शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

लोकबिरादरीत २५० रूग्णांवर शस्त्रक्रिया

By admin | Updated: March 26, 2016 01:06 IST

येथील लोकबिरादरी रूग्णालयाच्या वतीने विविध आजारांनी ग्रस्त असलेल्या सुमारे अडीचशेपेक्षा अधिक रूग्णांवर ....

तीन शिबिरांचे आयोजन : रूग्णांना मिळाले जीवदानभामरागड : येथील लोकबिरादरी रूग्णालयाच्या वतीने विविध आजारांनी ग्रस्त असलेल्या सुमारे अडीचशेपेक्षा अधिक रूग्णांवर शस्त्रक्रिया करून त्यांना नवजीवन प्राप्त करून दिले आहे. लोकबिरादरी रूग्णालयाच्या या कार्याची रूग्णांनी प्रशंसा केली असून या रूग्णालयात येणाऱ्या रूग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. सर्वसामान्य व गरीब नागरिकांना विविध आजारांच्या असलेल्या शस्त्रक्रिया खासगी रूग्णालयांमध्ये करणे आर्थिक परिस्थितीमुळे शक्य होत नाही. गडचिरोली येथील जिल्हा सामान्य रूग्णालयात जरी मोफत शस्त्रक्रिया होत असली तरी गडचिरोलीसारख्या शहराच्या ठिकाणी येण्यास भामरागड, एटापल्ली तालुक्याच्या दुर्गम भागातील आदिवासी रूग्ण तयार होत नाही. हे रूग्ण लोकबिरादरी प्रकल्पातच उपचार घेण्यास अधिक पसंती दर्शवितात. मागील तीन महिन्यांत छत्तीसगड, तेलंगणा राज्य व गडचिरोली जिल्ह्यातील हजारो रूग्णांनी विविध रोगांचा उपचार घेतला. ज्या रूग्णांना शस्त्रक्रियेची गरज होती. अशा अडीचशे पेक्षा अधिक रूग्णांवर शस्त्रक्रियासुध्दा करण्यात आली. शस्त्रक्रियेनंतर आवश्यक असलेली औषधेसुध्दा या रूग्णालयाच्या वतीने मोफत उपलब्ध करून दिल्याने गरीब रूग्णांसाठी सदर रूग्णालय महत्त्वाचे ठरले आहे. मागील आठवड्यात पाच पेक्षा अधिक रूग्णांवर शस्त्रक्रिया करण्यात आल्या. तीन महिन्यांत तीन शस्त्रक्रिया शिबिरांचे आयोजन करण्यात आले. शिबिरादरम्यान समाजसेवक डॉ. प्रकाश आमटे, डॉ. मंदाकिनी आमटे, डॉ. दिगंत आमटे, डॉ. अनघा आमटे यांच्यासह यवतमाळ व नागपूर येथून आलेल्या तज्ज्ञांनी शस्त्रक्रिया पार पाडल्या. शस्त्रक्रियेनंतर रूग्णांची सेवा करण्याचे काम सिस्टर व वॉर्डबाय करतात. संध्या येप्पलवार, जगदिश बुरडकर, बबन पांचाळ, शारदा ओक्सा, गणेश हिवरकर, अरविंद मडावी, सुरेंद्र सडमेक, रमिला वाचामी, कौशल्या नैताम, ममिता झाडे, सविता मडावी, पार्वती वड्डे, लक्ष्मी ओक्सा, शंकर गोटा, प्रदीप वाघ, प्रकाश महाळकर, डॉ. मिनल मून हे कर्मचारी सुध्दा सहकार्य लाभले. (तालुका प्रतिनिधी)