शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
2
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
3
"मी साडी नेसलेली होती, त्यात अश्लीलता कुठे होती?", ती तरुणी ढसाढसा रडली, ट्रोलिंगनंतर 'धक-धक' गर्ल काय म्हणाली?
4
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
5
Praful Hinge नं सांगून पहिल्याच बॉलवर काढली Vaibhav Suryavanshi ची विकेट; मॅचनंतर म्हणाला...
6
बालमैत्रिणीसाठी आशाताई दोनदा आल्या गडहिंग्लजला! महिला बँकेचे उद्घाटन, महाविद्यालयाच्या मदतीसाठी विनामूल्य कार्यक्रम 
7
शॉम्पूच्या बॉटलमध्ये ४.२६ कोटींचे कोकेन, नागपुरात राजधानी एक्सप्रेसमध्ये सिनेस्टाईल कारवाई
8
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
9
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
10
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
11
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
12
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
13
होर्मुझमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल घेतला नाही; इराणची स्पष्टोक्ती...
14
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
15
'अमिरों का नशे'मुळे तपास यंत्रणांमध्ये खळबळ, महागड्या 'कोकेन'ची नागपूर मार्गे नियमित तस्करी 
16
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
17
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
18
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
19
बहिणीला शिवीगाळ, बोअरवेल कामगार विजय पानसेची धारदार शस्त्राने वार करत हत्या, सांगली जिल्ह्यातील घटना 
20
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
Daily Top 2Weekly Top 5

परीक्षांच्या तारखांमुळे स्पर्धा परीक्षा देणारे विद्यार्थी गाेंधळात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2021 04:46 IST

मार्च २०२०मध्ये आयाेजित करण्यात आलेली राज्य सेवेची पूर्व परीक्षा तब्बल एक वर्ष उशिरा म्हणजेच फेब्रुवारी महिन्यात घेण्यात आली. कंबाईन ...

मार्च २०२०मध्ये आयाेजित करण्यात आलेली राज्य सेवेची पूर्व परीक्षा तब्बल एक वर्ष उशिरा म्हणजेच फेब्रुवारी महिन्यात घेण्यात आली. कंबाईन परीक्षा तर दीड वर्षांपासून झालीच नाही. अनेक परीक्षा नियाेजित वेळेत घेतल्या जात नाहीत. परीक्षा घेतली तर त्याचा निकाल लावला जात नाही. निकाल घाेषित केला तर नाेकरी दिली जात नसल्याने एमपीएससी परीक्षा देणारे युवक गाेंधळात सापडले आहेत. तलाठी, ग्रामसेवक, लिपीक, आराेग्य सेवक आदी पदेही रिक्त आहेत. ही पदेसुद्धा भरण्यात आली नाहीत. ग्रामीण भागातील अनेक युवक या परीक्षेच्या माध्यमातून नाेकरी मिळवितात. मात्र, या नाेकऱ्याही मिळवणे कठीण झाले आहे.

बाॅक्स

माेठ्या बॅनरचे अतिक्रमण

एमपीएससी मार्गदर्शन केंद्र माेठा बॅनर असलेल्या संस्था चालवित हाेत्या. काेराेनापूर्वी त्यांना फारसा प्रतिसाद मिळत नव्हता. मात्र, काेराेना कालावधीत अनेक संस्थांनी ऑनलाईन क्लासेस सुरू केले आहेत. त्यामुळे युवक माेठ्या बॅनरचे क्लास करण्यास पसंती दर्शवत असल्याचे दिसून येत आहे. याचा फटका लहान संस्थांना बसत आहे.

बाॅक्स

यावर्षी तरी भरती हाेणार काय

- मागील दाेन वर्षांपासून नाेकर भरती झाली नाही. काही युवक मागील अनेक वर्षांपासून अभ्यास करीत आहेत. अनेकांचे वय निघून जाण्याच्या मार्गावर आहे. यावर्षी तरी भरती हाेणार की नाही, अशी चिंता युवकांना लागली आहे.

- तलाठी, ग्रामसेवक, आराेग्यसेवक, वनरक्षक यांसारख्या पदांची तरी भरती करण्यात यावी, अशी मागणी युवकांनी केली आहे.

काेट

लाखाे रुपये खर्चून स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्राचा सेटअप उभारण्यात आला. मात्र, मागील दीड वर्षांपासून काेराेनामुळे क्लासेस घेण्यास मनाई करण्यात आली आहे. तेव्हापासूनच संस्था अडचणीत आली आहे. कर्ज घेऊन सेटअप उभारला आहे. कर्जाचे हप्ते भरणेही कठीण झाले आहे. दीड वर्षात आलेले लाखाे रुपयांचे लाईटबिल भरण्यात आले आहे. ही स्थिती आणखी काही दिवस कायम राहिल्यास संस्था चालविणे कठीण हाेईल.

- संताेष बाेलूवार, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्रप्रमुख

’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’

काेट

वय निघून चालले

एका निश्चित वेळी परीक्षा हाेणार आहे, असे गृहीत धरून अभ्यास केला जाते. मात्र, वेळाेवेळी परीक्षा पुढे ढकलण्यात आल्याने पुन्हा रिव्हिजन करावी लागत आहे. यामुळे निराशा येते. परीक्षा झाल्यानंतर मी शहरातील खाेली साेडून गावाकडे येईन, असे आई-वडिलांना सांगितले आहे. मात्र, परीक्षा पुढे ढकलल्याने शहरातच राहावे लागत आहे. त्यामुळे निराश झालो आहे.

- मंगेश माेहुर्ले, परीक्षार्थी

...........................................................................

मागील दाेन वर्षाांपासून एमपीएससीच्या परीक्षा झाल्या नाहीत. एमपीएससीच्या तयारीसाठी शहरात राहून आर्थिक व मानसिक खच्चीकरण हाेत आहे. अधिक काळ तग धरणे शक्य नाही. शासनाने परीक्षा लवकरात लवकर घ्यावी. वय निघून जात असल्याने चिंता निर्माण झाली आहे.

- अजय वेलादी, परीक्षार्थी