शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

पारडीतील कृषी केंद्राचा परवाना निलंबित

By admin | Updated: August 21, 2016 02:37 IST

तालुक्यातील पारडी येथील प्रीती कृषी केंद्राचे संचालक खताची बेभाव विक्री करीत असल्याबाबतचे वृत्त लोकमतने शनिवारी प्रकाशित केले होते.

गडचिरोली : तालुक्यातील पारडी येथील प्रीती कृषी केंद्राचे संचालक खताची बेभाव विक्री करीत असल्याबाबतचे वृत्त लोकमतने शनिवारी प्रकाशित केले होते. या वृत्ताची दखल घेत कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी शनिवारीच धाड टाकली. खत व बियाण्यांच्या विक्रीमध्ये अनियमितता आढळून आल्याने कृषी केंद्रात साठा करून ठेवलेल्या १ लाख २२ हजार ६२४ रूपयांचे खत पुढील आदेशापर्यंत विक्रीस प्रतिबंध घालण्यात आले आहे. तर बियाणे विक्रीचा परवाना निलंबित करण्यात आला आहे. पारडी येथील प्रीती कृषी केंद्राचे संचालक ईश्वर मुळे हे शेतकऱ्यांना नियमाप्रमाणे २९८ रूपयांचेच युरिया खताचे व ९०० इफको खताचे बिल देत होते. मात्र प्रत्यक्ष शेतकऱ्यांकडून युरियासाठी ३४० ते ४०० रूपये व इफको खतासाठी १००० ते १२०० रूपये घेत होते. याबाबतची तक्रार गावातील शेतकऱ्यांनी केल्यानंतर लोकमतने वृत्त प्रकाशित केले. या वृत्ताची दखल घेत जिल्हा कृषी अधिकारी एस. टी. पठाण, गडचिरोली तालुका गुण नियंत्रक निरीक्षक राजनहिरे यांच्या संयुक्त पथकाने शनिवारी धाड टाकली. धाडीदरम्यान कागदपत्रांची तपासणी केली असता, बियाण्यांचे उगम परवाने नसल्याचे आढळून आले. त्याचबरोबर खत विक्री अहवाल सुद्धा सादर केला नव्हता. रासायनिक खत नियंत्रक आदेश १९८५ मधील खंड ३५ (१) (बी) व अत्यावश्यक वस्तू अधिनियम १९५५ मधील ईसीए ३ (२) सी या तरदुतीचा भंग करणारी आहे. त्यामुळे संबंधित कृषी केंद्र चालकाचा बियाणे विक्री परवाना निलंबित करण्यात आला. त्याचबरोबर कृषी केंद्रात असलेला खतसाठा कृषी विभागाचा पुढील आदेश प्राप्त होईपर्यंत विक्री न करण्याचे निर्देश दिले आहेत. सदर कारवाई जिल्हा कृषी विकास अधिकारी एस. पी. सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनात करण्यात आली. (नगर प्रतिनिधी)