शहरं
Join us  
Trending Stories
1
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
2
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
3
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी हॉस्पिटल उपचार सुरू
4
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
5
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
6
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
7
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
8
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
9
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
10
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
11
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
12
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
13
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
14
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
15
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
16
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
17
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
18
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
19
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
20
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
Daily Top 2Weekly Top 5

तेंदूवरून ग्रामसभा व वन विभागात वाद

By admin | Updated: May 27, 2017 01:15 IST

चपराळा अभयारण्याअंतर्गत येत असलेल्या गावांनी तेंदूपत्ता संकलन केले. यावरून वन विभाग व गावकरी यांच्यामध्ये वाद तयार झाला.

गावकरी आक्रमक : चपराळा अभयारण्यातून तेंदू संकलनास केली होती मनाई लोकमत न्यूज नेटवर्क आष्टी : चपराळा अभयारण्याअंतर्गत येत असलेल्या गावांनी तेंदूपत्ता संकलन केले. यावरून वन विभाग व गावकरी यांच्यामध्ये वाद तयार झाला. मात्र जंगलावर आपला अधिकार आहे, तेंदूपत्ता संकलन केल्याने जंगलाची कोणतीही हानी होत नाही. ही बाब गावकऱ्यांनी वन विभागाच्या कर्मचाऱ्यांना पटवून दिल्यानंतर वन विभागाचे पथक आल्यापावली परत गेले. चपराळा अभयारण्यात चंदनखेडी, धन्नूर, चौडमपल्ली, सिंगनपल्ली, चपराळा ही गावे येतात. ही गावे आदिवासीबहुल असल्याने या गावांना पेसा कायद्याअंतर्गत तेंदूपत्ता संकलनाचे अधिकार आहेत. मात्र वन विभागाने विरोध केला होता. वन विभागाला न जुमानता ग्रामस्थांनी तेंदू संकलन केले. ही बाब वन विभागाला माहित होताच गुरूवारी ५० कर्मचाऱ्यांचे पथक तेंदू फळीच्या ठिकाणी तेंदूपुडा जप्त करण्यासाठी पोहोचले. यामुळे नागरिकांचा राग अनावर झाला. पथकातील कर्मचारी व नागरिक यांच्यामध्ये शाब्दीक चकमक उडाली. तेंदूपत्ता संकलन कसे कायद्यान्वये आहे, ही बाब गावकऱ्यांनी पटवून दिली. त्यानंतर पथक परत गेले. उपविभागीय अधिकारी (वन्यजीव) कैलुके, आरएफओ आत्राम, मडावी, पीएसआय संदीप कराडे यावेळी उपस्थित होते.