शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
3
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
4
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
5
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
6
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
7
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
8
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
9
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
10
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
11
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
12
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
13
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
14
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
15
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
16
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
17
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
18
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
19
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
20
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
Daily Top 2Weekly Top 5

समाजाच्या विकासासाठी विद्यार्थ्यांनी प्रयत्न करावे

By admin | Updated: January 16, 2017 00:59 IST

विद्यार्थी हाच खरा समाज घडविणारा मुख्य आधारस्तंभ आहे. शिक्षणासोबतच आपला विकास व पर्यायाने समाजाचा विकास करण्यासाठी विद्यार्थ्यांनी सदैव तत्पर राहावे, ...

नगराध्यक्षांचे प्रतिपादन : गोविंदपूर येथे रासेयो शिबिराचे उद्घाटनगडचिरोली : विद्यार्थी हाच खरा समाज घडविणारा मुख्य आधारस्तंभ आहे. शिक्षणासोबतच आपला विकास व पर्यायाने समाजाचा विकास करण्यासाठी विद्यार्थ्यांनी सदैव तत्पर राहावे, याकरिता पालक व नागरिकांनीसुद्धा पोषक वातावरण निर्माण करावे, असे प्रतिपादन गडचिरोलीच्या नगराध्यक्ष योगिता पिपरे यांनी केले. इंदिरा गांधी महाविद्यालयाच्या वतीने गोविंदपूर येथे आयोजित राष्ट्रीय सेवा योजना शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी नगराध्यक्ष पिपरे बोलत होत्या. मातृभूमी सेवा शिबिराचे उद्घाटन नगर पालिकेचे माजी सभापती तथा भाजपचे ज्येष्ठ नेते प्रमोद पिपरे यांच्या हस्ते झाले. अध्यक्षस्थानी संस्थेचे संस्थापक सचिव प्रकाश अर्जुनवार होते. यावेळी डॉ. भारत खटी, विलास भांडेकर, संजय बारापात्रे, सरपंच गीता सोमनकर उपस्थित होत्या. कार्यक्रमादरम्यान अर्जुनवार व सरपंच सोमनकर यांच्या हस्ते नगराध्यक्ष पिपरे यांचा शाल, श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. दरम्यान उपस्थित मान्यवरांनी विचार व्यक्त केले. अर्जुनवार यांनी रासेयो शिबिरात विद्यार्थी समाजसेवेचे व्रत स्वीकारतात, असे प्रतिपादन केले. संचालन प्रा. प्रवीण सिडाम, प्रास्ताविक प्रा. प्रमोद सहारे तर आभार प्रा. सुनील गोंगले यांनी मानले. यशस्वीतेसाठी प्रा. राजन बोरकर, प्रा. दिगांबर पिपरे, प्रा. तुषार कोपुलवार, प्रा. अनिल भोयर, प्रीती मडावी, छत्रपती कोडाप, गायत्री चन्नावार, गंगाधर सिडाम, श्वेता सहारे यांनी सहकार्य केले. (प्रतिनिधी)