प्रदीप बोडणे ।लोकमत न्यूज नेटवर्कवैरागड : वृषभ पूजन म्हणजे, बैल पोळा. बारा महिने पाठीवर आसूड झेलणाºया बैलाला पुजन्याचा दिवस. दुसरा दिवस पोळ्याचा पाडवा. हा दिवस ग्रामीण भागात मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. या दिवशी अगदी पहाटे ‘ईडा-पिडा-ढेकून-मोंगसा (डास) घेऊन जा गेऽऽऽ मारबत’ अशी हाकारी देण्याची प्रथा होती. यामुळे माणसाच्या जीवनातील दु:ख कमी होण्यास मदत होते, अशी समजूत होती. मात्र आता ही प्रथा काळाच्या ओघात संपत चालली आहे. त्यामुळे मारबतीच्या दिवशी पहाटेला ऐकू येणारी ‘ईडा-पिडा-ढेकून-मोंगसा (डास) घेऊन जा गेऽऽऽ मारबत’ ही गुंज लुप्त होत असल्याचे दिसून येत आहे.द्वापार युगात भगवान कृष्णाला मारण्यासाठी पुतना राक्षसीने मायावी रूप धारण केले व मथूरेत प्रवेश केला. बाल कृष्णाला स्तनपानातून विष पाजण्याचा प्रयत्न केला. कृष्णाने तिचा डाव ओळखून राक्षसीनचा वध केला. तिचा अगडबंब देह धारातिर्थी पडला होता. नंदलाल राजाच्या महलातून पुतना राक्षसीनचा अगडबंब मृतदेह बाहेर काढता येत नसल्याने तिचे हातपाय तोडून गावाच्या सीमेवर नेऊन पुरण्यात आले. तेव्हापासून ग्रामीण भागात मारबतीच्या दिवशी पहाटे हातपाय नसलेली बाहुली व पहिल्या दिवशीच्या पाऊणचारातील वडा-पुरी नेऊन गावाच्या सीमेवर ठेवण्याची प्रथा आहे.ग्रामीण भागातील ९५ टक्के नागरिक शेती व्यवसाय करतात. वर्षभर बैल शेतात राबत असल्याने पोळा सणाला विशेष महत्त्व आहे. पोळा सणाच्या दिवशी बैलाचे पूजन करून त्याचे उपकार फेडण्याचा प्रयत्न शेतकºयांकडून केला जातो. मात्र काळाच्या ओघात शेतीची साधने बदलत चालली आहेत. बैलांची जागा ट्रॅक्टर घेत आहे. अनेक शेतकºयांनी शेतीला तिलांजली दिली आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील बैलांची संख्या कमी झाली आहे. त्यामुळे बैल पोळ्याचाही उत्साह कमी झाला आहे. मारबतीच्याही अनेक प्रथा बंद पडत चालल्या असल्याचे दिसून येत आहे.मिरवणुकीही संपल्याझाडीपट्टीतील काही गावांमध्ये काळी व पिवळी मारबतीच्या मिरवणुका काढल्या जात होत्या. मात्र काळाच्या ओघात या मिरवणुकाही आता काढणे बंद झाले आहे. विदर्भात नागपूर येथील काळी-पिवळी मारबतीची मिरवणूक आजही प्रसिध्द आहे.मारबतीचा दिवसही पोळ्याच्या सणाप्रमाणेच महत्त्वाचा आहे. मात्र आता संकल्पना बदलत चालली आहे. मारबतीच्या दिवशी दारू ढोसून मांसाहाराचे सेवन करणे, दिवसभर पत्ते, झेंडीमुंडी यासारखे पैशाचे खेळ खेळण्यावर भर दिसतो.
‘घेऊन जाऽऽऽ गे मारबत’चा आवाज लुप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2017 23:03 IST
वृषभ पूजन म्हणजे, बैल पोळा. बारा महिने पाठीवर आसूड झेलणाºया बैलाला पुजन्याचा दिवस. दुसरा दिवस पोळ्याचा पाडवा.
‘घेऊन जाऽऽऽ गे मारबत’चा आवाज लुप्त
ठळक मुद्देग्रामीण साज हरविला : आधुनिक युगात सणांचे महत्त्व झाले कमी