शहरं
Join us  
Trending Stories
1
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
2
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
3
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
4
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
5
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
6
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
7
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
8
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
9
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
10
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
11
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
12
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
13
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
14
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
15
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
16
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
17
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
18
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला पदार्पणाची संधी मिळणार?
19
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
20
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
Daily Top 2Weekly Top 5

गृहपालाच्या स्थानांतरणाविरोधात विद्यार्थी एकवटले

By admin | Updated: September 6, 2014 23:45 IST

वसतिगृहाच्या विविध प्रलंबित मागण्यांकडे शासन व प्रशासनाचे लक्ष वेधून घेण्यासाठी स्थानिक शासकिय आदिवासी वसतिगृहाच्या विद्यार्थ्यांनी शुक्रवारपासून बेमुदत साखळी उपोषण सुरू केले आहे.

देसाईगंज : वसतिगृहाच्या विविध प्रलंबित मागण्यांकडे शासन व प्रशासनाचे लक्ष वेधून घेण्यासाठी स्थानिक शासकिय आदिवासी वसतिगृहाच्या विद्यार्थ्यांनी शुक्रवारपासून बेमुदत साखळी उपोषण सुरू केले आहे. विशेष म्हणजे, गृहपालाचे स्थानांतरण रद्द करण्यात यावे यासाठीही वसतिगृहातील विद्यार्थी एकवटले आहेत. वसतिगृहातील विविध प्रलंबित मागण्यांसंदर्भात वरिष्ठ अधिकाऱ्यांना अनेकदा निवेदन देण्यात आले. मात्र निवेदनाची दखल अधिकाऱ्यांनी घेतली नाही. यामुळे शनिवारी दुसऱ्या दिवशी वसतिगृहाचे पाच विद्यार्थी बेमुदत उपोषणाला बसले आहेत. येथील आदिवासी विकास विभागाच्या शासकीय वसतिगृहात एकूण ६९ आदिवासी विद्यार्थी आहेत़ मागण्या मार्गी लावण्यासाठी वसतिगृहाचे सर्व विद्यार्थी एकवटलेले आहेत़ पावसाचे दिवस असताना सुध्दा वसतिगृहाचे विद्यार्थी साखळी उपोषणाला बसले आहेत़ उपोषणाचा शनिवारी दुसरा दिवस असून अद्यापपर्यंत उपोषणकर्त्या विद्यार्थ्यांना कोणत्याही अधिकारी तसेच राजकीय नेत्यांनी भेट दिलेली नाही़ वसतिगृहाचे गृहपाल डब्लू़ आऱ शेख यांचे प्रशासकीय स्थानांतरण रद्द करण्यात यावे, मागील २ महिण्यापासून विद्यार्थ्यांना निर्वाह भत्ता मिळालेला नाही तो त्वरीत देण्यात यावा, नवीन आदिवासी मुलींच्या वसतिगृहाचे बांधकाम शहराबाहेर ६ किमी अंतरावर सुरू आहे़ मुलींना शहराबाहेरच्या वसतिगृहात ये-जा करणे अतिशय अवघड होणार असल्यामुळे वसतिगृहाचे बांधकाम थांबविण्यात यावे, सन २०१४-१५ या सत्रातील गणेवशाची रक्कम विद्यार्थ्यांना मिळालेली नाही ती त्वरीत देण्यात यावी तसेच वसतिगृहातील विद्यार्थ्यांना क्रीडा साहित्य उपलब्ध करून द्यावे या मागण्यांसाठी वसतिगृहातील विद्यार्थी उपोषणाला बसले आहेत़ या संदर्भात विद्यार्थ्यांनी आदिवासी अप्पर आयुक्त नागपूर यांना २५ आॅगस्टला निवेदन दिले असून ३० आॅगस्ट रोजी आयुक्तांची प्रत्यक्ष भेट घेतली आहे़ मात्र अद्यापपर्यंत मागण्यासंदर्भांत कोणतीही कार्यवाही करण्यात आली नाही़ या मागण्यांची वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून दखल घेतली जात नसल्यामुळे विद्यार्थ्यांनी अखेर उपोषणाचे अस्त्र उगारलेले आहे़ (वार्ताहर)