शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
2
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
3
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
4
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
5
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
6
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
7
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
8
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
9
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
10
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
11
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
12
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
13
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
14
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
15
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
16
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
17
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
18
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
19
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
20
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
Daily Top 2Weekly Top 5

वादळाने आंबे झडले; हजारोंचे नुकसान

By admin | Updated: May 17, 2017 01:22 IST

गेल्या दोन दिवसांपूर्वी झालेल्या वादळात तांबासी येथील प्रगतीशिल शेतकरी उद्यानपंडीत गणपती सातपुते

आमराईत आंब्यांचा सडा : नुकसानीने शेतकऱ्यांच्या डोळ्यात अश्रू लोकमत न्यूज नेटवर्क गडचिरोली : गेल्या दोन दिवसांपूर्वी झालेल्या वादळात तांबासी येथील प्रगतीशिल शेतकरी उद्यानपंडीत गणपती सातपुते यांच्या आमराईतील आंबा पिकाची दाणादाण झाली आहे. यामध्ये सातपुते यांचे जवळपास ८० हजार रूपयांचे नुकसान झाले आहे. चामोर्शी, घोट तसेच जिल्ह्याच्या काही भागात वादळ आल्याने मोठ्या प्रमाणात आंबे झडले. हातात आलेले आंब्याचे पीक ऐनवेळी वादळाने गेल्यामुळे आंबेमालक शेतकऱ्यांच्या डोळ्यात अश्रूंच्या धारा वाहू लागल्या आहेत. चामोर्शी तालुक्यातील तांबासी गावापासून एक किमी अंतरावर वैनगंगा नदीच्या काठावर गणपती सातपुते यांचे शेतशिवार आहे. शेतजमीनीमधून धान उत्पादनासह भाजीपाला तसेच आंबा पिकांचे सातपुते उत्पादन घेतात. त्यांच्या शेतात २०० ते २५० आंब्यांची झाडे आहेत. आंबा वाडीमध्ये दशरी, कलमी, केशर, रत्ना, तोतापूरी, बेंगनपल्ली, निलम, शेंदरी, गावरान आदी प्रजातींच्या आंब्यांची झाडे आहेत. दरवर्षी ते आंबा विक्रीतून २ लाख रूपयांचे उत्पादन घेतात. दररोज त्यांच्या आंबा वाडीवर १० ते १५ मजूर काम करीत असतात. यावर्षी आंबा उत्पादन उत्तम व मोठ्या प्रमाणात होत असल्यामुळे जवळपास ३ लाखांचे उत्पन्न अपेक्षित होते. मात्र नुकत्याच आलेल्या वादळामुळे आंबे गळाले असून जवळपास ८० हजार रूपयांचे नुकसान झाले असल्याची माहिती सातपुते यांनी दिली आहे. कृषी विभागाने दखल घेवून मदतीसाठी पाठपुरावा करण्याची मागणी आहे. सर्वेक्षण व मदत करा गेल्या दोन-तीन दिवसांपासून जिल्ह्याच्या काही भागात वादळी पाऊस होत आहे. यामुळे आंब्यासह उन्हाळी धानपीक तसेच भाजीपाला पिकांचे नुकसान होत आहे. अनेक ठिकाणच्या शेतातील टमाटर झडून फुटून गेले. या नुकसानीसंदर्भात महसूल व कृषी विभागाने सर्वेक्षण करावे, अशी मागणी होत आहे.