शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलने सीझफायर तोडले, ट्रम्प प्रचंड नाराज; म्हणाले, तातडीने पायलटना माघारी बोलवा...
2
डोनाल्ड ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतरही इस्रायलने केला इराणवर हल्ला, तेहरान स्फोटांनी हादरले!
3
शक्तिपीठ महामार्गाला मंजुरी, २० हजार कोटींची तरतूद; GSTत बदल होणार, मंत्रिमंडळाचे मोठे निर्णय
4
तुर्कीला धडा शिकवण्याची तयारी सुरू?; सर्वात मोठ्या शत्रूच्या देशात पोहचले भारतीय हवाई दल प्रमुख
5
“झूठ बोले कौवा काटे”; राहुल गांधींच्या आरोपांना CM फडणवीसांचे उत्तर, सगळी आकेडवारीच दिली
6
Panchayat 4 Review : 'वो अफ़्साना जिसे अंजाम तक लाना न हो मुमकिन..'; दुर्दैवाने 'पंचायत ४'विषयी हेच म्हणावं लागेल
7
मुंबईतील बड्या उद्योजकाचे गुप्त ‘महादान’; अयोध्येतील राम मंदिराला तब्बल १७५ किलो सोने अर्पण
8
Nuclear Weapon : कोणता देश अणुबॉम्ब बनवतोय अन् कोणता नाही? कसं आणि कोण ठेवतं लक्ष? जाणून घ्या...
9
“भास्कर जाधवांनी शिंदेंचे नेतृत्व स्वीकारले तर आनंद, मातोश्रीवरचा राग...”; कुणी दिला सल्ला?
10
दिलजीत दोसांझच्या सिनेमात पाकिस्तानी अभिनेत्रीची भूमिका, टीका झाल्यावर म्हणाला...
11
Rahul Gandhi :'निवडणुका नियमांनुसार होतात', राहुल गांधींच्या आरोपांवर निवडणूक आयोगाचे उत्तर; चर्चेसाठी बोलावले
12
अपघाताच्या एक दिवस आधी एअर इंडियाच्या सीईओंचा पगार ४६% वाढवला; आता किती पैसे मिळतात?
13
विहिरीत पडलेल्या वासराला वाचवण्यासाठी उतरलेले तरुण एका पाठोपाठ एक बेशुद्ध पडले, पाच जणांचा मृत्यू, संपूर्ण गावावर शोककळा  
14
प्रेक्षकांची प्रतीक्षा आज संपणार; काही तासात सुबोध भावे-तेजश्रीच्या मालिकेचा प्रोमो येणार; पाहा झलक
15
"हात लावशील तर ३५ तुकडे करेन"; मधुचंद्राच्या रात्रीच नवरीने दिली थेट धमकी! म्हणाली...
16
केदारनाथला देवाकडे काय मागितलं? चाहत्याचा प्रश्न, अमृताचं मन जिंकणारं उत्तर, म्हणाली- "खरं सांगू..."
17
अहमदाबाद विमान अपघात: ब्लॅक बॉक्सची माहिती कधीपर्यंत मिळेल? केंद्रीय मंत्री नायडू म्हणाले...
18
हिंदी मोफत शिकवत असतील तर त्यात गैर काय?; राष्ट्रवादी आमदार संग्राम जगतापांचा सवाल
19
ज्या कतारवर हल्ला केला, त्याच कतारच्या शेखने फोन केला...; अन् इराण सीझफायरसाठी तयारही झाला...
20
"अमेरिकेला गुडघे टेकायला लावले, इराण बनला मुस्लिम जगताचा नेता’’, महबूबा मुफ्ती यांनी केलं कौतुक  

४७ रुग्णांवर शस्त्रक्रिया

By admin | Updated: February 11, 2015 02:01 IST

ज्येष्ठ समाजसेवक डॉ. अभय बंग व राणी बंग यांच्या सर्च शोधग्राम येथे घेण्यात आलेल्या शस्त्रक्रिया शिबिरात एकूण ४७ रुग्णांवर यशस्वीरीत्या शस्त्रक्रिया करण्यात आली.

धानोरा : ज्येष्ठ समाजसेवक डॉ. अभय बंग व राणी बंग यांच्या सर्च शोधग्राम येथे घेण्यात आलेल्या शस्त्रक्रिया शिबिरात एकूण ४७ रुग्णांवर यशस्वीरीत्या शस्त्रक्रिया करण्यात आली. सर्च शोधग्राम येथे मॉ दंतेश्वरी रुग्णालयात ३१ जानेवारी ते १ फेब्रुवारी २०१५ दरम्यान शस्त्रक्रिया शिबिर घेण्यात आले. मॉ दंतेश्वरी मातेच्या पूजनाने या शिबिराची सुरुवात करण्यात आली. या शिबिरात हर्निया, अंगावरील गाठी, लहान मुलांचे हर्निया, जन्मजात असलेले आजार, गर्भाशयाचे आजार आदी आजारांनी ग्रस्त असलेल्या ४७ रुग्णांवर यशस्वीरीत्या शस्त्रक्रिया करण्यात आली. या शिबिरादरम्यान डॉ. राणी बंग यांनी रुग्णांना आरोग्यविषयक मार्गदर्शन केले. तसेच शस्त्रक्रियेनंतरच्या काळात रुग्णांनी कोणती काळजी घ्यावी, याबाबतचे मार्गदर्शन डॉक्टरांच्या चमूने केले. शस्त्रक्रियेसाठी सातारा व सांगली येथून १५ डॉक्टरांची चमू बोलाविण्यात आली होती. शस्त्रक्रियेसाठी जनरल सर्जन डॉ. संदीप श्रोत्री, डॉ. गिरीश पेंढरकर, भूलतज्ज्ञ डॉ. माधुरी लिमये, डॉ. शिरीष लिमये, डॉ. भाकरे आदींनी मोलाची कामगिरी पार पाडली.शिबिराच्या यशस्वीतेसाठी सर्च येथील मॉ दंतेश्वरी रुग्णालयाचे डॉ. योगेश कालकोंडे, मृणाल कालकोंडे, ऐश्वर्या रेवाडकर, डॉ. वैभव तातावार, सुनंदा खोरगडे तसेच नर्सिंग चमूमधील नंदा सुर्वे, वर्षा लाडे, करिश्मा दर्रो, विशाखा नगराळे, अनुप गायकवाड, रवींद्र भुसारी, प्रभाकर उमरगुंडावार, प्रकाश राऊत, जयवंता कल्लो आदींनी सहकार्य केले.याप्रसंगी शस्त्रक्रिया झालेल्या रुग्णांनी व नातेवाईकांनी आपले मनोगत व्यक्त केले. मॉ दंतेश्वरी रुग्णालयात रुग्णांची पुरेशी काळजी घेतल्या जात असल्याचे अनेक रुग्णांनी सांगितले. (तालुका प्रतिनिधी)