शहरं
Join us  
Trending Stories
1
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
2
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
3
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
4
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; या खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
5
Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
6
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
7
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
8
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
9
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
10
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
11
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
12
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
13
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
14
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
15
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
16
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
17
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
18
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
19
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
20
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
Daily Top 2Weekly Top 5

गडचिराेलीत जहाल महिला नक्षलीचे आत्मसमर्पण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2021 08:16 IST

Gadchiroli news हिंसाचाराच्या जीवनाला कंटाळून आणि शासनाच्या आत्मसर्पण याेजनेमुळे प्रभावित हाेऊन सहा लाख रुपयांचे बक्षीस असलेल्या एका जहाल महिला नक्षलीने २३ जून राेजी गडचिराेलीत आत्मसमर्पण केले.

ठळक मुद्देसहा लाखांचे होते बक्षीसपाेलीस अधीक्षकांची माहिती

लाेकमत न्यूज नेटवर्क

गडचिराेली : हिंसाचाराच्या जीवनाला कंटाळून आणि शासनाच्या आत्मसर्पण याेजनेमुळे प्रभावित हाेऊन सहा लाख रुपयांचे बक्षीस असलेल्या एका जहाल महिला नक्षलीने २३ जून राेजी गडचिराेलीत आत्मसमर्पण केले. येथील नवजीवन वसाहतीच्या परिसरात आयाेजित कार्यक्रमात जिल्हा पाेलीस अधीक्षक अंकित गाेयल यांनी तिचे स्वागत केले.

शशिकला ऊर्फ गुनी ऊर्फ झुरी ऊर्फ अंजू आसाराम आचला (३०) रा. माेठा झेलिया, ता. धानाेरा असे आत्मसमर्पित नक्षलीचे नाव आहे. शशिकला ही डिसेंबर २००६ मध्ये टिपागड दलममध्ये सदस्य म्हणून भरती झाली होती. सध्या ती टिपागड एलओएसमध्ये एसीएम पदावर कार्यरत हाेती. तिच्यावर नक्षल चकमकीचे १५, जाळपाेळीचा एक आणि इतर चार असे एकूण २० गुन्हे दाखल आहेत. त्यामुळे तिला पकडून देणाऱ्यास शासनाने सहा लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले हाेते.

आत्मसमर्पण याेजनेमुळे अनेक नक्षलवादी चळवळीतून बाहेर पडत आहेत, अशी माहिती पाेलीस अधीक्षक अंकित गाेयल यांनी यावेळी दिली. याप्रसंगी अपर पाेलीस अधीक्षक (अभियान) मनीष कलवानिया, अपर पाेलीस अधीक्षक (प्रशासन) समीर शेख, अहेरीचे अपर पाेलीस अधीक्षक साेमय मुंडे आदी उपस्थित हाेते.

दाेन वर्षांत ३९ नक्षलींची शरणागती

गडचिराेली पाेलीस दलाच्या वतीने प्रभावीपणे राबविण्यात आलेल्या नक्षलविराेधी अभियानामुळे सन २०१९-२०२१ या वर्षामध्ये एकूण ३९ नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केले. यामध्ये चार डीव्हीसी, दाेन दलम कमांडर, तीन उपकमांडर, २९ सदस्य आणि एक जनमिलिशिया आदींचा समावेश आहे. आता या आत्मसमर्पितांना आश्रय देण्यासाठी पोलिसांनी गडचिरोली शहरालगत खास वसाहत तयार केल्यामुळे आत्मसमर्पणाचे प्रमाण वाढेल, अशी आशा व्यक्त केली जात आहे.

टॅग्स :naxaliteनक्षलवादी