शहरं
Join us  
Trending Stories
1
“आशाजी, लवकरात लवकर बऱ्या व्हा”; पंतप्रधान मोदींकडून तब्येतीची विचारपूस अन् केली प्रार्थना
2
अमेरिका-इराण चर्चा फिस्कटली; काय होत्या अमेरिकेच्या प्रमुख मागण्या? आता पाकिस्ताननं दोघांकडे केली नवी मागणी
3
ट्रम्प यांना चैन पडेना, इराण चर्चेची प्रत्येक अपडेट घेतली; व्हान्स यांना हॉटलाइनवर फोनाफोनी!
4
"अमेरिकेच्या अवास्तव मागण्या...!" इराणने अमेरिकेवर फोडलं शांतता चर्चा फिसकटण्याचं खापर; व्हॉन्स म्हणाले...
5
Ashok Kharat : औषधे आणि केबिनमधील ठसे; भोंदू अशोक खरातच्या कार्यालयाची पथकाकडून पुन्हा झडती
6
Manav Shah : Video-"एकटेपणा, जेलसारखं वाटायचं"; ४० लाखांचं पॅकेज सोडून भारतात परतला तरुण, काय घडलं?
7
खळबळजनक! अंगणवाडीत मुलांनी खाल्लं उंदीर मारण्याचं औषध, ५ जणांची प्रकृती बिघडली
8
पुन्हा युद्ध भडकणार? अमेरिका-इराण यांच्यात तोडगा नाहीच; पुढे काय होणार? जगाचे लक्ष लागले!
9
काळाचा घाला! हायवेवर गाडी पंक्चर, टायर बदलताना ट्रकने चिरडलं; ५ जणांचा मृत्यू
10
परळ- सीएसएमटी रेल्वे मार्गासाठी स्वदेशी मिल भागातील चाळी पडणार, ७१४ बाधित कुटुंबांचे पुनर्वसन पूर्ण
11
२१ तास बैठक झाली, चर्चा फिस्कटली; जे.डी. व्हान्स अमेरिकेत परतणार, इराणने अटी अमान्य केल्या!
12
महिला मतदारांचा वाढता टक्का; यंदाच्या निकालात ठरणार ‘गेमचेंजर’, आसाम, केरळ आणि पुद्दुचेरीत यंदा 'या' मुद्द्यावर महिलांनी केले मतदान
13
NIRDPR मध्ये जॉब मिळवण्याची संधी; जाणून घ्या पात्रता आणि अर्ज प्रक्रिया!
14
भाजप सरकार बंगालमधील ‘सिंडिकेट राज’ संपवेल, अमित शाह यांचं आश्वासन
15
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
16
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
17
घुसखोरांना बंगाल सोडावेच लागेल, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा सक्त इशारा
18
‘....तोपर्यंत मुख्यमंत्रिपदाबाबत चर्चा नाही’, केरळबाबत काँग्रेसने घेतला मोठा निर्णय
19
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
20
कल्याणचे आमदार राजेश मोरे यांना न्यायालयाचा दिलासा, पराभूत प्रमोद पाटील यांची याचिका फेटाळली
Daily Top 2Weekly Top 5

विद्यार्थिनीवरील कारवाई मागे घ्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 17, 2017 00:48 IST

येथील आदिवासी मुलींच्या शासकीय वसतिगृहात चार वर्षापासून राहून समाजकार्य महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या ...

जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन : बीआरएसपीची मागणीगडचिरोली : येथील आदिवासी मुलींच्या शासकीय वसतिगृहात चार वर्षापासून राहून समाजकार्य महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या देवयत्री टोहलिया या विद्यार्थिनीवर नियमांच्या उल्लंघनाचा ठपका ठेवून एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी गडचिरोली यांनी तिच्यावर केलेली कारवाई अन्यायकारक आहे. सदर कारवाई तत्काळ मागे घ्यावी, अशी मागणी बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टीच्या वतीने करण्यात आली आहे.निवासी उपजिल्हाधिकारी सोनवाने यांनी निवेदन स्वीकारलेचालू शैक्षणिक सत्रातसुद्धा देवयत्रीला आदिवासी विभागाच्या वसतिगृहात नियमानुसार प्रवेश देण्यात आला. तिने कोणतेही बेकायदेशीर काम केले नाही, अथवा सहभागी नाही. आदिवासी विद्यार्थ्यांच्या वसतिगृहात इतर सुविधांच्या मागणीसाठी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अधिकाऱ्यांना भेटायला गेलेल्या गटाची ती एक भाग होती. कायद्याच्या अधीन राहून सोयीसुविधांची मागणी करण्यात आली. परंतु तिच्यावर पोलीस कारवाई अंतर्गत कलम १४४ अन्वये आदेश काढण्यात आला. यानुसार तिला शाळा, कॉलेज वसतिगृहामध्ये प्रवेश करण्यास व थांबण्यास मनाई करण्यात आली. व याचे उल्लंघन केल्यास कारवाईचा इशारा देण्यात आला. ही कारवाई अन्यायकारक आहे, असे बीआरएसपीने म्हटले आहे.