आॅनलाईन लोकमतगडचिरोली : नक्षलविरोधी अभियानादरम्यान बुधवारी ७ नक्षलवाद्यांना कंठस्रान घालणाऱ्या गडचिरोली पोलिसांना नक्षल सप्ताहाच्या शेवटच्या दिवशीच्या पूर्वसंध्येला यश मिळाले असून गुरूवारी दोन नक्षल दलम सदस्यांनी आत्मसमर्पण केले.कमला रामसू गावळे व नागेश उर्फ राजेश मतूरसाय मडावी अशी आत्मसमर्पण केलेल्या नक्षल्यांची नावे आहेत. कमला ही कोरची दलममध्ये कार्यरत होती. २०११ मध्ये केकडी दलममध्ये ती सदस्य पदावर भरती झाली होती. फुलगोदी चकमक, टाहकाटोला येथील खून प्रकरणामध्ये तिचा समावेश होता. दोघांवर प्रत्येकी दोन लाख रूपयांचे बक्षीस होते. नागेश मडावी हा २०११ मध्ये छत्तीसगड राज्यातील पल्लेमाडी दलममध्ये सहभागी झाला. यरकड-नांदगाव (छत्तीसगड) मार्गावरील चकमक, सितगाव-मुंजाल (छत्तीसगड) मार्गावरील भूसुरूंग स्फोट घडविणे, खून, ग्रामपंचायतमध्ये काळा झेंडा फडकविणे आदी घटनांमध्ये नागेशचा समावेश आहे. त्याच्यावर दोन लाख रूपयांचे बक्षीस होते. चालू वर्षात विविध दलमच्या १९ माओवाद्यांनी आत्मसमर्पण केले आहे.
गडचिरोलीत नक्षल सप्ताहाच्या पूर्वसंध्येला दोन नक्षल्यांचे आत्मसमर्पण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 8, 2017 11:44 IST
नक्षलविरोधी अभियानादरम्यान बुधवारी ७ नक्षलवाद्यांना कंठस्रान घालणाऱ्या गडचिरोली पोलिसांना नक्षल सप्ताहाच्या शेवटच्या दिवशीच्या पूर्वसंध्येला यश मिळाले असून गुरूवारी दोन नक्षल दलम सदस्यांनी आत्मसमर्पण केले.
गडचिरोलीत नक्षल सप्ताहाच्या पूर्वसंध्येला दोन नक्षल्यांचे आत्मसमर्पण
ठळक मुद्देदोघांवरही दोन लाखांचे बक्षीस