शहरं
Join us  
Trending Stories
1
मतदारयादीच्या 'फिल्टर'चा बंगालच्या सत्तेवर परिणाम, ९१ लाख नावे बाद, ६५ ते ७० मतदारसंघांत ठरावीक केंद्रे ठरणार निर्णायक, वगळलेल्या नावांचा प्रभाव येथेच
2
आजचे राशीभविष्य, १३ एप्रिल २०२६: नकारात्मकता दूर ठेवा, लाभ होईल, मान-सन्मान वाढेल!
3
महिला आरक्षणासाठी पंतप्रधानांनी सर्वच पक्षांकडून मागितले समर्थन, पक्षांच्या गटनेत्यांना पत्र लिहून आवाहन
4
पश्चिम बंगालमधील मतदारयाद्यांबाबत सुप्रीम कोर्टात आज निकाल
5
विशेष लेख: पाकिस्तानच्या भूमिकेवरून एवढा गोंधळ, गदारोळ का?
6
चीनने पाकव्याप्त काश्मीर-अफगाण सीमेजवळ स्थापन केला नवीन विभाग
7
‘ईशान्येला देशापासून वेगळे करण्याचा डाव’, पंतप्रधान मोदींचा गंभीर आरोप
8
अमरनाथ यात्रा ३ जुलैला सुरू होणार; १५ एप्रिलपासून नोंदणी
9
Iran War: इराणच्या युद्धात महासत्ता अमेरिकेचा ‘सेल्फ गोल’
10
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
11
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
12
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
13
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
14
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
15
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
16
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
17
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
18
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
19
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
20
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

शेततळ्याने दिला आधार

By admin | Updated: October 10, 2015 01:36 IST

गडचिरोली जिल्ह्यात वन कायद्यामुळे सिंचन प्रकल्प रखडलेले आहेत. त्यामुळे सिंचनाची सुविधा मागील ३० वर्षात निर्माण होऊ शकलेली नाही.

तीन एकरला लाभ : विदर्भ संघम सिंचन कार्यक्रमातून पिसेवडधात शेतकऱ्याला अच्छे दिनडी. के. मेश्राम मानापूर/देलनवाडीगडचिरोली जिल्ह्यात वन कायद्यामुळे सिंचन प्रकल्प रखडलेले आहेत. त्यामुळे सिंचनाची सुविधा मागील ३० वर्षात निर्माण होऊ शकलेली नाही. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना पावसाच्या भरवशावर शेती करावी लागत आहे. पावसाचाही अनियमितपणा वाढत चालला असून शेतकरी अडचणीत आला आहे. अशा परिस्थितीत विदर्भ संघम सिंचन विकास कार्यक्रमाच्या माध्यमातून बांधण्यात आलेल्या शेततळ्याने तीन एकर शेतीतील धानपीक वाचविण्यास शेतकऱ्याला मदत झाल्याचे उदाहरण आरमोरी तालुक्यातील पिसेवडधा गावात दिसून आले आहे.आरमोरी तालुक्यात काही भागाला इटियाडोह प्रकल्पाचे पाणी उपलब्ध होते. मात्र तालुक्यातील बऱ्याच गावातील शेतीही पावसाच्या पाण्यावरच अवलंबून आहे. पिसेवडधा भागातही अशीच परिस्थिती होती. या भागात सिंचन सुविधा वाढीस लागव्या म्हणून २०१० मध्ये तत्कालीन मख्ुयमंत्री अशोक चव्हाण यांनी विदर्भ संघम सिंचन विकास कार्यक्रम खास गडचिरोली जिल्ह्यासाठी लागू केला. याअंतर्गत शेतकऱ्यांना थेट वैयक्तिक लाभाच्या सिंचन सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या. पिसेवडधा येथील भगवान बोरूले या शेतकऱ्याच्या शेतात कृषी विभागाने शेततळे तयार केले. या शेततळ्याच्या पाण्याचा आॅईल इंजिनद्वारे उपसा करून धानपिकाला देण्याची सोय शेतकऱ्याला उपलब्ध झाली. यंदा पाऊस अनियमित स्वरूपात झाला. अशावेळी बोरूले यांनी आपल्या शेतातील शेततळ्याचे पाणी उपसून तीन एकरातील धानपीक वाचविले. या शेततळ्यात मत्स्य उत्पादन करण्याचाही भगवान बोरूले यांचा मानस असल्याचे त्यांनी लोकमतशी बोलताना सांगितले. आता आपले धानपीक कापणीला आले आहे. केवळ शेततळ्याच्या भरवशावरच यंदा धानपीक वाचविता आले. अन्यथा परिस्थिती कठीण होती, अशी भावना शेतकऱ्याने व्यक्त केली.