शहरं
Join us  
Trending Stories
1
Coronavirus: देशातील अनेक राज्यात कोरोना रुग्णसंख्येत वाढ; महाराष्ट्रात ८६ नवीन रुग्ण आढळले
2
राजासोबत 'ते' तिघे कोण होते, ज्यांच्या मागून सोनम चालत होती; स्थानिक गाईडचा खुलासा
3
तेलंगणा सीमेवरील गोदापात्रात सहा मुले बुडाली; नदीकाठी काळीज पिळवटणाारा आक्रोश
4
भारत-पाकिस्ताननंतर आशियातील आणखी २ देशात युद्धजन्य स्थिती; सीमेवर वाढवले सशस्त्र सैन्य
5
"उद्धव-राज एकत्र येऊ शकतात, उद्धवजींनी त्या लोकांपासून सावध राहावं", गजानन कीर्तिकरांचा ठाकरेंना महत्त्वाचा सल्ला
6
बिहार विधानसभा निवडणूक 2025 : NDA चा फॉर्म्युला ठरला! जाणून घ्या, कुणाच्या वाट्याला किती जागा येणार?
7
पोलीस नोकरी सोडली अन् बनला Youtuber; भारतीय क्रिएटर्सला अडकवलं, हेरगिरीसाठी पाकचा नवा डाव
8
सोनिया गांधी रूटीन चेकअपसाठी शिमला येथील IGMC हॉस्पिटलला दाखल; उपचारानंतर घरी सोडले
9
राज ठाकरेंसोबतच्या संबंधावर सोनाली बेंद्रेने मौन सोडलं; पहिल्यांदाच उघडपणे केला खुलासा
10
'या' कंपनीला रिलायन्सकडून मिळाली 700 कोटींची ऑर्डर; आता सोमवारी फोकसमध्ये राहणार शेअर?
11
स्वत:चं नग्न छायाचित्र दाखवलं संसदेत, खासदार लॉरा मॅकक्लूर यांनी सगळ्यांना दिला धोक्याचा इशारा
12
राहुल गांधींच्या 'महाराष्ट्र निवडणूक फिक्सिंग' लेखावरून राजकारण तापलं, काँग्रेस का हारते? जेपी नड्डा यांनी स्पष्टच सांगितलं!
13
"बापरे..., आम्ही एवढं घाबरलोय की...!"; राज-उद्धव युतीच्या चर्चेवर नितेश राणेंनी उडवली खिल्ली
14
IPL २०२६ मध्ये यंदाच्या विजेत्या RCB टीमवर बंदी आणणार?; बीसीसीआय का घेऊ शकतं मोठा निर्णय?
15
पोलिसांनी घेरताच आरोपी शूटर AK47 ने दिली इमारतीवरून उडी मारण्याची धमकी, नंतर...
16
नको त्या अवस्थेत दुसऱ्यासोबत पाहिले; संतापलेल्या पतीने बायकोचे मुंडके उडविले अन् थेट...
17
Viral Video: लग्नात नवरदेवाच्या मित्रांनी दिलं 'असं' गिफ्ट; पाहून वधूही लाजली, व्हिडीओ व्हायरल!
18
'टीव्ही बंद करून अभ्यास करायला बस' आईचं बोलणं जिव्हारी, दहावीच्या विद्यार्थ्याची आत्महत्या!
19
अरेरे! ६ महिन्यांपूर्वीच लग्न करुन घरी आणली पण 'ती' दिरासोबत पळाली, गावात असं काय घडलं?
20
Diabetes Sign: डायबिटीस होण्याआधी शरीरात दिसू लागतात 'हे' पाच बदल; वेळीच सावध व्हा!

विदर्भस्तरीय मॅराथॉन स्पर्धेत तरूणाई जोशात धावली

By admin | Updated: February 15, 2016 01:22 IST

स्थानिक युवारंग स्पोर्ट अँड सोशीअल क्लबच्या वतीने व्यसनमुक्ती जनजागृती निमित्ताने शहीद दिनाचे औचित्य साधून आरमोरी येथे विदर्भस्तरीय मॅराथॉन स्पर्धा रविवारी घेण्यात आली.

अशोक नेते यांचे प्रतिपादन : स्पर्धेत यश मिळविण्यासाठी सातत्य आवश्यकआरमोरी : स्थानिक युवारंग स्पोर्ट अँड सोशीअल क्लबच्या वतीने व्यसनमुक्ती जनजागृती निमित्ताने शहीद दिनाचे औचित्य साधून आरमोरी येथे विदर्भस्तरीय मॅराथॉन स्पर्धा रविवारी घेण्यात आली. या मॅराथॉन स्पर्धेत तरूणाई धावली. स्पर्धेत यशस्वी होण्यासाठी विद्यार्थी व तरूणाईने सातत्य बाळगावे. अपयशाला खचून न जाता अपयशातून पुन्हा यशाची तयारी करावी, असे आवाहन खासदार अशोक नेते यांनी केले. विदर्भस्तरीय मॅराथॉन स्पर्धेला हिरवी झेंडी दाखवून खासदार अशोक नेते यांनी स्पर्धेचा शुभारंभ केला. यावेळी उद्घाटक म्हणून ते बोलत होते. याप्रसंगी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार क्रिष्णा गजबे होते. प्रमुख अतिथी म्हणून रवींद्र बावनथडे, उपजिल्हा रूग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. प्रमोद गवई, माणिक भोयर, प्रकाश अर्जुनवार, झामसिंग येरमे, भारत बावनथडे उपस्थित होते. यावेळी आमदार क्रिष्णा गजबे यांनी युवक, युवतींना मार्गदर्शन केले. या स्पर्धेत विदर्भातील विविध जिल्ह्यातील शाळकरी व महाविद्यालयीन विद्यार्थी, विद्यार्थिनी सहभागी झाल्या होत्या. सदर मॅराथॉन स्पर्धा १८ वर्षाखालील पुरूष व महिला तसेच १८ वर्षाखालील मुले व मुली अशा चार गटात घेण्यात आली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक भारत बावणथडे, प्रा. दीपक गोंदोळे यांनी केले तर आभार स्वप्नील नरोटे यांनी मानले. यावेळी सत्यनारायण चकीनारपूवार, प्रा. हंसराज बडोले, प्रा. गंगाधर जुआरे, प्रा. ज्ञानेश्वर ठाकरे आदी मान्यवर उपस्थित होते. (वार्ताहर)हे स्पर्धक ठरले विजयाचे मानकरीविदर्भस्तरीय मॅराथॉन स्पर्धेत १८ वर्षाखालील मुलांच्या गटात आकाश शेंडे याने प्रथम, कोमल भोयर द्वितीय तर रितीक पंचबुध्दे यांनी तृतीय क्रमांक पटकाविला. १८ वर्षाखालील मुलींच्या गटात नागपूरची श्वेता कडाम प्रथम, दीक्षा तिजारे द्वितीय तर अश्विनी मोहुर्ले हिने तृतीय क्रमांक पटकाविला. १८ वर्षावरील पुरूष गटात चंद्रपूरचा पवन देशमुख याने प्रथम, चंद्रपूरचा मंगेश वाढई द्वितीय तर चंद्रपूरातीलच चेतन कोटेवार याने तृतीय क्रमांक पटकाविला. १८ वर्षावरील महिला गटात नागपूरची रश्मी गुरनुले प्रथम, आरमोरीची गिता वाटगुरे द्वितीय तर तृतीय क्रमांक चंद्रपूर येथील उषा लेडांगे यांनी पटकाविला. या सर्व विजेत्या स्पर्धकांना उपस्थित मान्यवरांच्या हस्ते रोख पारितोषीक व सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.