शहरं
Join us  
Trending Stories
1
हॉर्मुझबाबत इराणची नवी चाल, टोलवसुलीवर ठाम; अडवणुकीमुळे तणाव कायम,  सुप्रीम लीडर म्हणाले...
2
Latest Marathi News LIVE Updates: 'ऑपरेशन टायगर'च्या चर्चेनं राजकारणात खळबळ, शिंदेसेना-ठाकरेसेना आमनेसामने
3
तो लय बेक्कार मारतो! Mukul Choudhary च्या वादळी खेळीनंतर Arjun Tendulkar चा 'तो' व्हिडिओ व्हायरल
4
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
5
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन गार्डन्स गाजवलं 
6
मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार
7
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
8
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
9
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
10
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
11
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
12
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
13
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
14
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
15
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
16
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
17
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
18
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
19
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
20
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
Daily Top 2Weekly Top 5

वेळेतील बदलाने विद्यार्थी गोंधळात

By admin | Updated: February 4, 2017 02:21 IST

शासकीय व अनुदानित आश्रमशाळांच्या वेळेतील बदलाबाबत १९ जानेवारी २०१७ ला परिपत्रक काढण्यात आले.

दिनचर्येवर परिणाम : आश्रमशाळांतील विद्यार्थी व शिक्षकांमध्ये तीव्र रोष मालेवाडा : शासकीय व अनुदानित आश्रमशाळांच्या वेळेतील बदलाबाबत १९ जानेवारी २०१७ ला परिपत्रक काढण्यात आले. या परिपत्रकानुसार आश्रमशाळांतील विद्यार्थ्यांचे जेवण, तासिका व एकूणच दिनचर्येवर परिणाम झाल्याने आश्रमशाळांतील विद्यार्थी व शिक्षकांमध्ये गोंधळाचे वातावरण निर्माण झाले आहे. एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प गडचिरोलीचे प्रकल्प अधिकारी तथा सहायक जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी शासकीय व अनुदानित आश्रमशाळांच्या वेळेतील बदलाबाबत परिपत्रक संबंधित शाळांना पाठविले. डॉ. साळुंखे यांच्या अध्यक्षतेखाली समितीने केलेल्या शिफारशींचा या परिपत्रकात समावेश आहे. या परिपत्रकानुसार शाळेची वेळ सकाळी ९.४५ ते सायंकाळी ७.१० पर्यंत असून यात दुपारचे जेवण १.४५ पर्यंत तर सायंकाळचे जेवण रात्री ८.३० वाजेपर्यंत आहे. दोन्ही वेळच्या जेवणात सात तासांचा फरक आहे. तर रात्रीच्या जेवणानंतर १७ तासांनी दुसऱ्या दिवशी दुपारचे जेवण विद्यार्थ्यांना दिले जाणार आहे. साधारणत: जेवणाच्या वेळेतील अंतर जवळपास सारखे असणे गरजेचे आहे. जीवशास्त्रानुसार सुद्धा यात समानता राखण्यात आली आहे. परंतु जीवशास्त्रीयदृष्ट्या विद्यार्थ्यांच्या पाचनशक्तीचा विचार न करता वेळ निश्चित करण्यात आली आहे. सदर वेळा विद्यार्थ्यांच्या गैरसोयीच्या असून विद्यार्थ्यांसह त्यांचे पालकही या बदलामुळे त्रस्त झाले आहेत. जेवणानंतर दुपारी १.४५ ते ३.३० पर्यंत तासिका आहेत. सकाळी ८ वाजेपर्यंत नाश्ता व दुपारी ४ वाजेपर्यंत अल्पोपहार आहे. आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना अभ्यासाच्या वेळेस निद्रा येऊ नये म्हणून मध्यंतरी जेवणाच्या व शाळेच्या वेळेत बदल करण्यात आला होता. परंतु ‘जैसे थे’ स्थिती निर्माण झाल्याने विद्यार्थी, पालक व शिक्षकांमध्ये तीव्र रोष व्यक्त होत आहे. (वार्ताहर)