणारा तेंदूचा दर्जा अतिशय चांगला असतो. त्याचबरोबर पानेही अधिक येतात, असा गैरसमज नागरिक व तेंदू कंत्राटदाराचा झाला असल्याने जंगलाला आगी लावण्याचे प्रमाण वाढत आहे. आगी लावण्यासाठी तेंदू कत्राटदारच जबाबदार असल्याचे दिसून येत आहे.